पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात वहिनी व दिराच्या नात्याला काळिमा फासेल अशी घटना घडलेली आहे. दिराने शेतात असलेल्या आपल्या वाहिनीसोबत चुकीचे कृत्य करीत शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात दिराविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहायला आहे. याच परिवारातील महिलेचा दीर असलेल्या एकाने दिनांक २६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास महिला आपल्या मुलासोबत शेतात काडीकचरा वेचण्यासाठी गेली असता. महिलेचा दीर देखील त्या ठिकाणी आला व लहान मुलाला विहिरीवर पाणी घेण्यासाठी पाठवीत. महिलेच्या जवळ येत अश्लील वक्तव्य व चुकीची मागणी केली यावर महिलेने नकार दिला…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव – जळगाव रस्त्यावर असलेल्या एका जिनिंगच्या परिसरात दुचाकी पार्किंग केली असता तेथून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव शहरातील पातालनगरी येथील रहिवासी मोहम्मद युसुफ अब्दुल मुनाफ यांच्या मालकीची दुचाकी एमएच १९ ए वाय 7082 या क्रमांकाची दिनांक १६ मे 2023 रोजी रात्री दहा ते अकरा वाजे दरम्यान अनोळखी चोरट्यांनी बिजासनी जीनिग परिसरातून चोरून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात धाव घेत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे ही दुचाकी साधारण 28 हजार रुपये किमतीची असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा आहे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरातील मराठी शाळेजवळून युवराज सुकलाल हिरे यांची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी साईनगरातून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हिरे यांची दुचाकी शनिवार दि. २० मे रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ही दुचाकी घेऊन अल्पवयीन चोरटा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरात फिरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. ही कारवाई उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील आदींनी केली.
रावेर : प्रतिनिधी तालूक्यातील लहान वाघोदा येथील मस्कावद रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, यात नऊ हजार दोनशे रुपये रोख तर नऊ मोबाइल व पत्ता, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. धनराज राजेंद्र पाटील (३०), अनवर ऊर्फ फिरोज सरवर पटेल, (३५ साबीर सिकंदर पटेल, (२५), विनोद काशीनाथ कोळी (४२), सुभाष मुरलीधर पाटील (६२), अरविंद ऊर्फ दीपक रमेश पाटील (४०), सुभाष धोंडू चौधरी (६१), शाहरुख सिकंदर पटेल (२५), उमेश पंडित कोळी (30) अनिल रसूल पटेल (४३, सर्व रा.…
पुणे : वृत्तसंस्था मुलाच्या लग्नासाठी गेल्या काही दिवसांपासुन हक्क रजेवर असणार्या पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. एपीआय भालचंद्र शिंदे हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हक्क रजा घेतली होती. मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करत असतानाच त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. शिंदे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शिंदे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिकचे म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे शुल्क वाढविले आहे. जुलै २०२३च्या पुरवणी परीक्षेपासून शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी, द्विलक्षी शाखेतील नियमित व खाजगी विद्यार्यांसाठी ४४० रूपये परीक्षा शुल्क राहणार. त्याखेरीज प्रशासकीय शुल्क २०, गुणपत्रिका शुल्क २०, प्रात्यक्षिक परीक्षा प्रती विषय १५ रूपये तर एमसीव्हीसीसाठी ३० तसेच माहिती तंत्रज्ञान शाखेच्या प्रत्येक विषयासाठी २०० रूपये शुल्क आकारल्या जाणार आहे. पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी हेच शुल्क लागू होणार. श्रेणी सुधारण्यासाठी अ श्रेणी सुधार योजनेत सहभागी नियमित तसेच पुनर्परिक्षार्थी यांना ८८० रूपये पडतील. ब श्रेणीतील खाजगी विद्यार्थ्यांना ८८० रूपये लागू होणार.…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील भाजप व शिंदे सरकारचा मंत्री मंडळावर नेहमी आपली बाजू मांडणारे आ.बच्चू कडू हे सातत्याने आक्रमक पवित्रा घेत असतात पण सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहारच्या बच्चू कडू यांनी दावा केल्याने खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असून भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असे बच्चू कडू म्हणाले. काही दिवसांपूर्वी गुवाहाटीतील सौदेबाजीवरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचले होते. यावेळी दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. नंतर हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत आला होता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मात्र आता बच्चू…
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जून रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. ‘ शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रम अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना त्यांच्याहस्ते योजनांचा लाभाचे वितरण केले जाणार आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना संभाव्य दौरा मुख्यमंत्री कार्यालयाकडून शुक्रवारी मिळाला आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे ३ जून ला दुपारी साडेचार वाजता जी. एस. ग्राऊंडवर लाभार्थ्यांना भेटणार आहेत आणि विविध योजनांचा लाभ वितरित करणार आहेत. ७५ हजार लाभार्थी जिल्हा प्रशासनाने २ लाख २१ हजार ८२९ जणांची लाभार्थी म्हणून नोंद घेतली आहे.या कार्यक्रमासाठी मात्र विविध विभागातील ७५ हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एका रस्त्यावरून घरी जाणाऱ्या तरुणाला भरदुपारी चाकू भोसकून त्याच्याकडील 2 लाखाची रोकड लुटणार्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथील राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय 35) हा सद्या मेहरुण पसिरात राहत असून तो सेंट्रिंग कामाचा ठेकेदार आहे. प्लॉटच्या व्यवहाराच्या दोन लाखांची रोकड घेवून दि. 23 रोजी राजेंद्र सुर्यवंशी हा (एमएच 19, डीएच 6840) क्रमांकाच्या दुचाकीने धरणगाव मार्गे आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला. गावाहून परत येताना तो पत्नीलाही सोबत घेऊन येणार होता. धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यांत तिखट घालून…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणा शिवारातील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याची कबुली देखील आरोपीने दिली असली तरी त्या महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही, त्यामुळे पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा शिवारात एका विहिरीमध्ये दि.८ रोजी कुजलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हातावर ‘सखाराम सुभाष’, असे गोंदलेले होते. याप्रकरणी पोलिसांत प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मयत महिलेसोबत खुमसिंग बारेला याला पाहिल्याची माहिती मिळाल्यावर संशयित आरोपी रावेर तालुक्यातील खिरवळ येथील खुमसिंग सरदार बारेला (वय ३३) असे असून तो सध्या मोर…

