जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोपडा मार्केटमधील हॉटेल लयभारी हॉटेलमधील कुंटणखाना प्रकरणी पाच जणाविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात पाच महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख, हवालदार सलीम तडवी रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. बनावट…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगरात बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्या दोन जणांवर बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीचे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी सिद्धेश शिर्के यांना समजली व त्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस…
मुंबई : वृत्तसंस्था आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये पब मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पब मॅनेजरने ग्राहकाकडे बिलाचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाने मॅनेजरवर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये मॅनेजर जखमी झाला आहे. तसेच ही घटना घडताच नवी मुंबईचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा हल्ला करणाऱ्या आरोपीने पोलिसांसोबतही आणि अरेरावीची भाषा केली. बिलाचे पैसे मागितल्यामुळे झालेल्या या हल्ल्यातून आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये ग्राहकाकडे पैसे मागितल्यावर त्या ग्राहकाने डायरेक्ट पब मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. पब मॅनेजरने ग्राहकाकडे…
जळगाव : प्रतिनिधी राज्य सरकारच्या अनुदानित आणि सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. सरकारने पोर्टलद्वारे नियमित भरतीचे आश्वासन दिले असताना आता कंत्राटी भरतीचा विषय काढून सरकार या मुद्द्याला फाटे फोडत आहे. सरकारने शिक्षकभरती किंवा शासकीय-निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करू नये, अशी आग्रही मागणी आ. तांबे यांनी मागणी केली आहे. राज्य सरकारने अनुदानित, सरकारी शाळांमधील शिक्षकांसह विविध शासकीय व निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सध्या असलेली शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेत सरकारने आपल्या पोर्टलवरून नियमित भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या साजरा केला जाणारा बैल पोळा सण पशुपालकांनी सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीमुळे बैल मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बैलपोळा पशुपालकाच्या जिव्हाळयाचा सण आहे. मात्र आपल्या बैलाचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून संरक्षण व्हावे, आजाराची…
नाशिक : वृत्तसंस्था एका पतीने पत्नी झोपलेली असतांना तिची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवारी १३ सप्टेंबर पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये ही घटना घडली. या घटनेत विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. हि घटना नाशिकमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील आडगाव परिसरातल्या इच्छामनीनगर गेल्या काही दिवसापासून विशाल घोरपडे हे आपल्या पत्नी प्रीती घोरपडे हिच्यासह राहण्यासाठी होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. दरम्यान, प्रीती गाढ झोपेत असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली. प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यात…
यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस महाविद्यालयात बसलेली असतांना तिचा इन्स्टाग्रामचा आयडी मागून तिचा विनयभंग करणार्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन विध्यार्थीनी एका महाविद्यालयात शिकत असून दिनांक १२ सप्टेबर मंगळवार रोजी विध्यार्थीनी ही आपल्या मैत्रीणींच्या सोबत वर्गात बसलेली असतांना त्याच महाविद्यालयातील एक विध्यार्थी तिच्या जवळ येवून तिला ”तु इंस्टाग्रामवर रील्स बनवते का? तुझा इंस्टाग्रामची आयडी दे” अशी मागणी केली असता विध्यार्थीनीने त्याला मी इंस्टाग्राम वापरत नसल्याचे सांगितले. यावेळी विध्यार्थ्याने लज्जा उत्पन्न होईल असे बोलला असता तेव्हा विध्यार्थीनीने आपण महाविद्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर तीला तुला महाविद्यालय ईमारती…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मातोश्रीचे सहा सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. मंत्री महोदय दुःखात असून देखील बैलपोळा निमित्त मदतीचा हात म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसदारांना बैल जोडी सजवण्यासाठी साज, ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांना किराणा किटचे वाटप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री महोदयांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना स्वतः भेटुन ही भेट द्यायची होती परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर अचानक ओढवलेल्या दु:खा मुळे ते स्वतः पोहचू शकले नाही. तरी देखील दुसऱ्यांच्या अानंदात आपला वाटा असावा या भावनेने त्यांनी आपले दुख बाजुला सारुन शेतकऱ्यांचा पाळा गोड केला. मंत्री महोदय आणि जिल्हा…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील जातेगाव यागावातील एका पती-पत्नीने गावभर चक्कर मारल्यानंतर सकाळी १० वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर नवरा- बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. यात दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात उघडकीस आली. यामध्ये राजू बंडू चव्हाण (३१) व सोनाली राजू चव्हाण (२८) असे आत्महत्या केलेल्या नवरा-बायकोचे नाव आहे राजू हे नाशिकला असतात. मागील आठवड्यात ते सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. मंगळवारी सकाळी राजू यांनी घराच्या बाहेरच असलेल्या मराठा आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर ते घरी गेले. त्यांनी दोन मुलींसोबत जेवणही केले; परंतु, त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दोघांनीही…
नागपूर : वृत्तसंस्था एका मुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केल्यावर आत्महत्या केली. संबंधित तरुणाने व्हिडीओ काढल्यानंतर कन्हान नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत जीव दिला. कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील मिनीमातानगर परिसरातील मनीष रामपाल यादव मृत तरुणाचे नाव आहे. तो इलेक्ट्रिकचे दुकान चालवायचा. तो रविवारी सकाळी १० वाजता घरून दुचाकीने निघाला. सायंकाळी त्याने अगोदर मोबाइलवर व्हिडीओ तयार केले व त्यात त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह केले व मोबाइल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. त्यानंतर कन्हान नदीत उडी घेत जीव दिला. संपर्कात असलेल्या एका मुलीने त्याला जाळ्यात ओढले व पैशांची मागणी…

