नाशिक : वृत्तसंस्था पिंपळनेर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओझरदे गाव शिवारात एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना मे महिन्यात उघडकीस आली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी डीएनए तपासणीच्या आधारे संशयित निष्पन्न केला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील ओझरदे गाव शिवारातील एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दि. ३ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दि. ४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी मतिमंद असल्याने या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तांत्रिक पध्दत अवलंबून पीडित मुलगी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी विनापरवाना वाहनांमध्ये निदर्यीपणे ५३ म्हशी कोंबून वाहतूक करणारे तीन वाहनांवर शनिवारी नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत म्हशी, वाहने असा एकूण ३६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहनांमधून अत्यंत निदर्थीपणे गुरांना कोंबून त्यांची वाहतुक होत असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नशिराबादमधून संशयास्परित्या जाणाऱ्या (एमएच १८ बीजी ९३१६), (एमएच १८ बीझेड २४४४) व (एमपी १३ जीबी ३६५४) क्रमांकाच्या वाहनांची तपासणी केली. यामध्ये पोलिसांना वाहनांमध्ये अत्यंत निदयपणे म्हशी कोंबलेल्या दिसून आल्या. तसेच म्हशींसाठी खाली कोणतेही गादी टाकलेली नव्हती (मॅटिंग) आणि पशू…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरातील सुभाषवाडी येथील २२ वर्षीय तरुणाने विहरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. पवन भिका जाधव असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील सुभाषवाडीमध्ये पवन जाधव हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी तो कुटुंबियांना मी बाहेर जातो असे सांगून घरातून निघाला. त्यानंतर त्याचा भाऊ आणि वडील हे कामावर निघून गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी पवन हा घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी संपुर्ण गावात आणि नातेवाईकांकडे पवनचा शोध घेतला. मात्र तरी देखील तो मिळून न येत…
सुरत : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू कधी व कसा येणार हे कुणीही सांगू शकत नाही अगदी चालता- बोलता, हसता- खेळता मृत्यू आल्याचे अनेक प्रसंग आजपर्यंत ऐकले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आठवीतील मुलीचा वर्गातच ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सुरतमधील गोडादरा इथल्या शाळेत १२ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला. वर्गात शिक्षिका शिकवत असतानाच मुलीला अस्वस्थ वाटू लागते. आणि काही क्षणात ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. अचानक घडलेल्या या घटनेने वर्गातील शिक्षिकेसह मुलेही घाबरुन गेली. शिक्षिकेने मुलीला लगेच उठवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण…
मुंबई : वृत्तसंस्था सध्या सोशल मिडीयावर नेहमीच मुंबईतील लोकलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही लोक मनोरंजनासाठी गाणे गात असतात तर काहींचे तुफान हाणामारीचे देखील व्हिडीओ समोर आले आहे. अशीच एक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मुंबई लोकल मधून प्रवास करत असताना दोन व्यक्तींमध्ये अचानक काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि दोघांमधील एकजनाने एकाची कॉलर पकडली आणि वाद आणखीनच चिघळा. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना कानशिलात लगावली आणि येथूनच फ्री स्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करायचा सोडून इतर लोक केवळ बघ्याची भूमिका बजावत होते. तर काहीजण व्हिडीओ काढण्यात मग्न होते. वादाच कारण अजून समजू शकलं नाही. …
नागपूर : वृत्तसंस्था अनेक लोकांना कॉफी प्यायला आवडत असते. कडू-गोड चवीच्या कॉफीचे घोट घेल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. आजकाल कॉफी तयार करण्यासाठी नवनवी मशीन्सही आली आहेत. कॉफी मेकर मशीनही त्यापैकीच एक आहे. पण या कॉफी मेकर मशीनचा वापर एका व्यक्तीने अशा कामासाठी केला ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. त्याने असं नेमकं काय केलं की पोलिसांनी त्याला थेट तुरूंगातच टाकलं ? नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका इसमाच्या हालचाली संशयास्पद होत्या. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने अधिकाऱ्यांनी त्याला थांबवलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्यांना त्यामध्ये कॉफी मेकर मशिन सापडलं. आणि त्याच्या आत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचं सोनं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या दोन वर्षापासून झटक्यात श्रीमंत होण्याचे अनेक लोक स्वप्न बघत असतात पण काही लोक याचमाध्यमातून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. ऑनलाइन माध्यमातून, तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या सहाय्याने लोकांशी संपर्क साधून त्यांना बोलण्यात गुंतवायचे. तसेच ठराविक काम केलेत तर किंवा ठराविक रक्कम गुंतवली तर तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील, अशी लालूच दाखवत लोकांना लुबाडणारे अनेक गुन्हेगार सध्या कार्यरत आहेत. झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने लोकही पुढचा मागचा विचार करत नाहीत आणि सरळ मेहनतीने कमावलेले पैसे गुंतवून बसतात. मात्र बऱ्याच जणांची यात फसवणूक होते आणि दुप्पट पैसे तर सोडाच गुंतवलेल्या मूळ रकमेवरही पाणी सोडावे लागते. सायबर क्राईमचे (cyber crime) असे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना आज एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात केल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला देखील स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलीस विभागात सराईत गुन्हेगारावर धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) यावर कारवाई केली आहे. हि कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने हि कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस स्टेशनला संतोष राऊत याच्याविरुद्ध ९ गुन्हे दाखल असून दोना वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी,…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामानंद नगर पोस्टे हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन संशयित आरोपींना एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे व मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोस्टे हद्दीतील सचिन अभयसिंग चव्हाण रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा जळगाव, नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा जळगांव, व राहुल नवल काकडे रा. समता नगर यांना स्थानबध्द करण्यात आले आहे. या तिघाही तरुणावर रामानंद नगर पोस्टे हद्दीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी करीत असताना गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या करीता तिन्ही धोकादायक इसमांवर कायद्याचा वचक राहावा व भीती राहावी तसेच त्यांच्या हातुन समान्य…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरूण येथील २५ वर्षीय तरुणाचा झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. वावडदा येथील रामदेववाडी जवळ गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकींचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यातील २५ वर्षीय तरुणाचा क्रवारी दुपारी १ वाजता उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसरातील राम मंदिर येथील रहिवासी निलेश गोकुळ पाटील (वय २५) व महेश रविंद्र खोरपडे (वय ३०) हे दोघे वावडदा येथून गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ६. ३० वाजेला जळगावात परतत होते. रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी…

