नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज १ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका शाळेतील शिक्षिका असणारी महिला रस्त्याने पायी चालत असताना अचानक दुचाकीने दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना शुक्रवारी ३० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भगवान नगर मधील किलबिल शाळेजवळ घडली. याबाबत अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने भगवान नगरातील रहिवासी असलेल्या रोहिणी विजयकुमार नारखेडे (वय-३९) येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारी ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रोहिणी नारखेडे या भगवान नगरातील किलबिल शाळेजवळून पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची पोत जबरी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उखळवाडी येथे आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली. घरोघरी दिंडीची पूजन करण्यात आले आत्मरूपी चिमुकल्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हरिपाठ घेण्यात आला. विश्वात्मक जंगली महाराज कोकमठाण आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब सरचिटणीस तथा उखळवाडी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत रावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. या दिंडी सोहळ्यासाठी उखळवाडी गुरुकुलाचे उपाध्यक्ष संत पिठाचे संत गुरुकुलाच सचिव स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ पालक उपस्थित होते. गुरुकुलाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील मराठी शाळेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका योगिता हटकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दशरथ चव्हाण हे होते त्यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सोनार मॅडम, शिक्षिका पौर्णिमा भामरे, योगिता हटकर अंगणवाडी सेविका कमल चव्हाण तसेच जळके वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील, वसंतवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच गजमल पवार, जळके वि.वि.का.सोसायटीचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष भंगु चव्हाण , शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण, सदस्या, कविता…
औरंगाबाद : वृत्तसंस्था कोरोना लस तयार करणे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे. सध्या चार लाख कोटींची कामे महाराष्ट्र सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही, असा दावा देखील त्यांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांना अमेरिकेच्या वाईट हाऊसनेच प्रत्युत्तर दिले असल्याचे देखील ते म्हणाले. गंगापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 1075 कोटी रुपयांच्या ‘हर घर नल’ योजनेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील वृंदावन सीटीत घरांचे बांधकाम सुरू असतांना भडगाव तालुक्यातील नालबंदी येथील २७ वर्षाच्या गवंडी काम करणाऱ्या मजूरास इलेट्ररीक मोटारीचा शॉक लागल्याने जागेवर मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील ठेकेदार भरत चौधरी यांची बांधकाम साईट शहरातील वृंदावन सीटीत सुरू असून त्यांचेकडे नालबंदी ता. भडगाव येथील भरत इंदल चव्हाण (वय – २७) हा गवंडी गेल्या पाच वर्षांपासून गवंडी काम करत होता. ३० जुन रोजी शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घराचे बांधकाम करीत असतांना त्या ठिकाणी इलेक्ट्रीक मोटार असल्याने…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री मोठा आणि भीषण अपघात झाल्याची बातमी आली आहे. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, या आठही जणांना जबर मार लागला आहे. अपघातानंतर बस पेटल्याने बसचा जळून कोळसा झाला आहे. काल प्रवाशांनी खच्चून भरून निघालेल्या या बसचा आज केवळ सांगाडाच उरला आहे. विदर्भ टॅव्हल्सची ही खासगी बस काल संध्याकाळी 5 वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. एका चालकाने कारंजापर्यंत ही…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव(हरे.) या गावातील एका परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी असतांना घरातून अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.महेद्र वाघमारे हे करीत आहेत.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील प्रसिद्ध जमीन व्यावसायीकाकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली तसेच काही अंतरावरील आर.के.ज्वेलर्स शॉप फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने ज्वेलर्स मालक राकेश मोरे यांना जाग आल्याने चोरटे पसार झाले. या घटनेने चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस सीसीटीव्ही आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल वामनराव विसपुते हे जमीन व्यावसायीक असून त्यांचे कुटूंब २७ रोजी गावाला गेल्याने घराला कुलूप होते. गुरुवार, 29 रोजी सकाळी साडे सात वाजता विसपुते हे घरी आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाज्याचे सेंट्रल लॉक व कड्या तुटलेल्या दिसल्याने त्यांनी पोलिसांना सूचित केले. चोरट्यांनी घरातील दोन्हीही बेडरूमच्या दरवाज्याचे लॉक तोडत कपाटातील सुटकेसमधील चांदीचे शिक्के व रोख…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह रहायला असून दि. २९ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत गावातील राजेंद्र अर्जून पाटील याने घरात घुसून मुलीसोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर तिचा हात ओढून अंगलट करून विनयभंग केला. एवढेच नाही तर हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेवून…

