Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी जबरी घरफोडी करीत लाखो रुपयांचा सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील रहिवासी संजय परशुराम पाटील हे शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि १६ रोजी रात्री ९ वाजेपासून ते १७ रोजी सकाळी ५ वाजे दरम्यान अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल १ लाख १८ हजार ५८३ रुपये किमतीचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.राजेद्न कोळी हे करीत…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव तालुक्यात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो पोलिसांनी खरजई रोडवरील रेल्वे गेटजवळ ताब्यात घेत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त केल्यानेे शहरातील गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवार, 14 जून रोजी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गुलाब कोतकर (24 गुरुवर्य नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरजई रस्त्याने चाळीसगांवकडे येणारा पिकअप (एम.एच. 19 सी.एक्स.0083) मध्ये गुटखा येत असल्याचा संशय नागरीकांना आल्यानंतर बुधवारी नागरीकांनी वाहन अडवल्यानंतर त्यातील गुटखा पाहून जमावाने वाहनाच्या काचा फोडत वाहनातील चालक अक्षय गुलाब कोतकर यास चोप दिला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील एका ठिकाणी जुन्या वादातून दोन तरुणात झालेल्या मारहाण झाली यावेळी एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत मंगल शांताराम शेळके हा तरून मृत्यू झाला असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी लागलीच संशयित आरोपी राहुल पाडळे या तरुणास ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील मंगल शेळके व राहुल पाडळे या दोघा तरुणांचा जुना वाद होता. या वादातून १६ रोजी रात्रीच्या वेळी दोघात फेकरी उड्डाण पुलाजवळ जोरदार वाद होत हाणामारी झाली. जुना वाद उकरुन राहुल पाडळे याने…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील नवव्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने शाळेत प्रचंड खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार, 14 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यंत प्रतिष्ठीत शाळेतील विद्यार्थ्याकडेच गावठी कट्टा आढळल्याने या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे तर या विद्यार्थ्याने हा कट्टा कुठून वा का आणला? या बाबीचा फैजपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे. भुसावळातील एका भागातील रहिवासी असलेल्या कर्मचार्‍याचा मुलगा अकलूदजवळील पोदार शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यात अनेक दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकात ही घटना घडली आहे. शिवशाही बसच्या टायरला आग लागल्यामुळे बसने पेट घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  गेल्या ३ मेपासून मणिपूरमध्ये सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री 5 वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या घटना घडल्या. इंफाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर शेकडोंच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सुरक्षा दलांनी जमावाला पळवून लावले. दुसऱ्या एका घटनेत भाजप आमदार विश्वजित यांच्या घराला जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केला. मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स टीमने तो प्रयत्न हाणून पाडला. तिसरी घटना सिंजेमाईची आहे. इथे जमावाने भाजप कार्यालयाला घेराव घातला, मात्र लष्कराच्या जवानांनी गर्दी पांगवली. चौथ्या घटनेत शुक्रवारी रात्री उशिरा राजधानी इंफाळमधील पोरमपेटजवळ भाजपच्या महिला अध्यक्षा शारदा देवी यांच्या घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न जमावाने केला.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागात आज देखील पहाटे लवकर उठून शेतात कामासाठी अनेक शेतकरी जात असतात. पहाटेच्या सुमारास कमी असलेल्या उन्हात दुपारपर्यत काम करीत असतात. पण याच पहाटे उठून शेतात गेलेल्या शेतकरीने वखरणी केली अन त्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि घटना धरणगाव तालुक्यातील तरडे या गावात घडली आहे. काय आहे घटना धरणगाव तालुक्यातील तरडे गावातील रमेश विश्राम पाटील ६० वर्षीय वृद्ध शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात पाणी भरून येवून रात्री परीवारासोबत जेवण करून झोपून गेले तर पहाटे लवकर उठून शेतात वखरणी करण्यासाठी रमेश पाटील हे गेले होते. वखरणी केल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच शेतात…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवार दि. १६ जून रोजी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ देवाला देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करीत संकल्प सोडला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. अमळनेर येथील सभेला उपस्थिती दिल्यानंतर त्यांनी मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळ देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी मंदिरात येऊन गेलो. मंदिराच्या विकासासाठी पूर्वी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो पूर्ण झाला नाही, आता पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्याच्या माध्यमातून विकासात्मक कामे सुरू आहेत. मंदिराच्या विकास कामांसाठी आम्ही नेहमी पाठपुरावा करीत असतो. यामुळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, एवढी शिवसेना – भाजपची युती कमजोर नाही. देवेंद्र व आमची मैत्री एकदम जोरदार आहे, असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी पालघर येथील कार्यक्रमात आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले. पण प्रत्यक्षात व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर जवळपास 10 मिनिटे या नेत्यांत कोणताही संवाद झाला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांत नक्की काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिंदेंनी शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अभ्यासक्रमातून सावरकरांचे धडे वगळण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पाळले. हे धडे वगळल्याने सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही, हे पाहणे सरकारचे काम आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ते जळगावमध्ये बोलत होते. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. तर गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते त्यांनी खोके देऊन या राज्यात सरकार आणले, जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी जळगावमध्ये बोलताना व्यक्त केला…

Read More