जामनेर : प्रतिनिधी दोन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगी झाल्यानंतर बापाने तिची हत्या केल्याची संतापजनक घटना जामनेर तालुक्यात घडली. विशेष म्हणजे नवजात आठ दिवसीय बालिकेच्या तोंडात नराधम पित्याने चक्क तंबाखू टाकली. हरिनगर तांडा, ता.जामनेर येथे रविवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोकुळ गोटीराम जाधव (30) असे या नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, 2 सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर रविवारी चिमुरडीची गोकुळने हत्या केली. आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या,…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या बसचा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसमधील प्रवासी भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होते. मात्र भरतपूर-आग्रा महामार्गावर बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. चालक आणि त्याचा साथीदारासह इतर प्रवासीही बसमधून उतरले. चालक आणि त्याचे साथीदार बस पुन्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्खा भाऊ वैरी झाल्याची हि घटना आहे एका चपातीवरुन झालेल्या वादात त्याने आपल्या मोठ्या भावाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचं कारण ठरली एक चपाती. आरोपीने फक्त मोठ्या भावाची हत्याच केली नाही तर त्यानंतर त्याने मृतदेहासोबत जे केलं ते कळाल्यानंतर लोकांना धक्काच बसला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील बिल्हौर भागातील नानामाऊ गावात एका घरात दोन भाऊ एकाचे नाव कल्लू तर दुसऱ्याचे भुरा हे राहत होते. यात कल्लू हा मोठा भाऊ होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. भुरा विवाहित आहे. रक्षाबंधनाला त्याची पत्नी…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक रोड परिसरातील दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ ३० वर्षीय तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता असतांना त्याचा मृतदेह पोलिसांना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला. प्रेम प्रकरणावरून या तरुणाची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोच धागा पकडत नाशिक पोलिसांनी अवघ्या २ तासात पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी जेलरोड येथील पंचक येथे राहणारा ३० वर्षाचा तरुण बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. सोमवारी या युवकाचा मृतदेह दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह…
भुसावळ : प्रतिनिधी तुम्ही शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन तुम्हाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. यापुढेही तुम्ही अशाच पध्दतीने काम करावं. हा पुरस्कार पुढच्या मोठ्या पुरस्काराची पायाभरणी ठरावी. पुढे पुढे आपली राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मजल जावी, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. भुसावळ येथील नाहाटा विद्यालयातील वाचन कक्षात नुकताच शिक्षक दिनानिमित्त ‘गुरूगौरव सत्कार समारंभ – २०२३’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. सत्यजीत तांबे बोलत होते. आ. तांबे पुढे म्हणाले की, ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी निश्चितच त्यांच्या नोकरीमध्ये, कार्यामध्ये काहीतरी असं कामं केलेलं असणार. ते काम बघूनचं संयोजकांनी आणि आयोजकांनी शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे.…
अवघ्या काही महिन्यांवर २०२४ ची विधानसभा निवडणूक आहे. अशात या निवडणुकीची चर्चा, तर्कवितर्क आणि कोण कुठून निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा होत आहे. अशातच पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. ही यात्रा देवदर्शनाच्या अनुषंगाने काढली असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पण या यात्रे दरम्यान अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. परळीतील वैद्यनाथाचं दर्शन घेत या यात्रेचा काल समारोप झाला. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. त्यांचं हे भाषण म्हणजे आगामी निवडणुकीचं रणशिंग असल्याचं राजकीय वर्तुळात आता बोललं जात आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या परळी मतदारसंघाची चर्चा रंगली आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात लेफ्टनंट कर्नल पडला असतांना एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी एका महिलेचा मृतदेह कुचलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्यावेळी ही माहिती पोलिसांना समजली, त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचा २४ तासाच्या आत छडा लावला असल्याचं पाहायला मिळालं आहे. ती महिला मुळची नेपाळची असल्याचे एका हिंदी वेबसाईटने सांगितले आहे. त्या महिलेच्या हत्या करणारा व्यक्ती दुसरा कुणी नसून लेफ्टनंट कर्नल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. हे प्रकरण उत्तराखंड राज्यातील देहरादून राजधानीतील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केलं आहे. हे संपूर्ण प्रकरण प्रेम…
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा शहरातील भारत डेअरी बस स्टॉप जवळ व नागसेन नगर येथील दिपक बागुल व राजेश खैरनार या गावठी दारू विक्रेत्यांवर आज कारवाई करण्यात आली. पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी विभागाचे पोलीस कर्मचारी गिरीश पाटील, नंदू पवार यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे. यामध्ये तयार गावठी दारू विक्रेत्याकडून ६० लीटर गावठी पोटलीसह तयार ३३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू असून ‘शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यात देखील गावठी हातभट्टी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था खेडा जिल्ह्यातील एका महिलेला तिच्या वृद्ध सासऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परदेशात जाण्यासाठी त्याने तिला २ लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. आरोपी सुनेने सासऱ्याचे गुप्तांग कापले व डोक्यावर जोरदार प्रहार केला. गुजरातमधील धक्कादायक घटना चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश शर्मा (७५) असे मृताचे नाव असून सून मनीषा शर्मा हिने पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आणि सासऱ्यासह अनेकदा शारीरिक संबंध बनवले व त्या बदल्यात पैसे मिळायचे असे सांगितले. सुमारे महिनाभरापूर्वी मनीषाची फेसबुकवर एका पुरुषाशी मैत्री झाली. त्याने तिला परदेशात जाण्याचे स्वप्न दाखवले, पण त्यासाठी २ लाख रुपयांची गरज…
अमरावती : वृत्तसंस्था अमरावतीहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसला वाशिम ते हिंगोली महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली असून, महामंडळाचे जवळपास २० लाख रुपयांवर नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अमरावतीहून रविवारी दुपारी ३ च्या सुमारास प्रवाशांना घेऊन ही बस चिंचाळा पाटीजवळ सायंकाळी ६:३० च्या सुमारास आली. या ठिकाणी बस पंक्चर झाल्याने चालक व वाहकांनी प्रवाशांना खाली उतरविले व पाठीमागून येणाऱ्या एका बसमध्ये प्रवाशांना बसवून दिले. त्यानंतर चालक गोपाल कोव्हळे व वाहक ज्ञानेश्वर सांगळे बसचे चाक बदलत असताना हिंगोलीकडून दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून पेटवून…

