Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना नियमित घडत असतांना एक धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. येथे लोकांना लुटण्यासाठी चोरट्यांनी नवनवी शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. तेथे दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी एका कारचालकाशी भांडण करत त्याला लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयित विशाल चाफळकर, अनिकेत गवळी यांची नावे समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारचालकाला विशाल आणि अनिकेत या दोघांनी धमकावत त्याला लुटल्याची माहिती मिळाली आहे. साहिल ठाकूर असे फिर्यादीचे नाव आहे. गाडीचा कट लागला या कारणावरून विशाल आणि अनिकेत यांनी साहिल ठाकूर याच्याशी भांडण सुरू केले. हा वाद वाढतच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी तोल गेल्याने नदीत पडून अनेक अल्पवयीन मुलांच्या मृत्युच्या घटना सतत घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोहत असलेल्या मुलांना किनाऱ्यावर पाहत बसलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हि दुर्देवी घटना विरारमध्ये घडली आहे, त्यामध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्या मुलाचं नाव तुषार सचिन उंबाळकर असं आहे. तो मुलगा १६ वर्षाचा होता. ही घटना काल सायंकाळी चार वाजता घडली आहे. विरार पश्चिमेच्या चिकल डोंगरी तलाव परिसरात ही घटना घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती. विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार मध्ये एका १६  वर्षाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आजवर जनतेने काका-पुतण्याचे राजकारण पाहिले आहे पण सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सासरे व सुनेचे राजकारण दिसून आले आहे. थेट सुनेने आपल्या सासऱ्याला एका महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हे प्रकरण आहे ते खडसे परिवारातील एकनाथ खडसे यांच्या सून सध्या भाजपच्या खासदार आहे तर खडसे राष्ट्रवादीचे नेते व आमदार देखील आहे. भुसावळ येथे रावेर लोकसभेच्या खा.रक्षा खडसे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सासऱ्याला सल्ला दिला. नाथाभाऊंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसेंनी जालना लाठीमारवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोद यांना साकडं…

Read More

रावेर : प्रतिनिधी  पत्नी घरी गर्भवती असून ती लवकरच प्रसूती होणार असतांना दुचाकीने कामावर जात असलेल्या पतीवर काळाने झडप घालत दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार मनोहर ऊर्फ मनोज कडू वाघ (वय २९) या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात अहिरवाडी गावाजवळ मंगळवारी सकाळी झाला. मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील रहिवासी मनोहर ऊर्फ मनोज वाघ हा मंगळवारी सकाळी दुचाकीने नेरूळ येथे कामावर जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरून रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना देखील अनेक गुन्हेगार तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतांना देखील पकडले जात आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी गुन्हेगारांकडून नवनवीन युक्त्या लढविल्या जात असून शारजाहून आलेल्या एका प्रवाशाने सोबत आणलेल्या मिक्सरच्या भांड्यात तब्बल १ किलो सोने लपविले होते. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. शारजाहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीनंतर विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याने परदेशातून येताना पास्ता बनविण्याचे भांडे तसेच नवा मिक्सर ग्राइंडर याची खरेदी केली होती. अधिकाऱ्यांनी त्याच्या इतर सामानासह ज्यावेळी मिक्सरचा बॉक्स उघडला त्यावेळी त्यामध्ये १…

Read More

साक्षीदार | ५ सप्टेंबर २०२३ राज्यातील अनेक शेतकरी ऊसाची मोठी लागवड करीत असतात पण एक शेतात गांजाची लागवड करीत असल्याचं उघड झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांच्यावरती कारवाई सुध्दा झाली आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात या आगोदर अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. काल जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याचं उजेडात आलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी सगळा परिसर तपासून पाहिला त्यावेळी त्यांना तब्बल 20 किलो गांजा शेतात सापडला आहे. सापडलेल्या गांजाची किंमत अंदाजे किंमत साडे पाच लाख रुपये असल्याची माहिती सांगली पोलिसांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेकांना दारूचे व्यसन लागले असते पण काही लोक या व्यसनामध्ये काय करून टाकतील हे कुणीही सांगू शकत नाही. दारूपायी आणखी एक कुटुंब उध्वस्त झाल्याची धक्कादायक घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका नातवाने दारूच्या नादात असं कृत्य केलं जे ऐकून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. अख्खं गावचं हादरलं. ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोली गावातील आहे. तेथे दारूच्या आहारी गेलेल्या तरूणाने जे कृत्य केले ते ऐकून साऱ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. दारूच्या नादात त्या तरूणाने त्याच्या वयोवृद्ध आजोबांना मारहाण केली. आई आणि पत्नीला घरात लपवून का ठेवलं, असा प्रश्न विचारत त्याने आजोबांना बेदम चोप…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील लहान माळी वाडा येथील रहिवासी विलास रामा महाजन (वय ४२) यांनी फिर्यादीनुसार, मी सन 2022 पासुन शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा धरणगाव शहर अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे. आज दिनांक ०५ रोजी 12.43 वा सुमारास आमच्या धरणगाव शहरातील धरणगाव प्रेस व धरणगाव शहरातील तालुक्यातील इतर सोशल मिडीया (फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटसप ) ग्रुप वर ऑडीओ क्लीप वायरल झाली त्यात जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मोबाईलवर छत्रपती संभाजी नगरातील एका व्यक्तीने त्याच्या मोबाईल यावरुन फोन करुन जालना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी.एस.पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर शरद पवार आज आलेले आहेत. त्यांची जळगावात आज सभा सुरु झालेली होती. यावेळी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते बी.एस.पाटील यांचा पक्ष सोहळा संपन्न झाला. खान्देशातील मोठं नाव असलेले बी.एस.पाटील असून ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईमधील पवई परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर हिच्या हत्येच्या आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आलं आहे. ही हत्या सफाई कामगाराने केली असून पोलिसांनी त्याच्या अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे या हत्येचा उलगडा केला. आता ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली होती की आणखी काही उद्देश त्यामागे होता याचा तपास सुरू आहे. रविवारी एका 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर यांची तिचा राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासाच्या आत त्याच इमारतीत काम करणारा सफाई कामगाराला अटक करून या गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावला आहे. मात्र गेल्या काही दिवसात…

Read More