Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  बिहार मधील ५९ अल्पवयीन मुलांची तस्करी होत असताना जळगाव व मनमाड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मुलांची सुटका केल्याची खळबळ जनक घटना समोर येत आहे. यात मनमाडला 30 तर जळगावला 29 मुलांची रेस्क्यू केले आहे. पुणे व सांगली येथे मदरशांमध्ये या मुलांना नेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बिहार राज्यातून अल्पवयीन मुलांची रेल्वेतून तस्करी करून नेत असताना रेल्वे पोलिसांनी जळगाव ते भुसावळ दरम्यान चेकिंग करतांना आढळून आले. पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 29 तर मनमाड रेल्वे स्थानकावर ३० मुलांना सोडविले आहे. मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल या घटनेत मानवी तस्करी या प्रकरणी तीन ते चार जणांना ही अटक…

Read More

चोपडा : प्रतिनिधी   तालुक्यातील वटार यागावी भीषण आग लागून तीन घरे जळून भस्मसात झाली. गॅस नळीतून गळती झाली. आणि नंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. गावात हळदीची पंगत असल्याने लहान मुलांसह सर्वजण जेवण करण्यासाठी गेलेले असल्यानेच जीवितहानी टळली. आगीने लाखो रुपयांची आर्थिक हानी पीडित कुटुंबांची झाली आहे. दि. २९ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने क्षणात तीन संसार उघड्यावर आणले आहेत. चोपडा तालुक्यातील वटार येथे काल सायंकाळी ८ वाजता अचानक आग लागली. आगीत कैलास भिका ठाकरे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. बघता बघता आगीने धनसिंग खंडू कोळी, भिकूबाई सुभाष कोळी व पाडुरंग सुभाष कोळी यांची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील लांडोरखोरी वन उद्यानाकडून मोहाडी रोडलगत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता घडली. या हल्ल्यात महिलेच्या मांडीवर व हाताच्या बोटांवर रानडुकराने चावा घेतल्याने महिला जखमी झाली असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असलेल्या वंदना चंद्रकांत जगताप असे जखमी महिलेचे नाव आहे. वंदना जगताप व त्यांचे पती चंद्रकांत जगताप गेल्या दोन वर्षांपासून लांडोरखोरी रस्त्यालगत दररोज मॉर्निंग वॉकला जातात. मंगळवारी दोन्ही जण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले. लांडोरखोरी जवळच अचानक जगताप दाम्पत्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात चंद्रकांत जगताप दूर फेकले गेले, मात्र वंदना जगताप या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीचा मोबाईल अनोळखी चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल येथील २३ वर्षीय शिरीना गबू तडवी हि तरुणी शिक्षणासाठी जळगाव शहरातील जिल्हा पेठ परिसरातील एका ठिकाणी राहायला आहे. दि २९ रोजी ६ वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरातून ७ हजार किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.प्रदीप पाटील हे करीत आहेत.

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील विवाहितेने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला छातीशी लावून लासगावच्या विहिरीत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील आरीफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांच्या मामाची मुलगी लजीनाबी यांच्याशी झाल्यानंतर दाम्पत्यास पूत्ररत्न झाले होते. शनिवार, 28 मे 2023 रोजी गावात समाज बांधवाचे लग्न असल्याने आरीफ शेखसह परीवार आमंत्रीत असल्याने आरीफ हे लग्नाला गेले तर पत्नीने मात्र काही वेळात येत असल्याचे सांगून लासगाव शिवारात आत्महत्या केली. दरम्यान, बराच वेळ होवूनही पत्नी येत नसल्याने आरीफ शेख यांनी घर गाठले मात्र पत्नी नसल्याने त्यांनी शोध…

Read More

पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसचे नेते कामाला लागली आहे. पण या मतदार संघात कॉंग्रेस निवडून येत नसल्याने हि जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी असा अट्टाहास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्याने कॉंग्रेस नेते नाना पटोले व अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे देखील घडले होते. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहे. कॉंग्रेसकडून या जागेसाठी आता आपला उमेदवारही घोषीत करून दिल्याने एकच चर्चा रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेस सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये या जागेवरून दावे ठोकले जात आहेत. तर काॅंग्रेसकडून आता या निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा सुरु आहे. तसेच मुंबईत आर्द्रता असल्याने उकाडा असह्य होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा अजूनही कायम आहेत. त्यातच आता राज्यात मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात बुधवारपर्यंत मॉन्सूनपूर्व पाऊस म्हणजेच वळवाचा पाऊस येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसात वळवाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. सध्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण का भेटत असतो?, यावर प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची युती आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतही जाण्यास तयार आहोत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांची कामे करण्यासाठी त्यांना भेटावेच लागते. या भेटीचा वेगळा अर्थ काढण्यची आवश्यकता नाही. ठाकरे गट किंवा शिंदे गट कोणासोबतही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. यात मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली आहे. याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वैद्यकिय…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 23 वर्षीय तरुणाने गरोदर केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी अडावट पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील एका गावातील परिवार ऊस तोड कामासाठी चोपडा तालुक्यातील एका गावात आलेले असताना दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ यादरम्यान या परिसरातील एका 23 वर्षीय संशयित आरोपी सागर मोरे याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी राहण्याच्या झोपडीत येत तिच्यासोबत अत्याचार करीत तिला गरोदर केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्थानकात संशयित आरोपी सागर मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अडावद पोलीस…

Read More