Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस हवालदाराला सहा हजाराची लाच घेताना अटक !
    क्राईम

    पोलीस हवालदाराला सहा हजाराची लाच घेताना अटक !

    editor deskBy editor deskJune 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ६ हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मांडवेदिगर फाट्याजवळ पकडताच भुसावळ तालुक्यातील लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड थरकाप उडाला आहे. या घटनेत गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

    काय आहे घटना ?
    कुर्‍हे पानाचे परीसरातील 35 वर्षीय शेतकरी तक्रारदार असून त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्‍यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार असून अन्य शेतकर्‍याची पाच हजार रुपये किंमतीची मोटार अलीकडे चोरीला गेल्यानंतर संबंधित शेतकर्‍याने तालुका पोलिसांना माहिती कळवली होती. कुर्‍हे बीटचे हवालदार गव्हाळे यांनी शेतकर्‍याच्या तोंडी तक्रारीवरून तक्रारदार असलेल्या शेतकर्‍याशी संवाद साधून संबंधित शेतकर्‍यांचा तुमच्यावर मोटार चोरीचा आरोप असून प्रकरण मिटवण्यासाठी मला एक हजारांची व मोटार चोरीपोटी पाच हजार रुपये संबंधिताना देण्याची मागणी केली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे बुधवारी याबाबत तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. गव्हाळे यांची बुधवारी रात्र गस्त असल्याने त्यांनी ड्युटी आटोपल्यानंतर पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावले. शेतकर्‍याकडून सहा हजारांची लाच घेताच दबा धरून असलेल्या पथकाने गव्हाळे यांना अटक केली.

    #acb #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.