सावदा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील सावदा शहरात दि.२९ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी बस मध्ये १८ प्रवासी असल्याचे समजते यापैकी खाजगी बस चालक चौधरी नामक व्यक्ती जखमी झाला असून त्यास आशीर्वाद हॉस्पिटल फैजपूर येथे दाखल आहे. प्रवाशांपैकी रावेर येथील १३ वर्षीय बालक किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी सावदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी येथील पत्रकारांनी आंदोलन केले होते व यावेळी नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन तात्काळ या रस्त्याचे दुरुस्तीचे आश्वासन दिले…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावरील जैन लाल मंदिरासमोर चार चाकी व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार तर मागे बसलेला जखमी झाला आहे. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. मृताचे नाव फारुख खान युसुफ खान (वय २७ रा. फातेमानगर, मलकापूर) असे आहे. एनगाव (ता. बोदवड) येथील श्रीकृष्ण छगन पारधी चारचाकीने परिवारासह जळगावला आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून वरणगावकडे जात असताना महामार्गावर दुचाकीने क्रमांक (एम एच २८ यू ९३२३) समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार फारुख खान युसूफ खान जागीच ठार झाला. मागे बसलेला राजू प्रताप साळुंखे हा जखमी झाला. त्यांना…
मुंबई : वृत्तसंस्था मागील वर्षी पहिल्यांदाच शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे पक्षाचे दोन वेगळे दसरा मेळावे पार पडले होते. दोन्ही गटांनी आपला दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. मागील वर्षी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी जागा मिळाली होती. मात्र यंदाच्या वर्षी ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये जागा मिळेल का? याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. गेल्यावर्षी मैदानावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाकडून आधीच अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेला महिनाभरापूर्वीच अर्ज दिला आहे. महापालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात सावध…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतांना यात नाशिक शहराचा देखील नंबर लागू लागला आहे. नुकतेच उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर झोपडपट्टीत पैशांसाठी मुलाने आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने आई जखमी झाली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मुलाविरूध्द खूनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण परशुराम गालट (२८ रा.क्रांतीनगर,झोपडपट्टी उंटवाडीरोड) असे आपल्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी काजल आसरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या हल्यात जानकी परशुराम गालट (४५) या जखमी झाल्या आहेत. गालट मायलेकामध्ये गुरूवारी (दि.२८) सायंकाळी पैशांच्या कारणावरून…
नाशिक : वृत्तसंस्थास नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अल्पवयीन मुलीसह महिलाचा विनयभंग केल्याची घटना नियमित घडत असतांना मखमलाबाद येथे हॉटेल हिंदकेसरी समोरून रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रिकुटाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रक्रणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास परिसरातील हॉटेल हिंदकेसरी समोरून पायी जात असतांनापाठीमागून पाठलाग करीत आलेल्या संशयित आरोपी ओंकर पांडुरंग चारोस्कर (वय २०), राहुल सिताराम लिलके (वय २०) व किरण शंकर काबडी (वय २०, सर्व रा. मातोरी) यांनी तिची वाट अडविली. यावेळी एकाने तुझ्याशी बोलायचे असे म्हणून थांबविण्याचा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात काल गणरायाचे विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गणरायाच्या विसर्जनानंतर आज पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची-वहागाव हद्दीत सर्व्हिस रस्त्यावर नाल्यामध्ये अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळालेल्या अवस्थतेत मृतदेह आढळून आल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनवासमाची-वहागाव, ता. कराड या गावच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास काही ग्रामस्थांना अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ तळबीड पोलिसांना दिली. दरम्यान या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजकारण गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येत असते. अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या आईची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव भागात 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. कानन रॉय (६२) असे मृत महिलेचे नाव आहे. भाजपचे स्थानिक नेते जयंत रॉय यांच्या त्या आई आहेत. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी स्थानिक टीएमसी नेते समीर मलिकला अटक केली आहे.समीर मलिक अनेकदा कानन रॉय यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन करत असे, असा स्थानिकांचा आरोप आहे.…
नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गणेश विसर्जनाचा उत्साह सुरु असतांना नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गोदावरी नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २८ सप्टेंबर घडली आहे देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहरात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. परंतु…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हुज्जतबाजीसह आपापसात लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोर्ट चौक परिसरापासून गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होण्याच्या वेळी दोन गटात हा वाद झाला. आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलस सोनवणे, गौरव साखला, गोविंद पंडीत, अजय गांधी, सागर भिमराव सोनवणे (पहेलवान) अशा सात जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार संगिता खांडरे या गुन्ह्याचा तपास करतआहेत.
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरु असतांना एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. सिन्नर-घोटी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली शिवारात कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील गावठा येथील पवन सुनिल भाटजिरे असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन व त्याचे दोघे मित्र सोपान विष्णू लोंढे व अक्षय राजेंद्र लोंढे हे आपली कार (एम. एच. ४८ बी.एच. ७१९२) ने सिन्नरहून घोटीकडे जात होते. यावेळी पांढुर्ली शिवारातील गीता पेट्रोलपंपाजवळ कार आली असता समोरून येणारी वॅगनार (एम. एच. ०४ एल. क्यू. २४८५) ने ओव्हरटेक करताना त्यांच्या कारला…

