जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम काॅलनीत एका बांधकामावरून दोन गटात वाद झाल्याने रविवारी दुपारी तुफान दगडफेक झाली. यावेळी दोन्ही गटाचे दोनशे-अडीचशे तरुण समोरासमोर आले होते. दगडफेकीत ५ जण जखमी झाले असून, दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलिस कुमक तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी रात्री दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच कोणालाही अटक केली नव्हती. काही तरुण व महिलांनी लहान मुलांना मारहाण केल्यावर वाद सुरू झाला. हे समजताच मोठ्या संख्येने तरुण जमा झाले आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर दंगानियंत्रण पथक, चार्ली यंत्रणा व शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. अप्पर…
Author: editor desk
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन संशयित आरोपींना रविवार, ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांकडून चोरीचे ९ मोबाईल हस्तगत केले आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, एरंडोल शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समध्ये हरिओम इंटरप्रायजेस नावाचे मोबाइल दुकान आहे. हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोइन त्यातून मोबाइल लांबविले होते. एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावात राहणाऱ्या तरूणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जावून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या तरुणाचे धीरज प्रभाकर कोष्टी (वय-२०) असे नाव असून त्याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी खालच्या घरात धीरज याचे आई वडील हजर होते. याचदरम्यान धीरजने मृत्यूला कवटाळले, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरात धीरज कोष्टी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. तो सध्या बीसीएच्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी सायंकाळी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात तहसील कार्यालयाला तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुका परिसरात वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई सुरु केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. नुकतेच नांदेड गावाजवळ ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले तब्बल शंभर ब्रास वाळूसाठे जप्त केल्यानंतर आज दुसरी कारवाई मौजे बांभोरी परिसरात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मौजे बांभोरी प्र.चा अवैध ९० ब्रास वाळू साठा धरणगाव महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला असून सदरची वाळू जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. हि कारवाई तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मोरे, नायब तहसीलदार महसूल अमोल पाटील, मंडळ अधिकारी पाळधी गजानन बिंदवाल तलाठी बांभोरी प्र चा नारायण सोनवणे कोतवाल यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था अजित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटी नंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद जोरात सुरु असून अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक राजकीय नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली. शरद पवारांवर त्यांनी जहरी टीका करत त्यांचा उल्लेख ‘सैतान’ असा केला. माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे चालल्याचं बघायला मिळतयं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माणसांच मोठं योगदान आहे.” यापुढे शरद पवारांविषयी बोलताना खोत म्हणाले की,” ८०च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘आदीपुरुष’ चित्रपटातील छपरी संवादामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अखेर या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बिनशर्त माफी मागितली आहे. मनोज यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आदिपुरुषामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे मी मान्य करतो. हात जोडून मी तुम्हा सर्व बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी, आदरणीय ऋषी-संत आणि श्रीरामाच्या भक्तांची मनापासून माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. एक आणि अखंड बनून पवित्र सनातन धर्म आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य द्या. सुमार व्हिएफएक्स, कलाकारांचे पोशाख, छपरी संवाद अशा विविध कारणांमुळे ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका घराचे कुलूप तोडून जबरी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बस स्टॅन्ड च्या पाठीमागे असलेल्या रुक्मिणी नगरातील रहिवासी महेंद्र नामदेव कापडणे यांच्या घरात दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ते दिनांक ६ जुलै सकाळी सात वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून १५ हजार रुपये रोख तर ७ हजार रुपये किमतीचे चांदीचे हातातील ब्रेसलेट असा एकूण २२ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात महेंद्र कापडणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील गट नंबर ६० प्लॉट नंबर १६२ मधील रहिवासी सुनंदा गिरीश झोपे याच्या घरात दिनांक ७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारापासून ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अनोळखी चोरट्यांनी घराचा दरवाजाला लावलेले कडी व कोयंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील २१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तर ५ हजार रुपये रोकड असा एकूण २६ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुनंदा झोपे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून राजस्थान आणि मध्य प्रदेशसह २३ राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. त्याचवेळी हिमाचलच्या लाहुल आणि स्पीतीमध्ये पूर आणि हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पोशाना नदी पार करताना लष्कराचे दोन जवान वाहून गेले. दिल्लीत शनिवारी झालेल्या पावसाने गेल्या 20 वर्षांचा विक्रम मोडला आहे. रिज परिसरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १२८ मिमी पाऊस झाला. तर, केवळ सफदरजंग परिसरात १२६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी जुलै २००३ मध्ये २४ तासांत १३३.४ मिमी पाऊस झाला होता. दुसरीकडे, 21 जुलै 2013 रोजी…
धरणगाव : प्रतिनिधी शिवकालीन प्राचीन सारजेश्वर महादेव मंदिराचे सेवेकरी भोले सरकार मित्र परिवार गेल्या काही दिवसांपासून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला होता. ते श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अमरनाथ यात्रा सध्या बंद आहे. हे सेवेकरी गेल्या पाच वर्षांपासून नियमित अमरनाथ यात्रेत भगवान अमरनाथ भोले बाबाच्या दर्शनाला जातात. धरणगाव तेथून जळगाव व तेथून अमृतसर रेल्वेने ४० भक्तांचा जत्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला होता. दि. ५ जुलैपासून पहलगाममार्गे पायी जाणार होते. दि. १५ जुलै रोजी परतण्याचे नियोजन होते. परंतु अमरनाथ यात्रा अचानक बंद झाल्याने सारे काळजीत पडले होते. गेले तीन दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. त्यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधून…

