Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून घराकडे पायी निघालेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील ५१ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र धूमस्टाइल आलेल्या चोरट्यांनी लांबविले. ही घटना रामकुंवरनगरातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात ज्योती चंदन पवार (४१, रामकुंवरनगर, चोपडा) या शिक्षिका असून, दि. ७ रोजी पावणेआठ वाजता घराकडे पायी येत होत्या. त्यावेळी पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून धूमस्टाइल आलेल्या २० ते २५ वयोगटातील चोरट्यांनी १७ ग्रॅम वजनाचे व ५१ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविले. शिक्षिकेने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. तपास सहायक निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीला फोडून अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत सत्तेत बसल्यानंतर शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून आज त्यांची सभा छगन भुजबळ यांच्या मतदार संघात आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार पावसात भिजल्याचा एक फोटो ट्विट केला आहे, यात तेरे हर एक वार का पलटवार हू…… असे कॅप्शन दिले आहे. शरद पवार यांच्या या फोटोमुळे सातारा लोकसभेला जसा उदयनराजेंचा लोकसभेला पराभव झाला तसा पराभव छगन भुजबळांचा होणार असे जितेंद्र आव्हाड यांना सूचवायचे नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान शरद पवार आज छगन भुजबळ यांच्या…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यात गेल्या काही वर्षापासून वाळू माफियांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता पण गेल्या काही दिवसापासून धरणगाव तहसील कार्यालयाला तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुका परिसरात वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई सुरु केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. वाळू चोरीचे रस्ते बंद केल्यानंतर आता चक्क नांदेड गावाजवळ ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले तब्बल शंभर ब्रास वाळूसाठे जप्त केले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे धरणगाव तहसील कार्यालयातील महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा पारदर्शक होवू लागली आहे. नांदेड गावातील वाळू चोरट्यांचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून तहसीलदार सूर्यवंशी यांनी बंद केला. यामुळे चोरट्या वाळू वाहतुकीला लगाम बसला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही म्हणणं मांडण्यासाठी नोटीस धाडण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या ४० आमदार व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली असून विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आलीय. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झालेली असून शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा प्रतोद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांचा व्हिप लागू…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील पाटील मळा जवळील मोकळ्या जागेत (ता.७) रोजी दुपारी ०२.२० वाजेच्या सुमारास शेख दानिश शेख नाशिर व प्रफुल्ल पाटील असे गावठी पिस्टल व राउंड कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील पाटील मळा जवळील मोकळ्या जागेत दोन तरुण गावठी पिस्टल कब्जात बाळगत आहेत.या माहितीच्या निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिळलेल्या आधारे पोलिसांनी सापळा रचून (ता.७) रोजी २.२० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शेख दानिश शेख नाशिर (वय २८) राहणार आझाद नगर भुसावळ यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्या कमरेस मागील बाजूस पॅन्ट मध्ये एक गावठी बनावटी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या नंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या, त्याकडेही मी गांभीर्याने पाहिले नाही. असे म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. पाठित खंजीर खुपसण्याचे माझ्या रक्तात नसल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली. राहुल गांधी यांना प्रत्यक्षात समोरा-समोर मी आजपर्यंत पाहिले नाही. सोनिया गांधी आणि मी भेटलेले नाही. मी लपून छपून काम करत नाही. मी कोणताही निर्णय मी लपून घेत…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात जुनी खुन्नस ठेवून झालेल्या वादातून मारहाणीत एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे यावेळी रवंजे येथे स्थानिक पोलीस व सीआरपी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सदर घटने कामी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रवंजे या गावी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दुचाकीचा कट लावण्यावरून वाद झाला व यापूर्वीच्या वादाची खुन्नस डोक्यात ठेवून चौघा संशयितांनी नामदेव कोळी या तरुणाला बेदम मारहाण केली. संशयितांनी तोंडावर व शरीरावर जोरदार मारहाण केल्याने त्यास बेशुद्धावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची आई शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे. मिथुन यांचा धाकटा मुलगा नमाशीने ही माहिती दिली. मिथुन यांचे वडील बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. आता त्यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्रही हरपलं आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्व आणि राजकीय जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाचं वृत्त कळताच तृणमुल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर शओक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, ‘मिथुन चक्रवर्ती यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. भगवान मिथुन दा आणि त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी बळ देवो.’ अभिनेते मिथुन सध्या ‘डान्स बांगला डान्स’ च्या १२…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका २६ वर्षीय तरुणी मतीमंद असल्याचा फायदा घेत नराधम तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला व त्यातून पीडीता चार महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जीवन बापू पाटील (पारोळा तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका २६ वर्षीय पीडीता मतीमंद असून तिच्या असायतेचा फायदा संशयित आरोपी जीवन पाटील याने घेतला. गेल्या चार महिन्यांपासून ते 20 जूनपर्यंत पीडीतेसोबत अत्याचार करण्यात आल्याने पीडीता 17 आठवड्यांची गर्भवती राहिल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी पीडीतेच्या बहिणीने पारोळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर जीवन पाटीलविरुद्ध अत्याचार व अ‍ॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांसह ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून आता प्रत्येक जिल्ह्यातील मंत्री मतदार संघात पोहचत असून त्यांचे मोठ्या धडाक्यात स्वागत देखील होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील मंत्री अनिल पाटील देखील आज जळगावात दाखल होत अमळनेरला दुपारी पोहचत असतांना त्यांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेछ्या दिल्या. नवनियुक्त मंत्री अनिल पाटील हे आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे स्थानकावर आले असता त्यांचे शहरातील कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करीत अमळनेरला ते ११ वाजता पोहचले तर अमळनेर…

Read More