Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी गावातील २० वर्षीय तरुणाचा साखरपूड्यानंतर काही दिवसांवर लग्न आल्यानंतर घरात उत्साहाचे वातावरण असतानाच रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी घडली आहे. यात प्रवीण पितांबर मोरे-भील (20, रा.मोहाडी, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे. प्रवीण मोरे हा मोहाडी गावामध्ये आई-वडील लहान भाऊ आणि बहिणीसह वास्तव्याला होता. प्रवीण आणि त्याचे वडील दोघे ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात. प्रवीण भील याचा मे महिन्यात साखरपुडा झाला होता, जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे अवघ्या काही दिवसांनी प्रवीण याचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मात्र मंगळवारी रात्री प्रवीण मोहाडी गावाच्या पुढे सावखेडा शिवारातील रेल्वे…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  फुले मार्केट मधील हॉकर्सला दुकाने लावू देत नसल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्यांना मार्केटमध्ये व्यवसाय करू द्यावा या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मनपावर धडक मोर्चा काढला. त्यांनी 13 मजले पायी चढून अनोखे आंदोलन पद्धत राबविली. निवेदनात असे म्हटले आहे की, मागील १ महिन्यापासून हॉकर्स बांधवांना उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉकर्स बांधवावर अतिक्रमण विभागाने तीव्र कारवाई केल्याचे त्यांचे पूर्णताः व्यवसाय बंद असल्याने त्याच्या परिवाराची जीवन चक्र कोलमडले आहे. हॉकर्स जे व्यवसाय करतात संपूर्ण कुटूंबाचे उदारनीर्वाह अवलंबून असते मुलांची शिक्षणाची जबाबदारी वृद्ध आई-वडीलांची दवाखाना असो त्यामुळे हॉकर्स बांधव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मढी चौक येथे नीलेश चंद्रकांत ठाकूर हे वास्तव्यास आहेत ते रिक्षाचालक असून रेल्वेस्थानकावर रिक्षा लावून प्रवासी वाहतूक करतात. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नीलेश ठाकूर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या रिक्षात प्रवासी भरत असताना, यावरून त्यांच्याशी तौसिफ शेख शकील अहमद (४५) व ओसामा शेख अब्दुल सत्तार (४२) या दोघांनी वाद घातला. याच कारणावरून तौसिफ, ओसामा या दोघांसह आणखी पाच जणांनी नीलेश ठाकूर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तोंडावर…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील प्रताप मिल कंपाउंड परिसरात असणाऱ्या एका घराचा कड़ी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री घडली. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रताप मिल कंपाउंड परिसरात राहणाऱ्या कैलास शांताराम  बिरारी यांच्या घरी दि. २० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा टॉमीच्या साहाय्याने कडी कोंडा तोडून घरातील कपाटात असणाऱ्या सुमारे १७ ग्रॅम वजनाचे ४२  हजार ५०० रुपये किंमत असलेली मंगल पोत, व चार ग्रॅम वजनाची १० हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे कानातील कर्णफुले व खिशातील नऊ हजार…

Read More

रावेर : प्रतीनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉन विरोधात मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचा दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास व २० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घराबाहेर व गावातील बाजारात सतत पाठलाग करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने संशयित आरोपी शेख फिरोज शेख युनूस उर्फ डॉन (वय २७) याच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे…

Read More

बोदवड : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील शेलवड शिवारात जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथील एका ३४ वर्षीय मोतीलाल भीमराव सपकाळे याने गळफास घेत आपली जीवनयात्रा बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. बोदवड तालुक्यातील सीताराम भावडू धनगर यांच्या शेताच्या बांधावरील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने मोतीलाल सपकाळे याने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नैराश्यातून गळफास घेतला. याप प्रकरणी नामदेव नथु सपकाळे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस…

Read More

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मंडळातील एक मंत्री कार्यकर्त्याला शिवीगाळ करीत असल्याची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंत्री देखील अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांची एक कथिक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये ते आपल्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत आहेत. त्याचबरोबर ते या कार्यकर्त्याला धमकीसुद्धा देत आहेत. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच शेअर केली जात आहे पण या ऑडिओ क्लीपची पुष्टी सकाळ माध्यम करत नाही. “तू लोकांच्या जीवावर उड्या मारतो का? दारू पिऊन शिव्या देतो का? तुझ्या घरी येऊन दाखवतो…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून बुधवारी रात्री अटक केली. दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्याने तिचा तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने वार करून खून केल्याची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली दिली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हिंगणे येथील राहुल दत्तात्रेय हंडोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. न-हे, मूळ कोपरगाव, जि. अहमदनगर) हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ६ हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मांडवेदिगर फाट्याजवळ पकडताच भुसावळ तालुक्यातील लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड थरकाप उडाला आहे. या घटनेत गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला. काय आहे घटना ? कुर्‍हे पानाचे परीसरातील 35 वर्षीय शेतकरी तक्रारदार असून त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्‍यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार असून अन्य शेतकर्‍याची पाच हजार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  जून महिना संपत आला असला तरी मान्सून काही येण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांसह शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाने कुठे दडी मारली याच प्रश्नाने सर्व चिंतातूर आहेत. मात्र हवामान खात्याकडून आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 22 जून रोजी मुंबईत मध्यम आणि 23 आणि 24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील चार दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनार्‍यावर दक्षिण-पश्चिम वाऱ्यांचा वेग मंदावला…

Read More