Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात जबरी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील एका गावात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना दि.१५ ते १७ जुलै दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील रहिवासी रमेश सीताराम बडगुजर (वय ६३) हे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. दि. १५ ते १७ दरम्यान ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे कर्णफुल, पाच हजार रुपये किंमतीच्या साड्या व 18 हजारांची रोकड असा एकूण 55 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार उघडकीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील अनेक दिवसापासून रखडलेली भारतीय जनता पक्षाने आज तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून या तिन्ही जागेंवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची तर रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. भाजपने नुकतेच जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली असून यात तिन्ही चेहरे नवीन आहे. जळगाव लोकसभेसाठी दिलेले ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते आपल्या कीर्तनातून राज्यभर प्रसिद्ध आहे तर दुसरे रावेर लोकसभेच्या…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणासह एका महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्यास असून तिचे शिक्षण सुरु असतांना एका अल्पवयीन संशयित आरोपीने गेल्या आठ दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला आत्महत्या करेल तसेच पीडीतेच्या कुटूंबाला फसवेल, अशी धमकी देत शहरातील विविध भागात पिडीतेवर 29 जून 2023 ते त्यानंतरच्या आठ दिवसानंतर अत्याचार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या कृत्यात एका अनोळखी महिलेनेदेखील मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील काही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले. IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील २४ तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहरात तलवार, कट्टा,पिस्तूलासह फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करुन समाजात दहशत निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळील दोन तलवार, एक चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी शहर पोलिस ठाण्याचे आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे यांना गोपनीय खबर मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यासीन नगर भागात काही मुले हातात तलवार व चॉपर घेऊन दहशत माजवत आहेत. तसेच हत्यारासह फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारीत करीत आहेत, अशी माहिती समजली. यावरून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांच्यासोबत पोलिस नाईक राहुल सोनवणे, महेद्र पाटील, भूषण पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दि.१८ रोजी पहाटेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पडघा या ठिकाणी ट्रक व कालीपिवळीमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात यावल तालुक्यातील न्हावी येथील २२ वर्षीय प्रज्वल शंकर फिरके निधन झाले. तो सेवानिवृत्त शिक्षक तथा मठवाडा, न्हावी येथील शंकर फिरके यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील शंकर फिरके (दोडके), आई व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा बुधवार, १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पडघा येथील निवासस्थानापासून निघणार आहे. फिरके परिवार हा अनेक वर्षांपासून पडघा येथे निवासी आहे. दरम्यान, या अपघातात आणखी काही जण ठार झाल्याचे समजते. एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाने फिरके परिवारावर दःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ असलेल्या बिबण्या नाल्यावर पाचोरा येथून सातगाव डोंगरीला कापूस भरण्यासाठी जात असलेला ट्रक सातगाव (डोंगरी) येथे मुक्कामी असलेली पाचोरा आगाराच्या बसवर जावून घडल्याने अपघात झाला. यात बस मधील १३ शाळकरी विद्यार्थी, बसचालक, २३ जण किरकोळ जखमी झाले. अपघाताचे वास्तव पाहून ट्रक चालक आपले वाहन जागेवरच सोडून पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा-मोंढाळा रस्त्यावरील मौनगिरी साखर कारखान्यासमोर मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोऱ्याच्या दिशेने येणारी बस क्रमांक (एमएच १० बीएल १६१८) आणि पाचोराकडून (सातंगाव डोंगरी) मोंढाळाकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच २०- ७५२१) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात १३ विद्यार्थ्यांसह २०…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सोमवारपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह मुंबई, ठाणे भागात चांगला पाऊस पडतो आहे. नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागांसह ठाणे आणि सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी गेल्या दोन आठवड्यापूर्वी शिंदे व फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे तर त्यानंतर चक्क दोन वेळेस शरद पवारांची भेट सुद्धा झाली असतांना एका बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान(केआरके) यांच्या ट्वीटमुळे भाजप व शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सध्या केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर केआरकेने ट्वीट केलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांसह बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे. परंतु, राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं केआरकेचं म्हणणं आहे. केआरकेने याबाबच केलेलं ट्वीट चर्चेत आहे. “NCP मध्ये कधीच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नुकतेच एका मराठी वृत्तवाहिणीने किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत चर्चासत्र सुरु असतांना यावेळी विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले आहे तर या व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. अंबादास दानवे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते. या व्हिडिओ प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून महिला आमच्याशी संपर्क साधत आहे. येत्या काळात या महिला किरीट सोमय्या यांचे वेगवेगळे विषय जनतेसमोर मांडणार आहे. किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना…

Read More