जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीस एका तरुणाने घरातून पळवून नेल्याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या एका गावातून १७ वर्षीय मुलीस दिनांक २४ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गावातील एका तरुणाने काही तरी फूस लावून पळून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पहूर पोलीस स्थानकात एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल केले करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार हंसराज मोरे हे करीत आहे.
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर काही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात चांगाल पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. पाहुयात राज्यात कुठे कुठे पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल…
जळगाव : प्रतिनिधी येथे एसटीने निघालेल्या महिला व तिच्या कुटुंबीयांच्या सुटकेसमधील सोन्याचे दागिने व रोकड असा ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी जळगाव येथे आकाशवाणी चौकापासून तर रेल्वे स्टेशन परिसरात लांबविल्याची घटना घडली. जामनेर येथील अशोक नगरमधील महिला ही पती, मुले व सासूसोबत नंदुरबार येथील लग्नाला जाण्यासाठी शनिवारी एसटी स्टॅन्डवर आली. जळगावला जाणाऱ्या एसटीत बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या सीटखाली चार बॅगा ठेवल्या. नेरी येथून चढलेल्या चार महिलांपैकी एक लहान बाळासह बॅगेजवळ बसली होती. आकाशवाणी चौकात त्या महिला उतरल्या. बसस्थानकावर फिर्यादी महिला ही कुटुंबीयांसोबत उतरून रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे गेल्या. स्टेशनवर बॅग उघडून पहिली असता दागिने व रक्कम लांबविल्याचे लक्षात आले. यात १८ हजारांचे कानातील…
रावेर : प्रतिनिधी राजकीय पदाधिकाऱ्याबाबत इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी येथील समर्थ क्लासेसचे संचालक दीपक पाटील (२५, रा. बोंडेवाडा, सावदा) यांच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना संन्यास यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पाटील यांनी समाजमाध्यमावर ही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यानंतर रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील काही लोकांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आपल्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. एम. शिंदे, डॉ. कुणाल सोनवणे, सपोनि नीलेश वाघ, जालिंदर पळे यांच्यासह दंगा नियंत्रण…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका महिलेला दुचाकीवरून सोडण्याच्या बहाण्याने तिला जंगलात नेत अत्याचार केल्याची घटना पारोळा तालुक्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला असून रविवार २५ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास याच गावातील संशयित लखन पवार याने पिडीत महिलेला ओळखीचा फायदा घेत दुचाकीवर बसवून जंगलात नेत त्याने पीडीतेचे तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरीने अत्याचार केला. भेदरलेल्या पीडीतेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत लखन पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) भल्या पहाटे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. जितेंद्र राजु राठोड (वय – १९) व साक्षी सोमनाथ भोई (वय -१८), असे प्रेमी युगलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय वसावे मॅडम, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल झालेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तर…
मुंबई : वृत्तसंस्था रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. दापोलीत रविवारी ट्रक आणि मॅजिक प्रवासी रिक्षाची भीषण धडक झाली. या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना तीन जणांचा उशिरा रात्री मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दापोली हर्णे मार्गांवरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक…
मुंबई : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे राज्यात मान्सूनने तब्बल २० दिवस उशिरा राज्यात कोसळला आहे. त्यात हा पाऊस मुंबईसह कोकणात दमदार पाऊस झाला असून पण उत्तर महाराष्ट्रात अजून देखील पावसाची रिपरिप सुरु झालेली नाही. मान्सूनने रविवारी एकाच वेळी दिल्ली-मुंबईत सलामी दिली. मुंबईत दोन आठवडे उशिराने, तर दिल्लीत दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. हा योगायोग ६२ वर्षांनंतर आला. यापूर्वी मान्सून २१ जून १९६१ रोजी दिल्ली-मुंबईत एकाच वेळी दाखल झाला होता. महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यात मान्सून दाखल झाला आहे. रविवारपासून पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार २९ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये ८ दिवस उशीरा दाखल झाल्यानतंर मान्सूनने रविवारी…
चाळीसगाव : प्रतिनिधी शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना २३ रोजी सायंकाळी खडकी रस्त्यावर घडली. धडक देणारा कारचालक कार सोडून पळून गेला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कारचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील गजाननवाडी, शास्त्रीनगर येथील गोपाल पुंडलिक कुंभार यांचे खडकी बुक शिवारात शेत आहे. दि. २३ रोजी सायंकाळी चार वाजता गोपाल कुंभार हे पुतण्या राहुल राजू कुंभार (वय २४) याच्यासह एमएच १९ बीए ३६६५ या टचालीने चाळीसगावकडून खडकीकटे शेतात जात असताना रुद्र हनुमान मंदिराजवळ दुचाकीच्या मागून येणाऱ्या एमएच. १२…
जळगाव : प्रतिनिधी भारतीय सैन्य दलात स्पोर्टस् कोट्यातून चालक म्हणून भरती करून देतो, असे आमिष दाखवित एका तरुणाची ६ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील अर्जुन सोपान गवळी (वय.२३) हा युवक अनेक दिवसांपासून खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या ओळखीचे संतोष रमेश वराडे (वय ५०, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी अर्जुनला सैन्यात लावून द्या असे सांगितले, तसेच यासाठी पैसे भरावे लागतात, तुम्ही पैसे दिले तर अर्जुनला स्पोर्टस् कोट्यातून सैन्यात चालक म्हणून नोकरी मिळू शकते…

