जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील बसस्थानकाजवळ मोबाईल चार्जर मागिल्याच्या शुल्लक कारणावरून चालकासह एकाला मारहाण करीत शिवीगाळ केल्याने एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कडगाव येथील रहिवासी असलेले ३२ वर्षीय गणेश बाबुराव कोळी हा तरूण २३ मे रोजी सकाळी ९ वाजता गावातील बसस्थानकाजवळ सुनिल प्रकाश कोळी यांच्याकडे मोबाईलचे चार्जर मागितले असता. याचा राग आल्याने सुनिल कोळी, अनिल कोळीसह चार अनोळखी इसमांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतांना गावातील भुषण कोळी याने मध्यस्थी केली असता त्याला देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून एका घरातील वाल कंपावूडमधून २० हजाराची सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगर परिसरातील मनीषा कॉलनी येथील रहिवासी ललित सतीशचंद्र मणियार यांच्या मालकीच्या घराच्या कंपावूडमधून दि. २४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास २० हजार रुपये किमतीची सायकल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रेवानंद साळुखे हे तपास करीत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या संसद भवनाचं आज रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असून या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित आहेत. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला आहे. परंतु मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाची सुरवात पूजा आणि होमहवन याने झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सेंगोल’समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला त्यानंतर नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात शतपावली करत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबविल्याची घटना शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात तारा हॉस्पिटल समोर शुक्रवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रिंगरोड परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथे ज्योती विजय शिरसाठ (वय-38) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नेहमी नेहमीप्रमाणे ज्योती शिरसाट या त्यांच्या शेजारी राहणार्या भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी शुक्रवारी दि. 26 मे रोजी रात्री 10 वाजता पायी निघाले. त्यावेळी नंदनवन कॉलनी येथील तारा हॉस्पिटल समोरून जात असताना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन ज्योती शिरसाठ यांच्या गळ्यातील 65…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात वहिनी व दिराच्या नात्याला काळिमा फासेल अशी घटना घडलेली आहे. दिराने शेतात असलेल्या आपल्या वाहिनीसोबत चुकीचे कृत्य करीत शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात दिराविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहायला आहे. याच परिवारातील महिलेचा दीर असलेल्या एकाने दिनांक २६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास महिला आपल्या मुलासोबत शेतात काडीकचरा वेचण्यासाठी गेली असता. महिलेचा दीर देखील त्या ठिकाणी आला व लहान मुलाला विहिरीवर पाणी घेण्यासाठी पाठवीत. महिलेच्या जवळ येत अश्लील वक्तव्य व चुकीची मागणी केली यावर महिलेने नकार दिला…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव – जळगाव रस्त्यावर असलेल्या एका जिनिंगच्या परिसरात दुचाकी पार्किंग केली असता तेथून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव शहरातील पातालनगरी येथील रहिवासी मोहम्मद युसुफ अब्दुल मुनाफ यांच्या मालकीची दुचाकी एमएच १९ ए वाय 7082 या क्रमांकाची दिनांक १६ मे 2023 रोजी रात्री दहा ते अकरा वाजे दरम्यान अनोळखी चोरट्यांनी बिजासनी जीनिग परिसरातून चोरून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात धाव घेत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे ही दुचाकी साधारण 28 हजार रुपये किमतीची असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा आहे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरातील मराठी शाळेजवळून युवराज सुकलाल हिरे यांची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी साईनगरातून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हिरे यांची दुचाकी शनिवार दि. २० मे रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ही दुचाकी घेऊन अल्पवयीन चोरटा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरात फिरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. ही कारवाई उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील आदींनी केली.
रावेर : प्रतिनिधी तालूक्यातील लहान वाघोदा येथील मस्कावद रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, यात नऊ हजार दोनशे रुपये रोख तर नऊ मोबाइल व पत्ता, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. धनराज राजेंद्र पाटील (३०), अनवर ऊर्फ फिरोज सरवर पटेल, (३५ साबीर सिकंदर पटेल, (२५), विनोद काशीनाथ कोळी (४२), सुभाष मुरलीधर पाटील (६२), अरविंद ऊर्फ दीपक रमेश पाटील (४०), सुभाष धोंडू चौधरी (६१), शाहरुख सिकंदर पटेल (२५), उमेश पंडित कोळी (30) अनिल रसूल पटेल (४३, सर्व रा.…
पुणे : वृत्तसंस्था मुलाच्या लग्नासाठी गेल्या काही दिवसांपासुन हक्क रजेवर असणार्या पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. एपीआय भालचंद्र शिंदे हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हक्क रजा घेतली होती. मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करत असतानाच त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. शिंदे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शिंदे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिकचे म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे शुल्क वाढविले आहे. जुलै २०२३च्या पुरवणी परीक्षेपासून शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी, द्विलक्षी शाखेतील नियमित व खाजगी विद्यार्यांसाठी ४४० रूपये परीक्षा शुल्क राहणार. त्याखेरीज प्रशासकीय शुल्क २०, गुणपत्रिका शुल्क २०, प्रात्यक्षिक परीक्षा प्रती विषय १५ रूपये तर एमसीव्हीसीसाठी ३० तसेच माहिती तंत्रज्ञान शाखेच्या प्रत्येक विषयासाठी २०० रूपये शुल्क आकारल्या जाणार आहे. पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी हेच शुल्क लागू होणार. श्रेणी सुधारण्यासाठी अ श्रेणी सुधार योजनेत सहभागी नियमित तसेच पुनर्परिक्षार्थी यांना ८८० रूपये पडतील. ब श्रेणीतील खाजगी विद्यार्थ्यांना ८८० रूपये लागू होणार.…

