Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  भुसावळ तालुक्यातील खडका येथील जिनिंग मिल परिसरातील एका खोलीमध्ये रविवारी सकाळी एक महिला विवस्त्र व बेशुद्धावस्थेत आढळून आली. भुसावळ तालुका पोलिसांनी तिला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खड़का येथील जिनिंग मिल परिसरातील एका खोलीमध्ये ५९ वर्षीय महिला बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाली. त्या वेळी सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोहेकॉ संजय तायडे, पोकॉ. संगीता निळे हे घटनास्थळी पोहोचले. या महिलेला भुसावळ येथे ट्रॉमा सेंटर येथे नेण्यात आले. नंतर तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. येथे तिच्यावर उपचार…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील २८ वर्षीय महिलेचा विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पुनम राहुल पाटील (२८, मराठे गल्ली, धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाटील परिवारातील सदस्य भोणे शिवारातील आपल्या शेतात कापूस पिकाला खत देण्यासाठी गेले होते. यावेळी पुनम पाटील यांनी पती राहुल यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना खताच्या गोण्या उचलून दिल्या. सुमारास जेवण करण्यासाठी पुढे पांडुरंग पाटील यांच्या विहिरीवर गेली. बराच वेळ झाला म्हणून इतर सदस्य विहिरीजवळ गेले असता पुनम या त्या ठिकाणी दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी विहिरीत डोकावले असता पुनम त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  लग्नापूर्वी पतीचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, त्या महिलेने घरी येऊन तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत या ‘पतीदेवा’च्या पत्नीला मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या घडली. याप्रकरणी १५ जुलै रोजी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या बचावासाठी या पत्नीने पुढाकार घेत महिलेविरुद्ध फिर्याद दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेम संबंध होते. मात्र या तरुणाचे लग्न झाल्याने त्याने सदर महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे सदर महिला या तरुणाच्या पत्नीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत असे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात जाऊ असं आव्हान वारंवार केलं जातं. अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे नसतं धाडस जीवावरही बेतू शकतं. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्राला उधाण आलं असताना एक जोडप समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट करत होतं. तर त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना प्रत्येकासाठी इशारा आहे. समुद्राला उधाण आलं असताना समुद्रापासून दूर राहिला पाहिजे. थोडीसी मस्करी जीवावार बेतू शकते. नेमकं याकडेच या जोडप्याने…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  गार्डन डेव्हलपींगसाठी रोपे पाठविण्याच्या नावाखाली तरुणाला २५ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद अगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत कॉलनीमध्ये राहणारे दीपक बळीराम चौधरी हे वास्तव्यास असून यांचा गार्डन डेव्हलपींगचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे झाडे लागत असल्याने गेल्यावर्षी दि. ५ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी शंकर गवळा रा. चित्रदुर्ग कर्नाटक यांच्यासोबत संपर्क साधला होता. त्यांनी मला गार्डन डेव्हलपींगसाठी लागणाऱ्या झाडांबाबत सांगितले असता, शंकर गवळी यांनी त्यांना सागवान व इतर झाडे घेण्यासाठी चित्रदुर्ग येथे बोलावून घेतले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी तेथे जावून सुमारे दीडलाख रुपयांचे रोखीने झाडे खरेदी केली होती. त्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तीन वर्षाची चिमुकलीचा शेतातील झोपडीच्या अंगणात खेळत असतांना विद्यूत खंब्याला धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात रविवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सोबत असलेल्या मोठ्या बहिणी या बचावल्या आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बावली रूमला पावरा (वय-३) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयत बालिकेचे नाव आहे. नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण आई,वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून राहत आहे. त्यांच्या घराच्या बाजूतून विद्यूत तारा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक रूमला पावरा आणि…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात एक गाडी रविवारी सकाळी सिंध नदीत कोसळली. या गाडीतून सीआरपीएफचे जवान प्रवास करत होते. अपघातात ८ जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सीआरपीएफचे जवान बालटालच्या रस्त्याने अमरनाथ गुहा मंदिराच्या दिशेने जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. अपघातात जखमी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढलं आहे. बालटाल इथल्या बेस शिबिराच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. गांदरबलच्या बटाल भागात नीलग्रार हेलिपॅडजवळ गाडी सिंध नदीत कोसळली.अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. अमरानथ यात्रेचा काळ वगळता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातून सिहोर येथे जाणाऱ्या तरुणांच्या वाहनाचा सेंधवा येथे टायर फुटल्याने भीषण अपघातात चारचाकीचे टायर फुटल्याने वाहन उलटले यात जळगाव येथील एक तरुण ठार तर इतर पाच जण जखमी असून, त्यातील एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. जळगाव शहरातील सहा जण १५ जुलै शनिवार रोजी चारचाकी वाहनाने (एमएच १९ डीजे ७७७३) सिहोर येथे जात होते. संध्याकाळी सेंधवाजवळ वाहनाचे टायर फुटले व हे वाहन उलटले. यात सहापैकी एक तरुण जागीच ठार झाला इतर पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. शहरातील काही मित्रमंडळी व अन्य काही जण याविषयी खात्री करीत होते. मात्र,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची वेळ न घेता संधी साधत अजित पवार गटाने त्यांची वायबी चव्हाण सेंटरवर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे, त्यांचे पायपडून आशीर्वाद घेतले असे म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादी एकसंध राहावी यासाठी आम्ही शरद पवारांना विनंती केली असून त्यांवर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही असे ही यावेळी पटेल यांनी म्हटले आहे. आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली.…

Read More

धुळे : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकार गेल्या आठवड्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी धुळ्यात येवून गेले पण शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात रस्तेच नसल्याने ॲम्बुलन्स पोहोचू शकत नाही. यामुळे गर्भवती महिलेला तब्बल तीन किमीपर्यंत बांबूंच्‍या साहाय्याने केलेल्या झोळीमधून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एकीकडे राज्य सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोहोचून शासन कशा पद्धतीने नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून सेवा देत आहे. याचा गवगवा करत असताना दुसरीकडे हे धक्कादायक वास्तव उघडकीस आल्याने राज्य सरकारचं पुन्हा एकदा पितळ उघड पडल आहे. राज्य सरकार फक्त शहरी भागांमध्येच आपला विकास दाखवत असल्याचं या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित…

Read More