जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ यांचा पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात असलेल्या स्व.प्रल्हादभाऊंचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात असलेल्या सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व.प्रल्हादभाऊंचा पुतळ्याला जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख, एरंडोल शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबलु पाटील यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भूकंपाच्या धक्क्याने हादरुन गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी होती. ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लखनौ, उत्तराखंड आणि नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले की, दुपारी २.५१ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या भुकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. डेहराडून, उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या प्रकाराने…
बुलढाणा : वृत्तसंस्था बुलढाण्यासह परिसरात रविवारपासून गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. बुलढाण्यातील अशोक सातव यांच्या घरी ती व्यक्ती अचानक गजानन महाराजांच्या वेशात येऊन बसला होता. या बाबाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आता हा बाबा नेमका कोण आहे? त्याबाबत माहिती समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार, या बाबांचे नाव शेषेराव बिराजदार असून बाबाने शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेतलाय. या बाबाजवळ ओळखपत्र सापडलं असून तो लातूरचा असल्याचं समजलंय. न्यूज स्टेट या वृत्तवाहिनीने या बाबाची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत बाबाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय. “शेगावातल्या आनंदसागरमध्ये माझी गादी आहे. येथे मी लोकांची सेवा…
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील शासकीय शालेय विध्यार्थींना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यानुसार आता बांधकाम मजुरांना देखील माध्यान्ह भोजन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. परंतु या माध्यान्ह भोजनाबाबत तक्रार येणे सुरूच आहे. निकृष्ट दर्जाचे हे भोजन असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यात आता भोजनात किडे आढळून आल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. हि घटना हिंगोलीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या कामगार विभागा मार्फत बांधकाम मजुरांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात विषारी किडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत उघडकीस आला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जवळा पळशी गावात तुरीच्या डाळीमध्ये नाकतोडा नावाचा किडा आढळला असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. सदर प्रकारानंतर या…
सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्याआधीच राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर अजून देखील अनेक नेते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु असतांना आता शरद पवारांच्या गटातील एका खासदाराची जोरदार चर्चा सुरु होती. सोमवारी अमोल कोल्हे एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी पारितोषिक वितरण समारंभादरम्यान एक चिमुकला त्यांच्याजवळ आला. पारितोषिक स्वीकारल्यानंतर या चिमुकल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात “पवार साहेबांची साथ सोडू नका”. असं सांगितलं. हर्षवर्धन पाटील असं अमोल कोल्हे यांना साद घालणाऱ्या चिमुकल्याचं नाव आहे. हर्षवर्धनच्या तोंडातून हे उद्गार ऐकल्यानंतर खासदार अमोल कोल्हे थक्क झाले होते. त्यांनी या चिमुकल्याचं तोंडभरून कौतुक केलं. या कार्यक्रमातील भाषणात हर्षवर्धनने…
चंडीगड : वृत्तसंस्था पंजाबमधील जालंधर येथे चार ते नऊ वर्षे वयोगटातील तीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह एका ट्रंकमध्ये आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी त्या मुलींची आई व वडील यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बहिणी रविवारपासून बेपत्ता होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, तीन बहिणींचे मृतदेह असलेली ट्रंक त्यांच्या घराबाहेर ठेवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना मुलींच्या आईवडिलांवर पोलिसांचा संशय बळावला. तीन मुलींची आपणच हत्या केली, अशी कबुली आईवडिलांनी पोलिसांकडे चौकशीदरम्यान दिली. पोलिसांनी सांगितले की, हालाखीची आर्थिक स्थिती असल्यामुळे तीन मुलींचे पालनपोषण करणे त्यांच्या आईवडिलांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी तिघींना विष चारून एका ट्रंकमध्ये ठेवले. तिथेच त्यांचा मृत्यू…
बीड : वृत्तसंस्था मजुरी करून खाणाऱ्या भाच्याने मामाच्या घरी जाऊन पोटासाठी भाकर मागितली. याच ठिकाणी मामे भावासोबत बाचाबाची झाली. यात त्याने गावठी कट्टा काढून मेहुण्यावर गोळीबार केला. यात एक गोळी त्याच्या छातीत अडकली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना बीड शहरातील पानूड गल्लीत रविवारी मध्यरात्री घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाला आहे. हि घटना बीड येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज दत्ता जाधव (३०) असे जखमीचे नाव आहे. तर रितेश विलास गायकवाड (२२) हा आरोपी आहे. मनोज हा मजुरी करतो. त्याच्यासोबत पत्नी राहत नसल्याने ज्या ठिकाणी मजुरी करेल तेथेच जेवण करायचे, त्यांच्याकडून पैसे घेऊन तो नशा करत असे.…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कजगाव या गावात सात ते आठ दरोडेखोरांनी गावात दोन ठिकाणी दरोडा टाकल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, भडगाव पोलिसात याप्रकरणी पावणेचार लाखांचा ऐवज लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सदस्यांना मारहाण करीत सोने -चांदीसह अंदाजे लाखोंचा ऐवज लूटल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरांवर दरोडा पडल्याचे सांगण्यात आले. दरोडेखोरांनी चव्हाण व देशमुख कुटूंबास मारहाण करीत सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली. घटनास्थळी पोलिस अधिकार्यांनी धाव घेतली तर…
मनमाड : आप्पा बिदरी राज्यातील गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठय प्रमाणात अडवणूक होत असल्याने नाशिक जिल्ह्यात या कोंडीप्रकरणी मनमाड बाजार समितीमध्ये सभापती व संचालक मंडळाने व्यापाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेऊन उद्यापासून कांदा लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बैठक तोडग्याविनाच पार पडली. व्यापऱ्यांनी तातडीने लिलावात सहभागी होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक थांबविण्याचे आवाहन सभापती संजय पवार यांनी केले. उद्यापासून लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱयांवर बाजार समिती प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचा इशाराही पवार यांनी दिला तर शासन संपाबाबत सकारात्मक नसल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला.पिंपळगाव बसंवत होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठक होणार आहे. त्यात काय निर्णय…
मलकापूर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सतत सुरु असतांना आज देखील पहाटेच्या सुमारास बुलडाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघाताची घटना सोमवारी पहाटे साडे ५ वाजेच्या सुमारास घडली. नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे. मलकापूर जवळील ग्राम वडनेर भोलजी उडानपुलजवळ हा अपघात झाला आहे. यामधील मृतकांची नावे – प्रकाश मकु धांडेकर (26), पंकज तुळशीराम जांबेकर (19), राजाराम दादूजांबेकर (35) व अभिषेक रमेश जांबेकर (18)…

