ठाणे : वृत्तसंस्था कसारा येथील वीर तानाजीनगर परिसरातील एका घरात प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमनाथ सोनवणे (वय २३ वर्ष) आणि सुजाता देशमुख (वय २१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. सोमनाथ आणि सुजाता यांनी आत्महत्या करण्याचं कारण काय? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि सुजाता हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दीड महिन्यांपूर्वी दोघेही घर सोडून कसारा येथील…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक पोलिसावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका वकिल महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विविध ठिकाणी नेवून, बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. पालघर पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी असलेले मल्हार धनराज थोरात होता. त्याने नालासोपारा, वालीव आणि दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी काम केलं आहे. पीडित महिला ही 33 वर्षाची असून, ती व्यवसायाने वकिल आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील चांदिवली येथे एसयूव्ही कारची धडक बसून एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या आलिशान गाडीचा चालवणारा चालक, हा अवघ्या १४ वर्षांचा मुलगा होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, एकच खळबळ माजली असून एवढ्या लहान मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकांबद्दलही संताप व्यक्त होत आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. त्या व्हिडीओनुसार, सकाळच्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक कॉलनीच्या गेटमधून चालत बाहेर आले व रस्त्याच्या कडेने चालत होते. तेवढ्यात त्याच बिल्डींगच्या गेटमधून एक एसयूव्ही (कार) बाहेर आली. डावीकडे वळतानाच एसयूव्हीची, बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला धडक बसली.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना आज पुन्हा एकदा पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्रीच्या सुमारास खंडाळानजीक झालेल्या मालवाहतुकीच्या वाहनांच्या अपघातात तिघे जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. पाेलिस या घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली हाेती. सुमारे तासभरांनंतर पाेलिसांनी वाहतुक सुरळीत केली.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवण्याचं काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना वसई परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी नराधमाला वालीव पोलिसांनी अटक केली असून राजाराम मौर्य (वय ५३) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेस गावराई पाडा येथे संत लीला शाह हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज असून या शाळेत आरोपी राजाराम मौर्य हा जेवण बनवण्याचे काम करतो. या शाळेत इयत्ता चौथीत पिडीत अल्पवयीन मुलगी शिकत असून ५३ वर्षाचा आरोपी राजाराम मौर्य याने या शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षाच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी के सी जोशी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, तसेच कंपनीची सरकारी नोंदणी आणि नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई केली. सीबीआयने जोशीच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही छापे टाकले. तिथून २.६१ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “ईशान्य रेल्वे, गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य अधिकारी के सी जोशी यांना मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरने सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ईशान्य रेल्वेला सेवा आणि विविध उत्पादनांची विक्री…
जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेले आंदोलन अखेर सुटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये आले आणि त्यांच्या हस्ते ज्यूस घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आहे. मात्र, त्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 15 व्या दिवशीच यावरील तोडगा निघाला होता. मात्र, उपोषण सोडण्यासाठी 17 वा दिवस उजाडावा लागला. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुंबई पासून ते आंतरवाली सराटीपर्यंत अनेक घटनाक्रम घडल्यानंतर उपोषण अखेर मागे घेण्यात आले. इतकेच नाही तर सरकारला आणखी 10 दिवसांचा…
जळगाव : प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलाने दुस-या अल्पवयीन मुलासोबत मध्यरात्रीच्या सुमारास अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील मुलांच्या निरीक्षणगृहात उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका विरोधात जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मुलांच्या निरीक्षणगृह / बालगृहातील दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने सोबत असलेल्या १० वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर मारहाण करण्याची धमकी अल्पवयीन मुलास देवून हे चुकीचे कृत्य करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि.मिरा देशमुख करत आहेत.
नांदेड : वृत्तसंस्था आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीसह तीन वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची घटना कंधार तालुक्यातील बोरी खु. येथे बुधवारी पहाटे घडली. माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला मुलीच होतात, या कारणावरून या हत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. हि घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मयत भाग्यश्री यांची आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तुला मुलगीच कशी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता, असे म्हणून सासरी छळ होत होता. भाग्यश्री दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर तुला दुसरी पण मुलगीच आहे. तू चेक कर असा तगादा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार,…
जळगाव : प्रतिनिधी आठ महिन्यांपूर्वी चोरलेली दुचाकी जळगावात विक्रीसाठी आलेल्या गौरव अशोक मोटवाणी (रा. जालना) याच्या जिल्हापेठ पोलिसांनी तांबापुरातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. निमखेडी शिवारातील रहिवासी असलेले विलास नारायण महाजन यांची दुचाकी १६ जानेवारी रोजी सिंधी कॉलनीतून चोरीला गेली होती. ही दुचाकी गुन्हेगार गौरव मोटवाणी याने लांबविली असून, बुधवारी तो तांबापुरा भागात दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. यांनी केली कारवाई सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. सलीम सुभान तडवी, पो. कॉ. रविंद्र साबळे, पोकाँ…

