Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी  शहरात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले असता पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एकूण २० जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पारोळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोबिंग ऑपरेशन राबविले होते. दरम्यान त्यांना नाव गाव विचारता त्यांनी आपली नावे अशी सांगितले तीलीचंद कपूर येदानी वय २५, कपूर हरी येदानी वय ५२, अतिश कपूर येदानी वय २३, मधू गोविंद भूरानी वय ४४, विकास दादू भुरानी वय २३, नितेश कपूर येदानी वय १९, मिलिंद लटार पवार वय ४८ आकाश दादू भूरानि वय ३२, सागर मिलिंद पवार वय १९, अमर मिलिंद पवार वय २२, बादल दादू भुरानि वय २०,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा ठाकरे गटाचा मोठा नेता प्रवेश करीत असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मिळणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटात पसरलेली नाराजी दूर होण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करुन धक्का दिला होता. आज त्यापेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसणार आहे. विधान परिषदेतला बडा नेता शिंदेंच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना वाटा दिल्यावर भाजपमधील अनेक नेत्यासह आमदार नाराज असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता भाजपात नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्या देखील चर्चा रंगत आहेत. त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. नुकतेच त्यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत सरकारमध्ये सामिल झाल्यानं आता समिकरण बदलणार आहेत. त्यामुळं पंकजा मुंडे आता काँग्रेसमध्ये एन्ट्री करणार असल्याचं जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत पटोले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याची चर्चा आहे. सोनिया…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी राज्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या देण्यात आल्या पी.आर.हायस्कूल आणि अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना शाखा धरणगाव यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आल्या. प्रत्येक शाळेला १५०० वह्या याप्रमाणे आज दोघ शाळांमध्ये ३००० वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय सलीम भाई पटेल आणि माजी शहर प्रमुख स्वर्गीय राजेंद्र महाजन यांच्या स्मरणार्थ नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून दोघ शाळांमधील प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना “शूज” देण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेच्या कार्याविषयी बोलताना पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी 80 टक्के समाजकारण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात गुन्हेगारी घटनामध्ये सातत्याने वाढ होत असतांना शहरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करण्याचा बहाण्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे एक लाख 25 हजारांचे दागिने हातचलाखीने दोन अज्ञात भामट्यांनी ईश्वर कॉलनीतून लांबवले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ईश्वर कॉलनी परीसरातील रहिवासी मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (वय ६५) या मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन वृध्द महिला घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती आले असता त्यांनी सांगितले कि, कंपनीचे सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था  राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहे. किती आमदारांचा पाठिंबा आपल्याला आहे या पार्श्वभूमीवर काल मुंबईत दोन्ही गटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अजित पवार गटाच्या बैठकीत नेतेमंडळींनी शरद पवारांना आणि त्यांच्या काही निर्णयांना लक्ष्य करताना आपापल्या भूमिका मांडल्या. तर अजित पवारांना ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्या नेत्यांनी शरद पवारांवर आरोप करत काम करण्याची संधी दिली नाही असं म्हंटलं. तर या त्यांच्या आरोपवर उत्तर देण्यासाठी त्यांच्या एकंदरीत कामाचा आणि दिलेल्या जबाबदारींचा आढावा राष्ट्रवादीचे आमदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात बदलत्या हवामानामुळे काही भागात जोरदार पावसाचे आगमन मध्यरात्री झाले पण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान देखील केले आहे. दि.५ रोजीच्या रात्री जोरदार कोसळलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना अचानक पूर आला असून रावेर तालुक्यात तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील दोन जण बेपत्ता आहेत. यात बेपत्ता असलेल्यांमध्ये रावेर शहरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पहिल्या पावसाने मोठी दाणादाण उडाली असून रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला आणि दोन ते तीन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील भाजप व शिंदेंच्या सत्तेत अजित पवार यांच्यासह पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काल झालेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यात अजित पवार गटाकडे संख्याबळ असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आज दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठक संपन्न होत आहे. परंतु त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट हाती येतेय. उद्या होणाऱ्या एका बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र येणार आहे. उद्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची एक बैठक संपन्न होत आहे. या समितीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीसाठी तिन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने बैठक होत असल्याने अधिवेशनातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत मोठी फुट पाडली असतांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांचे समर्थन अजित पवारांना मिळू लागले आहे. तर जळगाव शहराचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व ऍड. कुणाल पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बुधवारी दि. ५ जुलै रोजी भेट घेतली. प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थिती याबाबत अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली. राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुही निर्माण झाली आहे. त्यात अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट काढून आमचीच राष्ट्रवादी पक्ष खरा असे सांगितले आहे. तर जळगाव जिल्ह्यातून आता प्रदेश सरचिटणीस अभिषेक पाटील व ऍड. कुणाल पवार यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यात होत असलेल्या मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असतांना पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप गोपाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जामनेर पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संदीप गोपाळ हा जामनेर शहरातील आयटीआय कॉलनी येथे रहात असून तो सध्या घरी आला असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला कारवाई व अटक करण्याकामी रवना केले होते. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे,…

Read More