मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलेला असतांना आता याला हिरवा कंदील केद्रातून मिळाला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील व भाजपमधील अनेक आमदारांनी मंत्रीपद मिळावे यासाठी मोठी फिल्डिंग देखील लावलेली दिसून येत आहे. तर येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट असून राज्य मंत्रिमंडळासोबतच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना देखील वेग आला आहे. केंद्रात देखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्री आशी दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राज्य मंत्रिपदासाठी खासदार प्रतापराव जाधव व भावना गवळी यांची नाव चर्चेत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रखडलेल्या राज्य…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरात सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खननावर तालुका पोलीसानी मोठी कारवाई करीत एकाच दिवशी तब्बल तीन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहर परिसरात असलेल्या खेळी आव्हाने या गावातील नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाढू उत्खनावर जळगाव तालुका पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल तीन ट्रॅक्टर पकडत पोलीस ॲक्शन मोड मध्ये आले असल्याचे कारवाई झाली आहे त्यामुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दि. २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणा रोडवर सुमारे अर्धा ब्रास अवैध वाळूच्या ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळताच. तालुका पोलीस स्थानकाचे पोकॉ.अभिषेक पाटील दिलेल्या…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड क्षेत्रात अनेक अभिनेत्रीमध्ये नेहमीच चर्चेत असलेली सोनम कपूर सोशल मिडीयावर देखील चर्चेत असते. सध्या बॉलिवूड सेलिब्रेटी ओटीटीमुळे हतबल झालेले दिसत आहेत. चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर घसरण होत आहे. अशातच अभिनेत्री सोनम कपूरलाही मोठा धक्का बसला आहे. कारण तिनं कधी विचारही केला नव्हता की ज्या चित्रपटात ती काम करत आहे तो चित्रपट थेट ओटीटी रिलीजवर प्रदर्शित होईल. 2011 च्या ‘ब्लाइंड’ या कोरियन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सोनम कपूर एका अंध पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 7 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. याबाबत सोनमसोबत चर्चा झाली नसून निर्मात्यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे. तसेच…
मुंबई : वृत्तसंस्था १ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे करत आहेत. तर त्याचदिवशी त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोर का झटका दिला जाणार आहे. आदित्य ठाकरेंचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य 1 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचा मोठा कार्यक्रम असताना ठाकरेंना धक्का देण्याची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरूच ठेवली आहे.आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राहूल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहूल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू…
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा अचानक दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला असून केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्ती निमित्त राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट अनेक राज्यमंत्री पद येण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, शिंदे गटातील कोणाला मंत्री करायचे, याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात असल्याचे समजते. शिंदे- फडणवीस सरकार…
एरंडोल : प्रतिनिधी चाळीसगावकडून एरंडोलच्या दिशेने येणाऱ्या चालत्या पोलीस वाहनावर अचानक वृक्ष पडल्यामुळे एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मृत्यू तर जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस सुरू असतानाच पोलीस वाहनावर चिंचेचे जीर्ण झाड कोसळून झालेल्या अपघातात जळगाव गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एरंडोल शहरापासून काही अंतरावरील अंजनी धरणाजवळ हा भीषण अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने पोलीस दलात शोककळा पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पिलखोड जिल्हा बँक शाखेत वनविभागाच्या…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विध्यार्थी व तरूणासाठी क्रीडा मंत्री गिरीशभाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने क्रीडा संकुलसाठी ५० लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम.पाटील सर यांनी आज दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच अपूर्ण कामाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाईल जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच क्रीडा संकुल निधी अभावी कात टाकत होते धरणगाव तालुका क्रीडा संकुल साठी शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी तसेच क्रीडा शिक्षक प्रामुख्याने पी एम पाटील सर, संजय महाजन, भानुदास आप्पा विसावे,पप्पू भाऊ भावे, विजय भाऊ…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील दोन वर्षीय चिमुकला अंगणात खेळत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथ बुधवारी सकाळी घडली. कार्तिक शशिकांत बडगुजर (वय 2) असे मयत बालकाचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. पिंप्री येथील शशिकांत बाबूलाल बडगुजर यांचा कार्तिक बडगुजर हा दोन वर्षाचा मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंगणात खेळून झाल्यानंतर कार्तिक घरात आला व अचानक जमिनीवर पडला. हे पाहून कार्तिकचे आजोबा बाबूलाल बडगुजर यांनी नातवाला उचलले परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता त्यामुळे त्यांनी लागलीच डॉक्टरांना बोलावले.…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपरखेड गावात दि.२७ रोजी मंगळवारी गौण खनिजाचे डंपर अचानक मागे आल्यानंतर त्याखाली वडिलांचा दबून मृत्यू झाला तर सुदैवाने पित्याने मुलाला बाजूला ढकलल्याने मुलगा बचावला. यात दादाभाऊ जयसिंग गायगवाड (वय ५०) असे मयत पिता तर सागर गायकवाड (१९) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ते धुळे मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पिंपरखेड धरण परीसरातून मुरूम नेला जात आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या धरण सुमारास पिंपरखेड धरण परीसरातून डंपर (एम.एच.20 ई.जी. 6512) हा उभा असताना या डंपरच्या पाठीमागून दुचाकीने दादाभाऊ गायकवाड हे मासेमारी करून घराकडे जात होते. डंपर चालकाने अचानक डंपर मागे घेतल्याने डंपर मागे असलेल्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर म्हणून करण्यात आले आहे. या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारने न्यायालयाला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नसल्याची ग्वाही दिली. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याची सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसून निर्णय होईपर्यंत…

