Author: editor desk

अहमदाबाद : वृत्तसंस्था  पतीच्या निधनानंतर पत्नीला सती प्रथेप्रमाणे जीवन संपविण्याचा हट्ट कुटुंबीयांना केला होता. सती जाण्यासाठी, सासरच्या मंडळींनी सुनेवर इथपर्यंत दबाव टाकला की, अखेर महिलेनं नदीत उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि घटना गुजरातमध्ये घडली आहे. राजस्थानची मूळ निवासी असलेली संगिता लाखरा, जी आपल्या पतीसमवेत गुजरातमध्ये राहत होती. तिने अहमदाबाद येथील साबरमती नदीमध्ये उडी घेऊन जीवन संपवले. काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींकडून तिला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. पोलीस अधीक्षक एम.वी. पटेल हे याप्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आणखी कोणाला त्रास नाही देणार अशा आशयाची सुसाईड नोट लिहून तरुणाने आपली जीवन यात्रा संपविण्याची जळगावला दुर्दैवी घटना शिव कॉलनी परिसरात बुधवारी घडली. अक्षय विलास सुर्यवंशी (वय-२६ वर्ष, रा. शिवकॉलनी बसस्टॉप जवळ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात अक्षय सुर्यवंशी हा तरुण परिवारासह वास्तव्याला होता. खासगी कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी रात्री १० वाजता तो जेवण करून झोपला, मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. आई अक्षयला उठवण्यासाठी गेली असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसले. अक्षयचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तापमानात वाढीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठाही कमी होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात आणखी ४ गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. पूर्वी १४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता १८ गांवात २० टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. अल निनोमुळे जिल्हाभरात उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर उभे राहिले आहे. यंदा पावसाळा एक महिना उशिराने येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १८ गावांमध्ये २० टँकर जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, किन्ही, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील बांभोरी येथे असलेल्या हिताची कंपनीच्या कामगारांनी गेल्या दोन दिवसापासून संप पुकारण्यात आला असल्याने आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची भेट घेत लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे. येत्या शुक्रवार पर्यंत कंपनीच्या प्रशासनाशी बोलून कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन संप मिटवून असे आश्वासन गुलाबभाऊंनी यावेळी दिले. बांभोरी हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टम इंडिया प्रा.लि. या कंपनीतील कामगार बेमुदत संपावर गेलेले आहेत. याठिकाणी असे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी संपावर गेलेल्या कामगारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनिलशेठ नन्नवरे, ईश्वर शेठ नन्नवरे सरपंच सचिन बिऱ्हाडे, शांताराम महाराज, माजी सरपंच राकेश नन्नवरे.भिकन शेठ , रवींद्र शेठ, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद…

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील मोठा वाघोदा येथील बसस्थानकाजवळ पाच टपऱ्यांना आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना दि. २४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. आगीबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील मोठे वाघोदे येथे विजय नथ्थू चौधरी यांच्या मालकीचे पान सेंटर आहे. यात झेरॉक्स मशीन, लॅपटॉप स्टेशनरी व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गुलशन समशेर पठाण यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे टपरीसह साहित्य जळून खाक झाले तर मलक इमाम यांच सायकल दुरुस्तीची टपरी तसेच साहित्य जळून चाळीस हजार रुपयांच नुकसान झाले आहे. मधुकर…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था  तेलंगणात काकाचा अंत्यविधी आटोपून गुजरातमधील सुरतच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकास डुलकी लागल्यामुळे गाडी दुभाजकावर आदळली. त्यात चार चुलत भावांचा मृत्यू तर पुतण्या जखमी झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगराजवळील समृद्धी महामार्गावरील जयपूर शिवारात घडली. या अपघाताची करमाड पोलिस ठाण्यात नोंद केल्याची माहिती निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी दिली. या अपघातात मयतामध्ये सुरेशभाई रामू गौड (३८), श्रीनिवास रामू गौड (३६), संजय राजनभाई गौड (४३) आणि कृष्णा राजनभाई गौड (४८, सर्वजण रा. सुरत, गुजरात) यांचा समावेश आहे. भार्गव सुरेशभाई गौड (१९) हा युवक जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चार…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा जुन्या भांडणाच्या कारणावरून वादातून पतीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहायला आहे. दि. २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील सुनील आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, दीपक भानुदास धनगर यांनी महिलेचा हात पकडून अंगावरील कपडे फाडत तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिच्या पतीला देखील यावेळी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी महिलेने थेट पहूर…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कोतवालांची रिक्त पदे भरतीकामी आरक्षण सोडतबाबतचे पत्रक जारी झाले असून आता या पदावर लवकर आरक्षण सोडत निश्चित केलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील ६ गावांना कोतवाल मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील गारखेडा, बांभोरी बु., कल्याणे बु., पष्टाणे बु., चांदसर बु., जांभोरा बु., याठिकाणी कोतवालांची रिक्त पदे भरतीकामी आरक्षण सोडत बाबतचे पत्रक जारी झाले आहे. त्यात म्हटले आहे कि, धरणगांव तालुक्यातील कोतवाल संवर्गातील पदे भरणेकामी कार्यवाही सुरू आहे. सदर कामी दिनांक २६ मे रोजी दुपारी १२.०० वाजता तहसिल कार्यालय, धरणगांव येथे आरक्षण सोडत निश्चित केलेली असल्याने याबाबत आपल्या स जेतील प्रत्येक गावांतील ग्रामस्थांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याबाबत दवंडी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरुवारी) दुपारी 2 वाजता ऑनलाईन स्वरुपात जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य बोर्डाकडून बुधवारी येथे देण्यात आली. अन्य शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यावर राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होईल, अशी माहिती सांगितली जात होती. मात्र, मे महिन्याच्या अगदी अखेरीऐवजी राज्य बोर्डाने 25 मे रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतुक करणार्‍या वाहनांवर महसूल प्रशासन कारवाई करून जप्त केलेला वाळूचा ट्रक चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध वाळूचा ट्रक जप्त करण्यात आला होता. या सर्व वाहनांवर देखरेखीसाठी पोलीस मुख्यालयातील बाळू पाटील, अविनाश जाधव, गौरख पाटील व तुषार सोनवणे यांची गार्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.२३ रोजी मंगळवारी बाळू पाटील व अविनाश जाधव हे ड्युटीवर असतांना दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्यांना गाडी सुरु होण्याचा आवाज आला. त्यांनी त्याठिकाणी…

Read More