पुणे : वृत्तसंस्था बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सजग नागरिकाने अचानक शाळा भेट केल्याने सदर प्रकार समोर आला. ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती येथील शाळेतील आहे. याबाबतचा व्हिडीओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र सरावलेल्या शिक्षकाने ती वाया घालवली आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी पहावा लागला. शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी शहरातील एका रस्त्यावर तलवारीद्वारे केक कापून जल्लोष करणार्या तरुणाईला चोपडा पोलिसांनी कारवाई करीत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली. या कारवाईन शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी हवालदार निलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहरातील शेतपुरा भागातील रहिवासी सय्यद फैजल अली मझहर अली, रॉयल एजन्सी समोर मास्टर कॉलनी मधील रहिवासी शाकीर सय्यद साबीर अली, दानिश सय्यद साबीर अली, शेतपुरा भागातील रहिवासी रीजवान अली अयाज अली, मास्टर कॉलनीमधील रहिवासी दानिश शेख हमीद शेख, के.जी.एन कॉलनीमधील रहिवासी बाबू लोहार…
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काल पाटणा येथे विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील सर्व विरोधी पक्ष मोदींविरोधात एकत्र आले होते. २०२४ मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी नवीन डाव आखला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होके. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथे भरधाव अनोळखी अनोळखी वाहनाच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीने जात असलेले पती-पत्नी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात आई वडिलासोबत असलेल्या लहान मुलाला मात्र किरकोळ मार लागला आहे. या घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार. जामनेर तालुक्यातील सामरोद येथील ३५ वर्षीय शेनफडू बाबुराव कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह सामरोद येथे कुटुंबासह शेती काम करून राहतात. ते शनिवारी २४ जून रोजी सकाळी आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. तेथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात आज सकाळी महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी समाजबांधवानी आक्रमक पवित्रा घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगर परिसरातील एका भागात महापुरूषाचा पुतळा असून आज सकाळी या पुतळ्याची विटंबना झाली असल्याचा प्रकार परिसरातील नागरिकांना दिसून आले. यामुळे काही वेळ या परिसरातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी समाजबांधव आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी येथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. या संदर्भात कुणीही अफवांना थारा देऊ…
जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक घरफोडी तर चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच शहरातील दौलत नगर भागातील बंद घरातून चोरट्यांनी ९० हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी गुरुवारी दुपारी 2दोन वाजता अज्ञात चोरट्यांविरुध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दौलतनगरात संतोष भाऊलाल नेटके हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहेत. नेटके हे जळगाव तालुक्यातील पाथरीचे आहेत मात्र मुलांच्या शिक्षणासाठी ते जळगावात राहतात. मंगळवारी ते आपली पत्नी सोनी नेटके व मुलगी भूमिका यांच्यासह पाथरी येथे गेले असता घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. बुधवारी रात्री घर फोडून…
मुंबई : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी चिंतेत असतांना आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मान्सूनमुळे पेरण्या रखडल्यानं बळीराजा चिंतेत आहे. आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही राज्यातील काही भागांत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. नवी मुंबईत पावसाची हजेरी नवी मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळी नवी मुंबईत अचानक पावसानं हजेरी लावली. अचानक…
जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडून रस्ते कामांच्या ना हरकत प्रमाणपत्र येण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने 53 कोटीचे निविदा प्रक्रिया राबवून अजब कारभार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराबाबत महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापौर यांनी याबाबत नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील कलगीतुरा या प्रकरणामुळे दिसून येत आहे. जळगाव महापालिकेच्या महासभेत शहरातील रस्त्यांच्या कामांना ना हरकत देण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार महापालिकेने पीडब्ल्यूडीकडे रस्त्यांची अंतिम यादीची मागणी केली होती. ही यादी प्राप्त झाल्यानंतर ज्या ठिकाणी मनपाकडून कामे सुरु आहेत किंवा इतर निधीतून…
अमळनेर : प्रतिनिधी प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन असल्याने आता जग फार जवळ आल्यासारख वाटतंय…कोणतीही माहिती लागली की आपण पटकन मोबाईल काढतो अन गूगलवर शोधतो. अशीच एक माहिती विश्वातील एकमेव अति दुर्मिळ, अति प्राचीन व अति जागृत असलेल्या अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिराची माहिती गत महिन्याभरात ३० हजार भाविकांनी शोधली. विशेष म्हणजे केवळ शोधली नाहीत तर मंदिरात येऊन गेलेल्या भाविकांनी आपला अभिप्राय, प्रतिक्रिया तसेच मत देखील मंदिराच्या संकेतस्थळावर नोंदविले आहे. पुजेला येण्याची वेळ, ऑनलाइन अभिषेक बुकिंग, इतर प्रश्न शेअर केल्यात. मंदिर प्रशासनाने ही तत्परतेने भाविकांनी विचारल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याने मंदिराच्या संकेतस्थळाचा रिव्ह्यू वाढला. त्यामुळे गुगुलने देखील दखल घेत नुकतेच…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील रुग्णालयात रुग्णांची वाढलेली गर्दी पाहून एकाने महिला डॉक्टरांना वारंवार स्पर्श करून त्यांच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी एकाविारोधात एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल जीवन पाटील (जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ४७ वर्षीय असलेल्या महिला डॉक्टर एका रुग्णालयात सेवा देतात. शुक्रवार, 16 जून रोजी सायंकाळी दवाखान्यात गर्दी वाढल्यानंतर या गर्दीचा गैरफायदा घेत अनिल पाटील याने महिला डॉक्टरांना वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने महिला डॉक्टर वैतागल्या. त्यांनी या प्रकरणी गुरुवार, 22 जून रोजी संबंधीत इसमाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात…

