Author: editor desk

नागपूर : वृत्तसंस्था विमान प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेच्या दिशेने मोबाईलचे तोंड करून त्यावर अश्लिल व्हिडीओ बघणाऱ्या आणि विमान धावपट्टीवर उतरताना तिचा विनयभंग करणाऱ्या पुण्याच्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार समोर आला. विमानातील एका प्रवाशाने लैंडिंगदरम्यान सहप्रवासी असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केला. महिलेनेदेखील हिंमत दाखवत त्याची कॉलर धरून त्याला चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणात फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (३२, दुर्रानी कॉम्प्लेक्स, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे.

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरातील पिंपरी येथील कासारवाडीत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावामध्ये मंगळवारी सकाळी क्लोरीन वायूच्या टाकीतून वायुगळती झाली. त्यामुळे पोहण्यासाठी उतरलेल्या १५ जणांना अचानक खोकला व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अनेकजण पाण्यात बुडू लागले; मात्र जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. एका दहावर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर केला जातो. त्याची टाकी पूर्णत: गंजल्याने त्यामधून वायुगळती झाली. ही बाब प्रशिक्षक व जीवरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांना तत्काळ तलावाबाहेर येण्यास सांगितले; मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकजण पाण्यात बुडू लागले.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मोबाइलवर रिचार्ज करण्यासाठी तीनशे रुपये दिले. अनेक दिवस होऊनही रिचार्ज न झाल्याने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एकास बेदम मारहाण केली. तसेच मानेवर व हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील मुस्तकीम शेख मुख्तार (वय २४) आगाखान वाडा यांना कुमार किराणासमोर फरहान शेख नसीम व फरदीन शेख नसीम हे दोन्ही भाऊ भेटले. मुस्तकीम यांनी २ ऑक्टोबरला मोबाइलमध्ये ३०० रुपये रिचार्ज मारण्यासाठी रोख पैसे दिले होते. मोबाइलमध्ये रिचार्ज न आल्यामुळे मुस्तकीमने फरदीन यांना याबाबत विचारणा केली असता रिचार्ज केलेला आहे. परंतु…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक 50 वर्षीय शिक्षक आपल्या विद्यार्थिनीला घेऊन पळून गेला आहे. विद्यार्थिनी पळून जाताना आपल्यासोबत 30 हजार रुपये कॅश, दागिने आणि कुटुंबातील सदस्यांचं आधारकार्ड घेऊन गेली आहे. शिक्षक त्यांच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करत असून त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गोंडा ग्रामीण भागातील कोतवाली भागात असलेल्या गावातील हे प्रकरण आहे. जिथे जुलै महिन्यात शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून घेऊन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात भुलाबाई विसर्जन करण्यात येत असतांना जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे देखील संध्याकाळी विसर्जन सुरु असतांना एक दुर्देवी घटना घडली होती. एक तरुण पाण्यात बुडाला होता. त्या तरुणाला काढण्यासाठी १४ तासांनी यश आले आहे पण दुर्देवाने हा तरुण मयत अवस्थेत मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जन कार्यक्रम सुरु असतांना रमेश चव्हाण हे पाण्यात बुडाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी राज्य आपत्ती परिषद दल जळगाव यांनी सुरुवात केली परंतु मयत रमेश चव्हाण याचा मृतदेह १४ तास अथक परिश्रम करुन सुदधा हाती लागत नसल्याने शेवटी म्हसावद मंडळ अधिकारी आंधळे यांनी…

Read More

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत असतांना माणुसकीला काळिमा लागेल अशी एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. घरोघरी धुणे-भांड्याचे काम करून आपली उपजीविका भागविणाऱ्या एका दिव्यांग तरुणीवर घर मालकाने बळजबरीने बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित अपंग तरुणी सात महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द किनगाव पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लातूरच्या रेणापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. तसेच, गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाला आहे. रेणापूर तालुक्यातील एका गावात राहणारी तीस वर्षीय दिव्यांग तरुणी घरी धुणे-भांडे करण्याचं काम करायची. याचवेळी आरोपी विनायक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक घटना सोशल मिडीयावर व्हीडीओच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात एका तरुणीला तिकीट विचारले असता तिने महिला टिसिला मारहाण केलीये. रात्री उशिरा या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट-गोरेगाव लोकलमध्ये ही घटना घडली आहे. ट्रेन दादर स्थानकात आल्यावर दोन महिला टिसि फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात चढल्या. त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आणि सर्वांना तिकीट दाखवण्यास सांगिते. यावेळी एका तरुणीकडे तिकीट नव्हाते. तिकीट दाखवण्यास सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. तिच्याकडे तिकीट नसल्याचे समजताच महिला टिसिने तिला दंड भरण्यास सांगितलं. दंडाची रक्कम भरण्याऐवजी या…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  चोपडा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून नेहमीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात चोपडा शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत वास्तव्यास असून गेल्या आठ महिन्यापासून अल्पवयीन मुलगी शाळेत जाता येताना व गावात काही कामानिमित्त बाहेर आली असता, तिच्याजवळ जावून मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे माझ्यासोबत प्रेम संबध ठेव पण अल्पवयीन मुलीने त्याला नेहमी नकार दिल्याने याच राग मनात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरातून २१ वर्षीय तरुणाचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महेंद्र रामनारायण यादव(वय २१) हा तरुण दि.९ रोजी भुसावळ बसस्थानक परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास एकाने त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. यावेळी महेंद्र यादव यांने आरोपीचा पाठलाग करून थांबविले असा त्याला चाकूचा धाक दाखवून आरोपीने बळजबरीने २०० रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी महेंद्र यादव याने भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी…

Read More

वाशीम : वृत्तसंस्था राज्यातील अनेक खुनाच्या घटना घडत असतांना वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेकडे निघालेल्या ५४ वर्षीय शिक्षकावर रस्त्यात दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी आधी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले व नंतर पेट्रोल टाकून जाळले. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातील मालेगावजवळ घडली. त्यात दिलीप धोंडुजी सोनुने यांचा मृत्यू झाला. शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे दिलीप सोनुने हे बोरगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. साेमवारी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे दुचाकीवर (एमएच ३७ वाय १४३८) बोरगावकडे जात होते. मालेगावपासून ४ किलोमीटर अंतरावर कोल्ही गावाजवळ निर्मनुष्य भागात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या…

Read More