Author: editor desk

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था  राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमातील एका अडीच महिन्यांच्या बालकाची कॅनॉटमधील व्यापाऱ्याला तब्बल पाच लाखांना विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश दामिनी पथकाने केला. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप श्रीहरी राऊत (५२, रा. तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) व त्याची पत्नी सविता दिलीप राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अाश्रमावर बंदी घातली अाहे. भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शिवशंकर कॉलनीतील जिजामाता अनाथाश्रमाचा संस्थाचालक एका अडीच महिन्यांच्या बाळाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरून दामिनी पथकाच्या निरीक्षक अनिता फसाटे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात असलेल्या एका ठिकाणी रिक्षातून नेत रिक्षा चालकासह एकाने तरुणाला चाकूचा धाक दाखवीत खिशातून पैशांसह मोबाईल लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी असलेल्या जितेंद्र राम किशन मोर्या (वय २२) हा तरुण दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरून एका अनोळखी रिक्षात बसत घरी जाण्यासाठी निघाला असता त्याला अनोळखी रिक्षा चालकाने रस्ता बदलवीत या ठिकाणी न नेता मेहरूण तलावाच्या जंगलात नेऊन तू जर पोलिसांना तक्रार करशील तर तुला जिवंत ठेवणार नाही…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहितेचा पतीने अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी तर सासरा व नदोईने विनयभंग केल्या प्रकरणी पहूर पोलिसात अत्याचाराच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या विवाहितेस सासरची मंडळींनी २१ एप्रिल २०२२ पासून तिला लग्नात हुंडा न दिल्याने तुझ्या माहेरून १० लाख रुपये घेवून यावे अशी सातत्याने मागणी करीत आहे. याच बरोबर विवाहितेच्या पतीने तिच्या सोबत तिच्या समती वाचून अनैसर्गिक कृत्य तर सासरा, नंदोई याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला तर सासऱ्याच्या बाकीच्या लोकांनी तिला १० लाख…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच चोरट्याने तब्बल 12 लाख रुपये किंमतीचे 26 तोळे वजनाचे दागिनेच लांबवण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना चोपड्यानजीक अकुलखेडा येथील सौभाग्य लॉनमध्ये घडली. सोमवारी दुपारी 12 ते 1.30 दरम्यान घडली. चोरी प्रकरणी पोलिसांना एकावर संशय असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. चुंचाळे देवेंद्र नारायण चौधरी (53) यांच्या मुलीचा सौभाग्य लॉन्समध्ये सोमवारी सकाळी साखरपुडा असल्याने वर्‍हाडींची लगबग सुरू असताना त्यांनी दागिणे एका बॅगमध्ये 26 तोळे वजनाचे दागिणे ठेवले होते. सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चौधरी दागिने घेण्यासाठी गेले असता बॅगेची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरपूड्यात मोठी खळबळ उडाली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री मानले जाणारे मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आता एका प्रकरणात जळगाव जिल्ह्या न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड केल्याचे वृत्त समोर आले आहे. काय आहे प्रकरण ? राज्यातील युती सरकारमध्ये एकनाथराव खडसे बारा खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात खडसे यांनी 2016 मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे. पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  राज्यात नुकताच ठाकरे व शिंदे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकाच्या विरोधात टीका करीत हा दिवस साजरा केला तर यात आता भाजपचे केद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उडी घेत ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लाज काढली आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे ? वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. “केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. हिंदूंची फसगत झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार देश चालवायला लायक नाही हेच त्यावरून स्पष्ट होते. डबल…

Read More

अमळनेर : प्रतिनधी  एकाच शहरात वडील व मुलीचे घर असल्याने वडील सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी गेले असता चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वडिलांच्या घरात धुमाकूळ घालीत हजारो रुपयाच्या  सोन्यासह रोकड लंपास केल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरातील शास्त्री नगरातील स्वामी समर्थ रो हाऊस मधील घर नंबर तीन मधील रहिवासी प्रमिला हरिश्चंद्र वाडेकर (वय ५४) यांचे पती दिनांक १८ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंदडा नगरातील मुलीकडे गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात धुमाकूळ घातला होता या घरातून तब्बल ३२ हजारांच्या सोन्यासह चांदीचे दागिनेसह रोकड लंपास केल्याची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला. शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को संकुलातील कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जवळपास तासभराच्या भाषणात ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे… गेल्या वर्षी 20 तारखेला क्रांतीला सुरुवात केली हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे, गौरवाचा आहे आम्ही आम्हाला टिकेला उत्तर कामाने देणार शिवसेनेच्या नेत्यांच्या कामातून , घामातून शिवसेना उभी राहिली आहे. त्यांच्यावर टीका करत आहात. मी शिवसेनेसाठी मेहनत घेतली, कुटुंबाची पर्वा केली नाही लोकसभेची निवडणूक होती…त्यावेळी आई रुग्णालयात होती…त्यावेळी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एकाने कुरियरने तलवार मागविल्याप्रकरणी गांधलीपुरा भागातील पिता पुत्राला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे याना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावली. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्टेशन रोड कडून मोटरसायकल क्रमांक एम एच १५ जी क्यू ५९०४ वर अदनान सादिक खाटीक (वय १९) रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा हा पांढऱ्या गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला. त्याला विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक (वय…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी  यावल तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा मध्यरात्रीच्या सुमारास एकाने विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी एका विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात विवाहित आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक १९ रोजी विवाहिता आपल्या परिवारासह गच्चीवर झोपलेले असताना या ठिकाणी पहाटे चार वाजेच्या सुमारास एक इसम येऊन गच्चीवर झोपलेल्या विवाहितेसोबत चुकीचे कृत्य करीत विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न झाल्या प्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीस स्थानकात धाव घेत एक इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहेकॉ.गोकुळ तायडे हे करीत आहे.

Read More