Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका परिसरात सोशल क्लबच्या नावाने सुरु असलेल्या नेरीनाका परिसरातील मोठ्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे जुगाऱ्यांनी मिळेल तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. याठिकाणाहून २७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून ६ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या नेरीनाका परिसरात सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुलासह मुलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दि. ४ रोजी शहरातील एका परिसरातील १६ वर्षीय मुलीने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने परिवाराला समजताच तिला रुग्णालयात दाखल केले होते या मुलीने मृत्यूशी ४ दिवस झुंज दिल्यानंतर दुर्देवाने तिचा अखेर मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय दिया संदीप बनसोडे या अल्पवयीन मुलीने दि. ४ ऑक्टोंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले.…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक या गावात आई-वडिलांनी विभक्त होऊन स्वतंत्र वेगवेगळा संसार थाटून वाऱ्यावर सोडलेल्या नंदिनी दीपक महाजन (वय १५) या ९ वी त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आजीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. केन्हाळे बुद्रुक येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जन्मदात्री मातेच्या घरी (माहेरी) ही घटना घडली. आजी भाजीपाला विक्री व्यवसाय करुन या नातीचा सांभाळ करीत होती. मात्र, ७ ऑक्टोबर रोजी आजी रावेरला गेली असताना घरी कोणीही नसल्याचे पाहून नंदिनीने घरात गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजी निर्मलाबाई उमाकांत महाजन या रावेरला भाजीपाला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी न होता वाढत असतांना दिसत आहे. नुकतीच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 60 वर्षीय व्यक्तीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुख्य म्हणजे, बलात्कार केल्यानंतर भितीपोटी संबंधित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेच्या बरेली जिल्ह्यातील फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक ती गायब झाली होती. बराच वेळ ती घरी परतली नसल्यामुळे…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा शहरातील एका परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासोबतच लोखंडी तलवार जप्त करीत तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील जारगाव येथील रहिवासी विशाल पंकज देसले (वय-२०) हा तरुण हातात तलवार घेवून जारगाव चौफुली येथे दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोलीसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी विशाल देसले याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस हवलदार योगेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जागतिक मानसीक आरोग्य दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती ,युवाशक्ती फाउंडेशन आणि शहरात गाऊ आनंदाची गाणी या कार्यक्रमाचे आयोजन 10 ऑक्टोबर संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आलेले आहे .मानसशास्त्र सांगते की गाणी गायल्यामुळे डान्स केल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपल्या मेंदूमधील हॅपी हार्मोनची वाढ होत असते .व्यक्ती आनंदी होत असतो .आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला तान तणावांना सामोरे जावे लागते .अधिकच्या ताणतणावामुळे माणूस आनंदापासून पारखा होतो . असे म्हणतात आनंदी मन यश खेचून आणते . मनाला आनंदी करण्या करताच जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून काव्यरत्नावली चौकामध्ये मनसोक्त आनंदी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .…

Read More

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता यात लातूर जिल्ह्यात देखील खुनाच्या घटनेने हादरून गेला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान या घटनेचा तपास औसा पोलीस करत आहेत. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार लातूर औसा महामार्गावरील कारंजे खडी केंद्राच्या परिसरात इस्माईल मुबारक मणियार (वय 41, राहणार हरंगुळे, ता. जि. लातूर) हे आले हाेते. तेथे त्यांचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला. मणियार यांच्या डाेक्यात ठेचून मारण्यासह शरीरावर इतरही ठिकाणी गंभीर मारहाण केल्याचे निदर्शानस आल्याचे पाेलीसांनी सांगितले. या खूनाचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक शहरात छोट्या मोठ्या घटनेतून आगीच्या घटना घडत असतांना पंजाबच्या जालंधरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जालंधरच्या अवतारनगरमध्ये घरातील फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत २ चिमुकल्यांसह एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही घटना घडली. घरातील सर्व सदस्य क्रिकेट मॅच पाहण्यात व्यक्त होते. याचवेळी त्यांच्या घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्याने कॉम्प्रेसरमधील गॅस संपूर्ण घरात पसरला. या आगीच्या आणि गॅसच्या झपाट्यात कोणालाही घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे 65 वर्षीय…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यापासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त सुरु केली असतांना एका कारचा संशय आल्यानंतर पाठलाग करीत 18 लाखांची अफूची बोंडे जप्त केली तर पोलिसांना पाहताच संशयित चालक पसार झाला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ ही कारवाई केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आवाड हे रविवारी पहाटे गस्त करीत असतांना त्यांना शहरातील धुळे रोड महाविद्यालयाजवळ कार (क्रमांक एम.पी. 09 डब्यू.सी.1485) दिसल्यानंतर त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने कार पळवल्यानंतर पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ वाहन सोडून चालक…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान…

Read More