मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा सुरु आहे. तसेच मुंबईत आर्द्रता असल्याने उकाडा असह्य होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा अजूनही कायम आहेत. त्यातच आता राज्यात मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात बुधवारपर्यंत मॉन्सूनपूर्व पाऊस म्हणजेच वळवाचा पाऊस येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसात वळवाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. सध्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण का भेटत असतो?, यावर प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची युती आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतही जाण्यास तयार आहोत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांची कामे करण्यासाठी त्यांना भेटावेच लागते. या भेटीचा वेगळा अर्थ काढण्यची आवश्यकता नाही. ठाकरे गट किंवा शिंदे गट कोणासोबतही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. यात मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली आहे. याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वैद्यकिय…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 23 वर्षीय तरुणाने गरोदर केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी अडावट पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील एका गावातील परिवार ऊस तोड कामासाठी चोपडा तालुक्यातील एका गावात आलेले असताना दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ यादरम्यान या परिसरातील एका 23 वर्षीय संशयित आरोपी सागर मोरे याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी राहण्याच्या झोपडीत येत तिच्यासोबत अत्याचार करीत तिला गरोदर केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्थानकात संशयित आरोपी सागर मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अडावद पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी एका कंपनीद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून रावेर येथील भूषण हाटे यांना ९ लाख ३० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सायबर ठगाला सायबर पोलिसांनी गुजरात राज्यातील भावनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याजवळून ५ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील भूषण हाटे यांना एप्रिल महिन्यात सायबर ठगाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख ३० हजारांची ऑनलाइन फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी भूषण यांचे व्हॉट्सअॅप आणि बँकेतील झालेल्या व्यवहाराच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, तो गुजरात…
जामनेर : प्रतिनिधी लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न झाल्याने जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून वन्हाडी घराकडे परतली. परत निघालेल्या नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना मुलीकडच्या लोकांनी बोदवडजवळ अडविल्याचा प्रकार तालुक्यात सोमवारी घडला. जामनेर येथे सोमवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने खासगी बसमधून सकाळीच वर पक्षाकडील मंडळी गावात पोहोचली. पाहुण्यांची मनासारखी व्यवस्था व मानसन्मान मिळत नसल्याने नवरदेव व त्याचे नातेवाईक मंडळी दुपारीच माघारी फिरले, त्यामुळे वधूकडील नातेवाइकांमध्ये चलबिचल सुरू झाली नवरदेवाचे वाहन मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोहोचले होते, तर वऱ्हाडींची बस बोदवडजवळच होती. तिथे ती अडविण्यात आली. मुलीकडच्यांनी त्यांना जामनेर पोलिस ठाण्यात आणले. रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांकडून…
यावल ; प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील एका परीसरात राहणारी २५ वर्षीय विवाहिता दि २८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावरील खाटेवर झोपली असताना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गावात अंकुश कोळी याने विवाहिता झोपेत असताना साडी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महीलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेडखानी करणाऱ्याने पळ काढला. याबाबत महीलेने यावल पोलीस ठाण्यात अंकुश कोळी…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ एकास काहीही कारण नसताना त्याच्या खिशातील ८०० रुपये हिसकावून डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकेगावातील रहिवासी असलेल्या नूर मोहम्मद पिंजारी वय २३ हा विद्यार्थी शिक्षण घेत असून २८ रोजी मुस्लिम कब्रस्थान रोडवर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चालत असताना संशयित आरोपी सत्यम चैत्राम पाटील, बंटी उर्फ जयेश शांताराम कोळी, रा. चोपडा यांनी नूर मोहम्मद याला काहीही कारण नसताना लोखंडी रॉड डोक्यात टाकून दुखापत केली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.…
पुणे : वृत्तसंस्था पुणे येथील कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्क येथे एका इमारतीला अचानक भीषण आग लागल्याने इमारतीमधील अनेकांची तारांबळ उडाली आहे. या आगिचे धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता…
यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील परसाडे परिसरात रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घर कोसळून घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले पत्र्याचे घर होते. या ठिकाणी त्यांचा घोडा बांधण्यात आलेला होता. रविवारी २९ मे रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास चक्रीवादळ आल्याने घोडा बांधलेले घर कोसळले. यात घोड्याचा दाबला गेल्याचे त्याचा मृत्यू झाला. अत्यंत गरीब अशा कुटुंबातील पिरखा तडवी यांच्या कुंटुबाचा पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला पांढरा शुभ्र असल्यामुळे घोडा याची परिसरात मोठ्या प्रमाणात नवरदेवांची लग्नसाठी मागणी असायची, या वादळी वाऱ्यात तो मरण पावल्याने आदिवासी कुटुंबाचे सुमारे…

