जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका ढाब्यासमोर जळगांव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी गुरुवारी दुपारी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांसह त्यांना पिस्तूल विकणाऱ्याला ताब्यात घेतले. गजानन रामेश्वर भोई (१९, रा. श्रीकृष्ण नगर, नेरी) व शेखर राजेश सुके (१९, रा. कंडारी, ता.जळगांव) यांचेकडून ३० हजार किमतीचे पिस्तूल जप्त केले. त्यांनी पिस्तूल जामनेर येथील एकाकडून घेतली असल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक कारभारी बोरुडे करत आहेत.
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा या गावातील एका तरुणाची घराच्या बाहेरून दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी अंमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावातील रहिवासी पंकज जिजाऊराव कदम हे खाजगी नोकरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतात दिनांक 30 मे 2023 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी त्यांची दुचाकी पंधरा हजार रुपये किमतीची चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी पंकज कदम यांच्या फिर्यादीनुसार अंमळनेर पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील हे करीत आहे.
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस वाढवून नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील जैतपिर या गावातील रहिवासी असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी चोरट्यांनी दिनांक 29 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाढवून नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यास आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील एका तालुक्यात एका बँकेच्या शाखेत भारतीय चलनातील असलेले बनावट 3 हजारांच्या नोटा एका इसमाने चलनात आणल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारोळा शहरातील एच डी एफ सी बँक शाखेत दिनांक २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित आरोपी राजू आत्माराम पाटील रा. चोरवड तालुका पारोळा यांनी भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या दराच्या सहा नोटा खरे असल्याचे भासवत बँकेतील मशीनने चेक केले असता त्या बनावट स्वरूपाच्या नोटा आढळून आल्या याप्रकरणी जितेंद्र खरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्थानकात संशयित आरोपी राजू आत्माराम पाटील यांच्या विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक विध्यार्थिनी १० वीची परीक्षा दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या म्हणजेच 2 जून रोजी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. १० वी चा निकाल कसा पाहाल? अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा. महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा. सीट नंबर आणि तुमच्या आईचे…
जळगाव : प्रतिनिधी धामणगाव जवळील तापी नदीपात्रामध्ये अंघोळ करत असताना अचानक फिट आल्याने रवींद्र आत्माराम कोळी (३०, रा. जैनाबाद) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जैनाबाद येथील रवींद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला. रवींद्र हा एकटाच नदीपात्रामध्ये अंघोळ करीत होता. तर त्याचे दोन मित्र काही अंतरावर बसलेले होते. अचानक रवींद्र याला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला.…
छत्रपती संभाजी नगर ; वृत्तसंस्था कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे. हि घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र धृवे आणि ओमजय सूर्यवंशी या दोघांमध्ये मटणाचा वाद सुरू होता. या वादात ओमजयने जितेंद्रच्या डोक्यात रॉड मारली. मारहाण झाल्यानंतर जितेंद्रचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धारला येथे शेतात मटणाची पार्टी सुरू होती. या पार्टीत मटन कोण जास्त खाणार? यावरून दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर ओमजयने केलेल्या हल्ल्यात जितेंद्रचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दोघे मित्र असून मध्य…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी नुकताच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे कौतुक करीत एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. निळवंडेसाठी ५३ वर्षे वाटं पाहावी लागली. प्रकल्पाबाबत अनेक चढ-उतार आले. झालं गेलं गंगेला वाहिलं आता स्वच्छ पाणी येणार. मी शेतकऱ्यांचा मुलगा हे काही लोकांना सहन…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या एका वाटर पार्कमध्ये शुटींग करीत असल्याच्या शुल्लक कारणाने पार्कमधील काही कर्मचारीनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने एमआयडीसी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जळगाव जिल्ह्यात कडाक्याचे उन पडत आहे. त्यामुळे अनेक तरुण शहरानजीक असलेल्या झुलेलाल वाटर पार्क परिसरात जात आहेत. याठिकाणी आर्यन प्रितेश भावसार (वय-१९, रा. भवानी पेठ, आठवडे बाजार, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह सोमवारी २९ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास झुलेलाल वाटर पार्क फिरण्यासाठी आले होते. फिरत असताना कपडे बदलत असतांना शुटींग करत आहे या संशयावरून आर्यन भावसार याला…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय महिलेचा एका डॉक्टराने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावी ५५ वर्षीय महिला रहिवासास आहे. दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेने संशयित आरोपी डॉक्टर पाटील याला सांगितले की या ठिकाणी गाडी पार्किंग करू नका याचा राग आल्याने संशयित आरोपी डॉ.पाटील यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली जर तु पोलिसात माझ्याविरोधात तक्रार दिली तर तुला व परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील यावेळी दिली. या महिलेने पाळधी दूरक्षेत्र पोलिसात धाव घेत संशयित आरोपी डॉ.उत्पल्ल…

