Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते घट्ट असते. मात्र, जामनेर तालुक्यातील एका गावात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासला आहे. जिवलग मित्राच्या पत्नीलाच प्रेमात अडकवले आणि ही महिला मुले, पती, सासू-सासरे व आई- वडीलांना सोडून रफूचक्कर झाली. या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे. बोदवड तालुक्यातील माहेर असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचे लग्न जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत झाले. संसार गाडा सुरू असताना त्यावर दोन फुले उमलली एक सहा वर्षे तर दसरा चार वर्षांचा आहे. संसार सुखाचा सुरू असताना मित्राने घात केला. जिवलग मित्र असल्याने घरी येणे-जाणे होतेच त्या मित्राने मित्राच्या पत्नीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढले, ती माहेरी आली यानंतर माहेरहून अचानक मुलांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका ५५ वर्षीय इसमाने दि २३ रोजी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना असोदा रेल्वेगेटजवळ घडली आहे. शेतीच्या हिस्से वाटणीवरुन भावंडांमध्ये वाद सुरु होता. चार भावंडांनी शेतीची वाटणी केली मात्र एकाला मात्र हिस्सा दिला नाही. त्याच कारणावरुन संजय सपकाळे (वय-55, रा. कुवरखेडा ता.जि. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) यांनी आत्महत्येपुर्वी सपकाळे यांनी आपल्या शालकाला फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडीत संजय सपकाळे हे पत्नी व मुलीसोबत रहायला असून ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील ४ बड्या अधिकारीची सोमवारी उशिरा पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने येणार आहेत. सोमवारी काढण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशामुळे राज्यभरातील १०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यांना तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. बदल्यानमध्ये जळगावचे डीवायएसपी संदीप गावित यांची पाचोरा विभागात बदली करण्यात आली आहे. राकेश जाधव यांची अमळनेर येथून जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे तर…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे व भाजप मध्ये सुरु असलेले वाक्ययुद्ध पुन्हा एकदा सुरु झाले आहे. नुकतेच त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंदिरात जात महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणेंच्या दौऱ्या पूर्वी त्रंबकेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तिथे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय. संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. तुझ्या मालकाने नवीन मातोश्री का बांधली? देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी झाली. त्यांच्या या चौकशीनंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, अजित पवारांनी त्यांना फोन केला नाही. अजित पवारांनी जयंत पाटील यांना फोन न केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असतात. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांकडून या चर्चा नेहमी फेटाळण्यात येतात. अशात जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीनंतर अजित पवारांनी त्यांना फोन न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या अनेक महिन्यांपासून मुक्ताईनगर शहरमार्गे मध्य प्रदेशातून गुटक्याची अवैध तस्करी होत आहे. याकडे पोलिसांची भूमिका मात्र बघायची असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यापूर्वी अनेक कारवाया पोलिसांनी केलेले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुटख्याची गाडी पकडून गाडीसह लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांच्या स्वाधीन केला. आमदारांना याची माहिती मिळते मात्र पोलिसांना मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे. मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर शहराकडे येणारी गाडी क्रमांक एम एच 19 सी वाय 92 87 या गाडीत गुटखा असल्याची माहिती आमदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत दोन दिवसापासून खालावल्याने आज त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत.  कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने हिंदुजा रुग्णलायात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात दोन जणांची निर्घृण हत्या झाल्याने तालुक्यासह शहरात मोठी खळबळ उडाली असल्याची घटना आज मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचार्‍याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली असून खूनाचे स्पष्ट कारण समोर आले नसलेतरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेटमध्ये रहिवासी असलेले हेमंत श्रवणकुमार भूषण हे भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न आराध्या हेमंत भूषण (23) हिच्याशी झाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सावखेडा परिसरातील गिरणा नदी पात्रात पोहताना फिट आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील राजू भूरा भिल (वय-३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजू भिल हा तरुणा आपल्या परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिटचा आजार होता. रविवारी दुपारी १ वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्राच्या पाण्यात पोहत असतांना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सुप्रीम कॉलनीत पानटपरीमधून सामान उधार देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पानटपरी चालकास बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश ऊर्फ भावड्या संतोष राजपूत (वय २२, सुप्रीम कॉलनी) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास टपरी बंद करून उमेश हा घरी जात होता. पानटपरीतील सामान उधारीने देत नसल्याच्या कारणावरून शारदा शाळेच्या प्रांगणाजवळ किरण चितळे (वय १९) विजय, बेंडा बाप्या, आकाश, पप्पू माचिस, रोहित (पूर्ण नाव समजू शकले नाही.) (सर्व रा. सुप्रीम…

Read More