जळगाव : प्रतिनिधी शहरातील तीन पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वेगवेगळ्या घटनेत तब्बल १९ जबरी चोरीतील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात रामानंदनगर पोलिसांना अटक केली असलायची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. शहरातील रामानंदनगर, जिल्हापेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन २०१८ पासून जबरी चोरीचे करीत असलेला संशयित आरोपी दत्तात्रय अमृत बागुल (वय- 39, रा. मोहाडी जि. धुळे ह.मु. जळगाव) आणि सुधाकर उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (वय-२५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) या दोन जणांना अटक करण्यात आली होती. या दोघांची सखोल चौकशी केली असता दोघांनी तब्बल १९ जबरी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा छत्रपती शिवरायांसाठी लिहिलेल्या गीतावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि शिवरायांचा अवमान झाला म्हणून संघ-भाजप पिलावळीने बोंब ठोकण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवराय हे भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या ऐतिहासिक व अभूतपूर्व कार्यामूळे ओळखले जाणारे थोर रत्न आहेत. त्यांच्या कार्यातून, विचारांतून आणि धोरणांतून जगभरातील शोषणाविरुद्ध लढणारे तमाम कार्यकर्ते प्रेरणा घेत असतात, घेत राहतील. पण शिवरायांचा अवमान झाला म्हणून बोंब ठोकण्याचा नैतिक अधिकार शिवप्रेमाच्या ढोंगाचा बुरखा पांघरलेल्या संघ-भाजप पिलावळीला अजिबात नाही. जय भगवान गोयल या संघ-भाजप परिवारातील तथाकथित लेखकाने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या मथळ्यावरुन तर नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी…
मुंबई : वृत्तसंस्था दुकानाचं उद्घाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. यामुळे सध्या गौतमी आणि कार्यक्रमात राडा हे जणू समीकरणच बनत चाललं आहे. यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. यातच आता गौतमीच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. यावर काल विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. ती म्हणाली की, “मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलले…
धरणगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिल्ह्यात चर्चेत आलेली होती. त्यानंतर या समितीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक हाती सत्ता मिळविली आहे. पण आज होणाऱ्या सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत चर्चेला उधान आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव – एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सभापतीपदी निवडणूक होत आहे. यात प्रामुख्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांच्या पत्नी लताबाई गजानन पाटील या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. गजानन पाटील हे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत तब्बल २५ वर्षापासून एकनिष्ठ काम करीत असून त्यांना हि संधी मिळणार असल्याची चर्चा जोर धरीत आहे.
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चमगाव रस्त्यावर दोन दिवसा आधी सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पकडण्यात आला होता. घटनास्थळावरून ट्रकचा चालक क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाल होता. हि गाडी धरणगाव कृषी कार्यालयात लावण्यात आली असून अधिकारीनी नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मिळून आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या गाडीचा चालकासह क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर कृषी अधिकारी यांनी हि गाडी धरणगाव…
धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विकास कामांचा धडाका आजही कायम असून आज धरणगाव तालुक्यातील नारणे या गावात विकास कामाचे भूमिपूजन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दि २६ रोजी धरणगाव तालुक्यातील नारणे या गावी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे २४ लाखांचे काम तर २५/१५ अंतर्गत कॉंक्रीटीकरणाचे ५ लाखांच्या कामासह शेत शिवार बंधाराचे कामाचे भूमिपूजन आज होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांचे लक्ष या जाहीर…
मुंबई : वृत्तसंस्था दिग्गज अभिनेता असलेला सलमान खानने नुकतेच एका चित्रपटानं ईद दिवशी चांगली कमाई केली होती. पण त्यानंतर या चित्रपटानं म्हणावी तशी कमाई केलेली नाहीये. 150 करोडच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली नसून या चित्रपटाची कमाई जास्त झालेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं विदेशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 52.75 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात सलमानच्या या चित्रपटानं 20 कोटी एवढी कमाई केली आहे. तसंच महामारीनंतर हा चित्रपट पठाण चित्रपट वगळता सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत केजीएफ 2 आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांना मागे टाकलं आहे. दरम्यान, ‘किसी का भाई…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील बारावीचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंदा पाटील यांची कन्या कु. मृणाली पाटीलने १२ वी वाणिज्य विभागात मु.जे. महाविद्यालयात ९६.८३ टक्के गुण मिळवून यश मिळवले असून मृणालीला तब्बल दोन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविल्याने तिच्यावर अभिनंदांचा वर्षाव होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंद पाटील यांची कन्या मृणाली गाेविंद पाटील हिला बारावीच्या परिक्षेत ९६.८३ टक्के गुण मिळाले आहे. सुरूवातीपासूनच मृणालीने सीए होण्याचा निश्चय करून वाणिज्य शाखेत प्रवेश घेवून हे यश मिळविले आहे. मृणालीने बुक कीपिंग अकाऊंटंसी आणि आयटी या दोन विषयात पैकीच्या पैकी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील महिला शिक्षिका फुले मार्केट परिसरात आले असता त्यांच्याकडील रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फुले मार्केट परिसरात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शुभांगी सुरेश बडगुजर (रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) या महिला शिक्षिकेने संसारात काटकसर करून आणि खासगी क्लास ने जमविलेली ७० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने फुले मार्केट परिसरातून लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने गुरुवारी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी बडगुजर या घरामध्ये लहान मुलांची खासगी क्लास चालवितात. त्यातून त्यांनी घरखर्च भागवून…
धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. हीच परंपरा पुढे जोपासण्यासाठी राज्यातील अनेक गादीपती व कीर्तनकार आपल्या वाणीतून भाविकांना अध्यात्मिक उर्जा देत असतात. राज्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प.रविकिरण महाराज दोडाईचाकर यांनी आज जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी राज्यातील जनतेला आपल्या वाणीतून अध्यात्मिक संदेश देण्याचे काम करणारे ह.भ.प.रविकिरण महाराज दोडाईचाकर यांनी भेट देवून आशीर्वाद दिले आहेत. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, राज्यातील प्रत्येकाच्या…

