धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावामध्ये महसूल पथकातील अधिकारी यांनी वाळूचे ट्रॅक्टर दिसले असताना त्याला पकडण्यासाठी जात होते. यावेळी भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील नांदेड फाटा या ठिकाणी मंडळ अधिकारी प्रवीण मधुकर बेंडाळे वय 55 हे दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू ट्रॅक्टर्स थांबविले असता ट्रॅक्टरवरील चालकाने मंडळ अधिकारी यांना हुलकावणी देत एक ब्रास वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले आहे या प्रकरणी मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे यांनी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी भटू रमेश सैंदाणे राहणार नांदेड यांच्या विरोधात तक्रार दिली…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एक धरण प्रसिद्ध असून याठिकाणी अनेक जिल्ह्यातील तरुण पर्यटनासाठी येत असतात. याच धरणात मंगळवारी दोन बालक बुडाले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळील निंबादेवी धरणावर गुरांना पाणी पाजण्यासाठी आलेले निमछावी वस्तीवरील दोघे बालक अचानक बुडाल्याने एकच खळबळ उडाली असून मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दुसर्या बालकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील रहिवासी आहेत. आसाराम शांतीलाल बारेला (14) व नेनू किसन बारेला (10, रा.निमछाव वस्ती) अशी बुडालेल्या बालकांची नावे आहेत. आसारामचा मृतदेह शोधण्यात यश आले मात्र नेनूचा रात्री उशिरापर्यंत…
जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक महिलेला सोने खरेदी करण्याची खूप आवड असते, त्याच महिलासाठी हि बातमी आहे ज्यांना सध्या सोने खरेदी करायचे आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे. हा क्रम गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ६० हजार रुपयांपेक्षा खाली आला आहे. सोन्यासोबत चांदीची किंमतसुद्धा कमी झाली आहे. मंगळवारी चांदीचा दर ३५ रुपयांनी कमी होऊन ७२ हजार २५० रुपये प्रति किलो ग्रॅम एवढा झाला आहे. कमकुवत जागतिक सौद्यांमुळे दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये मंगळवारी सोनं ९० रुपयांनी स्वस्त होऊन ५९ हजार ९४५…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात येत्या ६ जून रोजी रायगड येथे राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरु आहे तर राज्यातील अनेक शिवभक्त गडावर येणार आहे. त्यासाठी मोठी सजावट करण्यात येत आहे. त्याआधीच एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. राजदरबार येथे सजावटीचे काम करताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. यासाठी गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या डागडुजीची कामे सुरु झाली आहेत. काही गडांवर सजावटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे. ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक…
जळगाव : प्रतिनिधी बिहार मधील ५९ अल्पवयीन मुलांची तस्करी होत असताना जळगाव व मनमाड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मुलांची सुटका केल्याची खळबळ जनक घटना समोर येत आहे. यात मनमाडला 30 तर जळगावला 29 मुलांची रेस्क्यू केले आहे. पुणे व सांगली येथे मदरशांमध्ये या मुलांना नेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बिहार राज्यातून अल्पवयीन मुलांची रेल्वेतून तस्करी करून नेत असताना रेल्वे पोलिसांनी जळगाव ते भुसावळ दरम्यान चेकिंग करतांना आढळून आले. पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 29 तर मनमाड रेल्वे स्थानकावर ३० मुलांना सोडविले आहे. मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल या घटनेत मानवी तस्करी या प्रकरणी तीन ते चार जणांना ही अटक…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील वटार यागावी भीषण आग लागून तीन घरे जळून भस्मसात झाली. गॅस नळीतून गळती झाली. आणि नंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. गावात हळदीची पंगत असल्याने लहान मुलांसह सर्वजण जेवण करण्यासाठी गेलेले असल्यानेच जीवितहानी टळली. आगीने लाखो रुपयांची आर्थिक हानी पीडित कुटुंबांची झाली आहे. दि. २९ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने क्षणात तीन संसार उघड्यावर आणले आहेत. चोपडा तालुक्यातील वटार येथे काल सायंकाळी ८ वाजता अचानक आग लागली. आगीत कैलास भिका ठाकरे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. बघता बघता आगीने धनसिंग खंडू कोळी, भिकूबाई सुभाष कोळी व पाडुरंग सुभाष कोळी यांची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील लांडोरखोरी वन उद्यानाकडून मोहाडी रोडलगत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता घडली. या हल्ल्यात महिलेच्या मांडीवर व हाताच्या बोटांवर रानडुकराने चावा घेतल्याने महिला जखमी झाली असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असलेल्या वंदना चंद्रकांत जगताप असे जखमी महिलेचे नाव आहे. वंदना जगताप व त्यांचे पती चंद्रकांत जगताप गेल्या दोन वर्षांपासून लांडोरखोरी रस्त्यालगत दररोज मॉर्निंग वॉकला जातात. मंगळवारी दोन्ही जण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले. लांडोरखोरी जवळच अचानक जगताप दाम्पत्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात चंद्रकांत जगताप दूर फेकले गेले, मात्र वंदना जगताप या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीचा मोबाईल अनोळखी चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल येथील २३ वर्षीय शिरीना गबू तडवी हि तरुणी शिक्षणासाठी जळगाव शहरातील जिल्हा पेठ परिसरातील एका ठिकाणी राहायला आहे. दि २९ रोजी ६ वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरातून ७ हजार किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.प्रदीप पाटील हे करीत आहेत.
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील विवाहितेने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला छातीशी लावून लासगावच्या विहिरीत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील आरीफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांच्या मामाची मुलगी लजीनाबी यांच्याशी झाल्यानंतर दाम्पत्यास पूत्ररत्न झाले होते. शनिवार, 28 मे 2023 रोजी गावात समाज बांधवाचे लग्न असल्याने आरीफ शेखसह परीवार आमंत्रीत असल्याने आरीफ हे लग्नाला गेले तर पत्नीने मात्र काही वेळात येत असल्याचे सांगून लासगाव शिवारात आत्महत्या केली. दरम्यान, बराच वेळ होवूनही पत्नी येत नसल्याने आरीफ शेख यांनी घर गाठले मात्र पत्नी नसल्याने त्यांनी शोध…
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसचे नेते कामाला लागली आहे. पण या मतदार संघात कॉंग्रेस निवडून येत नसल्याने हि जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी असा अट्टाहास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्याने कॉंग्रेस नेते नाना पटोले व अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे देखील घडले होते. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहे. कॉंग्रेसकडून या जागेसाठी आता आपला उमेदवारही घोषीत करून दिल्याने एकच चर्चा रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेस सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये या जागेवरून दावे ठोकले जात आहेत. तर काॅंग्रेसकडून आता या निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी…

