चाळीसगाव : प्रतिनिधी कु. राजेश्वरी जाधव हिच्या ९ व्या स्मृतीदिना निमित्त शहरातील ० ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन रामचंद्र य. जाधव व यश ग्रुप मित्र परिवाराने दि. २३ जुलै २०२३ रविवार रोजी बापजी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना घेऊन येण्यासाठी व जुनी फाईल असल्या सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शिबिरात नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ. सो. भावना भामरे – बागड, नाशिक, बालनेत्रविकार तज्ञ, डॉ. पराग अनिल बागड, नाशिक पडद्याचे विकार तज्ञ, व डॉ. अमित महाजन नेत्ररोग तज्ञ, डॉ.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील माळी समाजाचे युवा कार्यकर्ते तथा समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा आदेशाने युवक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन शेलार यांनी केली आहे. भूषण महाजन हे सन 2014 पासून माळी समाजाच्या कार्यात सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2017 या वर्षी माळी समाजाचे मुखपत्र माळी साम्राज्य साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. या साप्ताहिक वृत्तपत्रच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहेत. सन 2019 पासून ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे जळगाव लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज यांच्या निवासस्थानी जाऊन जळगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्यावतीने भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी जळगाव पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश नहाळदे कुऱ्हाडदे, साहेबराव धुमाळ विटनेर, श्रीकृष्ण बारी शिरसोली, दिलीप पाटील वडली,उमेश पाटील जवखेडा, शेखर सुर्यवंशी बोरणार, विनोद गोपाळ वावडदा तसेच संजय चिमणकारे जळके/वसंतवाडी असे सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ.खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला असून गिरीश चौधरी यांना मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीने अटक केली होती. राज्याच्या राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी सध्या घडू लागल्या आहे. पुणे एमआययडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते. दरम्यान हे प्रकरण 2016 मधील असून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचा आरोप होता. खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यापूर्वी लग्न होवून आपल्या आई वडिलांपासून विभक्त होत संसार थाटलेल्या जितेश अनिल राठोड २५ वर्षीय तरूणाने जळगावात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकळी येथील मुळचे रहिवासी असलेले सध्या शहरानजीक असलेल्या व्दारकानगरात अनिल रायसिंग राठोड हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून यात सगुनाबाई, मुलगा दिलीप आणि जितेश असे आहेत. ते हातमजूरी करून कुटुंबातील सदस्य उदरनिर्वाहास हातभार लावतात. जितेश याचे २२ मे २०२३ रोजी लग्न झाले होते. काही दिवसांनतर त्याने बिबानगरात पत्नीसोबत घर थाटले. रिक्षा चालवून तो प्रपंच चालवत होता. बुधवारी सायंकाळी तो घरी आला. घरात जितेश आणि…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या अपघाताच्या मालिकेचा अनुभव थेट जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देखील नुकताच आलेला आहे. जिल्हाधिकारी ग्रामीण भागातील दौरा आटोपून जळगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास येत असतांना महामार्गावर झालेल्या अपघातात एक तरुण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आल्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी अमन मित्तल त्याच्या मदतीसाठी धावून आल्याने त्यांच्या मधील माणूसकीच्या दर्शनाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल हे गुरुवारी भुसावळ शहरातील एक कार्यक्रम आटोपून रात्री जिल्हाधिकारी मित्तल हे त्यांच्या शासकीय वाहनाने पुन्हा जळगावकडे परत येत असताना नशिराबाद गावाजवळ महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार जखमी झाला होता. हा दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. हे दृश्य पाहून जिल्हाधिकारी…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करत असलेल्या इसमांवर राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार संशयित तीन आरोपींवर अटकेची कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी १९ रोजी दुपारी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर त्यांनी सापळा रचला असता तिथे बनावट देशी दारू वाहतूक करताना संशयित आरोपी अविनाश संतोष जाधव (वय – २४ वर्ष) रा. हिंगणे ता. जामनेर) आणि रेहान रमजान मन्यार (वय – २० वर्ष)…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात शिक्षणासाठी आलेल्या २१ वर्षीय मुलीस एका तरुणाने पळवून नेत मध्यप्रदेशातील काही शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एका परिसरात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून २१ वर्षीय तरुणी जळगावात राहाण्यासाठी आली असताना दिनांक ३ जून रोजी तरुणाने मुलीला पळवून नेत मध्यप्रदेशातील इंदोर, प्रीतमपुर या शहरात वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात तिच्या कुटुंबीयांना व तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार जबरदस्ती अत्याचार केल्याप्रकरणी तरुणीने जळगाव तालुका पोलीस स्थानकात तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या जन्मदत्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपले आई व वडील यांच्यासोबत वास्तव्यास असून गेल्या दिड वर्षापासून आई-वडील यांच्यात भांडण सुरु आहे. त्यामुळे भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जात असे. त्यामुळे अल्पवयीन मुलगी वडिलासोबत घरीच राहून शाळेत जात असते. याच गोष्टीचा नराधम बाप फायदा घ्यायचा. रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात झोपून गेली कि, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करायचा. मुलीने विरोध केला असता तुला आणि…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी करून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आता अजित पवार यांना तीसहून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता अजित पवार यांचं बळ वाढविणारे वृत्त आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात…

