ठाणे : वृत्तसंस्था आज सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलिसांकडून सोमवारी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान शस्त्र घेऊन फिरणारा हद्दपार आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय २२) याला रामेश्वर कॉलनी भागातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, विशालवर विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. त्यासाठीच त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. सोमवारी एमआयडीसी पोलिसांकडून सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यादरम्यान, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना विशाल दाभाडे हा त्याच्या घरातील परिसरात शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत रामेश्वर कॉलनी भागातील चांगापाचा मंदिराजवळ आले. याठिकाणी विशाल आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी सुरा सापडला. त्यानंतर पंचनामा करून, त्याला ताब्यात घेण्यात आले.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लहासर गावाजवळील सागवान जंगलातील नाल्यात सुमारे ४५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोत्यात मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृताच्या तोंडावर प्लॅस्टीक गुंडाळले होते. तसेच हात व पाय बांधलेले होते. जांभुळ येथील एक इसम तीन महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या मारेकऱ्यास पहूर पोलिसांनी अटक केली होती, मात्र मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावली याबाबत त्याचेकडून कोणतीच माहिती मिळत नव्हती. या अनुषंगाने पहूर पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी घटनास्थळी पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असतांना जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी एका खासगी कंपनीत रिकव्हरी एजंटचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत रामदास साळुंखे (वय ४२, रा. हिराशिवा कॉलनी) असे अटकेतील संस्थेत आरोपीचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीसह शहरातील विविध ठिकाणी दुचाकीची चोरी केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा शोध घेत असताना चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करीत असल्याचे समोर आले.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. निखिल उर्फ पिया सुनिल कुडे (वय २४, रा. एम.जे. नगर, चाळीसगाव) व शेख चाँद शेख हमीद (३८, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत. निखील उर्फ पिया सुनिल कुडे हा २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैधरित्या वाळूची चोरी करुन विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे ५ गुन्हे दाखल होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत त्यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी नगराजवळील एका परिसरात भर दिवसाच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे बराच वेळ परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती जळगाव शहर पोलिस स्थानकात जाताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसराच्या मागील बाजूस असलेले हुडको परिसरातील एका गल्लीत आज दि.१७ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या वादातून वाद सुरु होता. त्यामुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. हा वाद इतक्या टोकाला गेली लोकांची गर्दी पगाविन्यासाठी एकाने हवेत गोळीबार केल्याने जमलेले लोक तत्काळ घटनास्थळाहून निघून गेले याची माहिती जळगाव शहर पोलिसांना माहित पडतच त्यांनी घटनास्थळी…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप व शिवसेनेसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदार शरद पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवार वाय बी सेंटरमध्ये उपस्थित नाहीत. ते थोड्याच वेळात तिथे पोहोचतील. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी…
नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेना-भाजपसोबत सत्तेत सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यानंतर रविवारी अजित पवारांसह ८ आमदारांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधान आले होते. तर आजपासून १७ जुलै म्हणजेच आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आधीपासून वर्तवली जात होती. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभं राहून नव्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक धार्मिक स्थळावर पर्यटक विचित्र कपडे घालून फोटोसेषन करीत वादग्रस्त व्हिडीओ नियमित चर्चेत येत असतात त्याच कारणाने केदारनाथ मंदिर प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील सूचना फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या सूचना फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. केदारनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आराधना कॉलनीतील रहिवासी असलेल्या रुशील प्रवीण चौधरी वय – २१ यांचे सोमवार दि.१७ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ११ वाजता मू.जे.महाविद्यालय मागील घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. रुशील हा कॉम्प्युटर बीमचे संचालक संजय चौधरी, किशोर चौधरी यांचा पुतण्या तसेच उडान दिव्यांग फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांचा मुलगा होता. त्यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकू, आत्या, मामा, भाऊ, भावंडे असा परिवार आहे.

