नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे मणिपूर मध्ये गेल्या काही महिन्यापासून परिस्थिती चिघळत असतांना पूर्वोत्तर राज्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांची धिंड काढली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरमने गुरुवारी होणाऱ्या निदर्शनासाठी प्रसिद्ध केला. या व्हिडिओमुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ITLF चे प्रवक्ते म्हणाले की, कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी महिलांना नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवले. या व्हिडिओत दिसणारे टोळकी महिलांची छेड काढत आहेत. तर पीडित महिलांना बंधक बनवले आहे. या महिला मदतीची…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका तरुणाची विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष देत तब्बल ५ लाख २९ हजार ५०८ रुपयात फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघाविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी असलेल्या दीपक पितांबर चौधरी (वय ३८) यांना दि.४ फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार असे नाव सांगणार्या दोन अनोळखी इसमांनी स्वतःची ओळख लपवून मो.क्रं. 8116799318 व 9540283461 यावरुन दीपक यांच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला तसेच त्यांना अविवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवले परंतु प्रत्यक्षात कोणताही…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी ते दोनगाव रस्त्यावर एका बँकेच्या परिसरात दोन शिवसेनच्या रुग्णवाहिकेची अनोळखी इसमांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केल्याची संतापजनक घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही माहिती परिसरात पसरली तशीच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दोनगाव रस्त्यावरील एका बँकेजवळ परिसरात शिवसेनेच्याही दोन रुग्णवाहिका नेहमी उभ्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी या दोन गाड्याची तोडफोड केल्याची घटना आज पहाटे ग्रामीण भागातील एका रुग्णाला तातडीने जळगावला रुग्णालयात दाखल करावयाचे असल्याने चालक रुग्णवाहिका घेण्यासाठी गेला असता एका रुग्णवाहिकेची आतून तोडफोड झालेली दिसून आल्याने हि घटना उघडकीस आली आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या घटनेची माहिती घेतली आहे. सध्या प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत म्हटले आहे की, एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह ते बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढणे व जखमींवर तातडीने उपचार करणे, याला आम्ही प्राधान्य देत आहोत. दरम्यान,घटनेची माहिती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर आज सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट…
अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर बुधवारी रात्री उशिरा जग्वारने सुमारे २५ जणांना चिरडले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्डचाही समावेश आहे. धडक इतकी जोरदार होती की लोक 30 फुटांपर्यंत दूरवर पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार कार ओव्हरब्रिजवर मागून येणाऱ्या डंपरला धडकली होती. हा अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यानंतर राजपथ क्लबकडून ताशी 160 किलोमीटर वेगाने येणाऱ्या जग्वारने जमावाला चिरडले. मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे. या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना सोला सिव्हिलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात जग्वारचा…
मुंबई : वृत्तसंस्था देशभर सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराने आता महाराष्ट्रात देखील पावसाचा जोरदार कहर दिसू लागला आहे. याचा फटका कोकणात मोठ्या प्रमाणात बसला असून रायगडजवळ असलेल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. या बचाव पथकांचं शोधकार्य सुरू आहे. तसेच मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील गावाजनीक आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकीचे टायर फुटल्याने रोडवरील भिंतीला आदळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील शेख अफसर शेख तय्यब हे आपल्या परिवारासोबत बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चारचाकीने धरणगावकडून अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले असतांना चारचाकीच्या पुढील शीटवर शरीफाबी शेख तय्यक (वय-५६) बसलेल्या होत्या. धरणगाव तालुक्यातील चांदणी कुऱ्हा गावानजीक भरधाव चारचाकीचे अचानक मुख्य रस्त्यावर टायर फुटले. त्यामुळे शेख अफसरचा चारचाकीचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली. यात…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे – फडणवीस सरकारने गेल्या काही महिन्याआधी तलाठी भरतीची मोठी घोषणा केली होती. या भरतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानपरीषदेत केली. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती. या प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे. तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे पण नेमकी किती तारखेपर्यंत ही मुदतवाढ असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही. यासंदर्भात…
पुणे : वृत्तसंस्था पुणेपोलिसांनी मोठी कारवाई करत NIA कडून वॉन्टेड घोषित करण्यात आलेल्या 2 कुख्यात दहशतवादयांना जेरबंद केले. मागील दीड वर्षांपासून ते फरार होते. दोघांवरही NIA ने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुण्याच्या कोथरूड भागातून दोघांनाही अटक करण्यात आली. गस्तीवर असणाऱ्या कोथरूड पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी संशयातून दोघांना पकडले आणि चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन गस्तीवर असताना त्यांनी या दोघांना…

