कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवर थांबलेल्या देहविक्रय करणाऱ्या महिलेला (३२) दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून आणि तोंडाला रुमाल लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत्या कारमधून उडी मारून महिलेने स्वतःची सुटका करून घेतली, तर पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन संशयित पळाले. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन रोडवरील एका बेकरीसमोर संबंधित महिला उभी होती. त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल लावून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर कार स्टेशन रोडवरून भवानी मंडपकडे गेली. तिथून पुन्हा कार छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी महिलेने वाचवा….. वाचवा… असा आरडाओरडा केल्याने…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केला. तू माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझा जीवच घेतो, असे म्हणत त्याने मुलीचा विनयभंग केला. नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका १७ वर्षीय विद्यार्थिनीची राजिक खान ऊर्फ रियाज खान (२२, नवीन कामठी) याच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. काही काळाने ते फोनवर बोलू लागले व त्यांच्यात प्रेम झाले. मात्र, त्याची संगत चांगली नसल्याचे कळल्यावर विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर राजिक तिचा वारंवार पाठलाग करू लागला. त्याने तिला लग्नाचीदेखील मागणी घातली. मात्र, तिने त्याला नकार दिला. संतापलेल्या राजिकने ८ ऑक्टोबरला…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतून विमानाने कोचीला जाण्यासाठी निघालेल्या मल्याळी सिनेमातील एका आघाडीच्या अभिनेत्रीला सहप्रवाशाने त्रास दिल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीने तिच्याशी वाद घातला तसेच तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्नही केल्याची घटना तिने विमानातील केबिन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तिची जागा बदलून तिला दुसरी सीट देण्यापलीकडे विमान कर्मचाऱ्यांनी या घटनेची फारशी दखल घेतली नसल्याचा दावा तिने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाने मंगळवारी रात्री ही अभिनेत्री मुंबईतून कोची येथे जाण्यासाठी निघाली होती. तिला मधली सीट मिळाली होती. मात्र, तिच्या बाजूला बसलेल्या एका प्रवाशात व तिच्यात काही वाद झाला. त्यानंतर प्रवाशाने तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील सेंट्रल बँक कॉलनीतील एक परिवार अंत्यसंस्कारासाठी गावी गेल्याची संधी साधत बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात चार संशयित चोरट्यांच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे हे वास्तव्यास आहेत. दि. ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. काही दिवस त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना एक भीषण अपघात नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिक्षात कलर घेवून मोताळा येथे जात असलेल्या रिक्षाला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी ता. मोताळा, जि. बुलढाणा) या जागीच ठार झाल्या. तर त्यांच्यासोबत असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून (एमएच १९ बीयू ५८४३ ) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून प्रवासी कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या…
पुणे :वृत्तसंस्था अनेक तरुण-तरुणी कुठल्या ना कुठल्या कारणाने आत्महत्या करीत असल्याचे अनेक घटना राज्यात घडत असतान एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. २५ वर्षीय तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत असतांना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय-25 रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली धुमाळ ही विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. ती उरुळी कांचन परिसरात माहेरी राहत होती. मागील एक वर्षापासून ती पोलीस भरतीची तयारी करीत होती.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कार चालकाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या वेदनादायक आणि हृदयद्रावक घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या कारस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर पोलिसांनी तपास केला असता, हा व्हिडीओ NH8 च्या सर्व्हिस रोडचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला, त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई शहरातील विरार पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 मजली इमारतीवरून चार वर्षांची चिमुकली खाली पडल्यामुळे तिचा मृत्यु झाला आहे. ही घटना विरार पश्चिम येथे असलेल्या बचराज नावाच्या 19 मजली इमारतीत घडली आहे. चिमुकलीची आई पतीला सोडवण्यासाठी स्टेशनवर केली असतानाच याचं वेळेत खिडकीतून डोकावून पाहताना तिचा तोल गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 19 मजली इमारतीत चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये जयालयन कुटुंब राहते. त्यांना चार वर्षीय दर्शनी नावाची मुलगी एकुलती एक होती. काल सकाळी दर्शनीची आई तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी स्टेशनवर गेली होती. यावेळी दर्शनी झोपली असल्यामुळे आईने तिला उठवले…
मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक घरातील सासू-सुनेचे नाते खूप महत्वाचे मानले जात असते. पण काही काही परिवारात हेच नाते भयावहक झाले असते. अशाच एका परिवारातील व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. कोपरीमध्ये ७७ वर्षीय ज्योती दयारामानी या सासूलाच ५३ वर्षीय कोमल दयारामानी या सुनेने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली. या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. https://twitter.com/sirajnoorani/status/1711427150770036767?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1711427150770036767%7Ctwgr%5Ed0058fb4fe00c6f1d26c9fa1c87a64d4f2915863%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fforyou%3Fmode%3Dpwaaction%3Dclicklaunch%3Dtrue कोपरीतील नाखवा हायस्कूलजवळील सिद्धार्थ नगरातील साई तिर्थ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. आपल्या तक्रारीमध्ये सासू ज्योती दयारामानी यांनी…
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यातील तलावाच्या पाण्यात बुडून निधन झाल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत असतांना एक धक्कादायक बातमी सांगलीच्या कवठेमहांकाळ येथून समोर येत आहे. कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी संधाकाळच्या सुमारास ही घटना घडली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा…

