Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  दहावीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली नाही पण निकालाच्या तारखांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या…

Read More

यावल : प्रतिनिधी  शहरातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या एका मॉल मध्ये रविवार २८ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कॅश काउंटर कामास असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीची ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख रा.आयशा नगर, यावल या तरुणाने तरूणी काम करीत असलेल्या मॉलमध्ये सामान घेण्याच्या बहाण्याने येवून तरुणीच्या जवळ आला असता “तु मला आवडते, तु माझ्याशी लग्न करणार का? तु माझ्या घरी ये आपण मजा करू” असे बोलुन तरूणीस लज्जा वाटेल असे कृत करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.संजय देवरे हे करीत…

Read More

अनैतिक संबंधांच्या अनेक घटना रोज उघडकीस येत असतात. याच अनैतिक संबंधातून अनेकदा गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सुखी कुटुंबे देखील तुटली आहेत. मात्र प्रेमात बुडालेल्या जोडप्यांना इतर कोणाचाही विचार येत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. उत्तर प्रदेशात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन मुलांच्या आईचा स्वतःच्याच दीरावर जीव जडला होता. त्यानंतर दोघांनाही एकदा अंधाराचा फायदा घेत असा काही प्रकार केला की सगळ्या कुटुंबालाच धक्का बसलाय. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रामपूरमध्ये एका विवाहित महिलेने अंधाराचा फायदा घेत असे काही केले की, संपूर्ण गावात आता त्याची चर्चा सुरु…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील जुने जळगावातील विठ्ठल मंदिर परिसरात पवन दिनेश बारेला (रा. जुने जळगाव) या दोन वर्षाच्या बालकाच्या चेहऱ्यावर उकळता चहा पडल्याने संपूर्ण चेहरा भाजल्याची घटना शनिवारी घडली. जखमी चिमुकल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात दिनेश बारेला (२६) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी सायंकाळी बारेला यांच्या पत्नी चह करीत होत्या. त्यावेळी पवन ह खेळता-खेळता जवळ आला धक्का लागल्याने उकळता चह पवनच्या चेहऱ्यावर पडला. यात चिमुकल्याचा चेहरा भाजला गेला. शेजारी राहणारे सोनू माधव राठोड यांच्या मदतीने जखमी चिमुकल्याल रविवारी सकाळी १० वाजत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील न्हावी गावात एका किराणा दुकानावर रविवारी पहाटे तीन वाजता छापा टाकून पोलिसांनी तब्बल साडेसात लाखांचा गुटखा जप्त केला. यात विक्की माखिजा (वय ३९) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांच्या पथकाने न्हावी येथील सुनील किराणा या दुकानावर छापा टाकला. त्यात दुकानांमध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला गोण्यांमध्ये भरलेला आढळून आला. याची किंमत तब्बल सात लाख ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार मसलोद्दीन शेख तपास करीत आहेत. गुटखा बंदी असूनही सर्रास गुटखा उपलब्ध होत आहे. तालुक्यात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील एका गावात असलेल्या व जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भुसावळ तालुक्यातील सुनसगावच्या सुदर्शन मिलमध्ये रविवारी सकाळी नऊ वाजेनंतर भीषण आग आग लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील सुनसगावच्या सुदर्शन मिलमध्ये रविवारी सकाळी नऊ वाजेनंतर भीषण आग लागली आहे. एक-एक करीत आगीचा विळखा अनेक विभागांपर्यंत पोहोचला असून या आगीमुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याची भीती आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून भुसावळसह जिल्ह्यातील अन्य पालिकांचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले असून अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील बसस्थानकाजवळ मोबाईल चार्जर मागिल्याच्या शुल्लक कारणावरून चालकासह एकाला मारहाण करीत शिवीगाळ केल्याने एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कडगाव येथील रहिवासी असलेले ३२ वर्षीय गणेश बाबुराव कोळी हा तरूण २३ मे रोजी सकाळी ९ वाजता गावातील बसस्थानकाजवळ सुनिल प्रकाश कोळी यांच्याकडे मोबाईलचे चार्जर मागितले असता. याचा राग आल्याने सुनिल कोळी, अनिल कोळीसह चार अनोळखी इसमांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतांना गावातील भुषण कोळी याने मध्यस्थी केली असता त्याला देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून एका घरातील वाल कंपावूडमधून २० हजाराची सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगर परिसरातील मनीषा कॉलनी येथील रहिवासी ललित सतीशचंद्र मणियार यांच्या मालकीच्या घराच्या कंपावूडमधून दि. २४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास २० हजार रुपये किमतीची सायकल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रेवानंद साळुखे हे तपास करीत आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  नव्या संसद भवनाचं आज रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असून या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित आहेत. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला आहे. परंतु मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाची सुरवात पूजा आणि होमहवन याने झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सेंगोल’समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला त्यानंतर नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात शतपावली करत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबविल्याची घटना शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात तारा हॉस्पिटल समोर शुक्रवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, शहरातील रिंगरोड परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथे ज्योती विजय शिरसाठ (वय-38) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नेहमी नेहमीप्रमाणे ज्योती शिरसाट या त्यांच्या शेजारी राहणार्‍या भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी शुक्रवारी दि. 26 मे रोजी रात्री 10 वाजता पायी निघाले. त्यावेळी नंदनवन कॉलनी येथील तारा हॉस्पिटल समोरून जात असताना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन ज्योती शिरसाठ यांच्या गळ्यातील 65…

Read More