नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना नियमित घडत आहे. अनेक निष्पाप नागरिकांना धमकावत, त्यांना ब्लॅकमेल करत त्यांची मेहनतीची कमाई लुबाडणाऱ्या खंडणीखोरांची दहशत सध्या चांगलीच वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक अतिशय त्रस्त झाले असून या खंडणीखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात येत आहे. खंडणीचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे. सेवाभावी दवाखाना चालवत सर्वसामान्य नागरिकांची, रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरला खंडणीखोरांचा चांगलाच फटका बसला आहे. त्या डॉक्टरला ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील पानबाई सॅनिटोरियम येथे डॉ. मेरेविन सुसेराज लिओ हे सेवाभावी दवाखाना चालवतात. गेल्या…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलिसांची नजर जुगारी अड्ड्यावर असून सातत्याने कारवाई देखील होत आहे. नुकतेच नाशिकरोड परिसरात देखील जुगार खेळणा-या अकरा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील बिटको पॉईट भागात करण्यात आली. उड्डाणपुलाजवळील एमएसईबी कार्यालय नजीकच्या सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला गुरूवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास ज्ञानेश्वर एकनाथ जाधव (४८ रा.जगतापमळा,विजयनगर),महुर सुरेश निकम (रा.कॅनलरोड),नितीन शंकर चवटे (रा. साहीशांती नगर,गोरेवाडी),अरबाज इदरीज पठाण (रा.साईनाखनगर ना.रोड),गजानन जगन चव्हाण व सुनिल घनश्याम नुनासे (रा.दोघे बिटको उड्डाणपूलाखाली) आदी पत्यांच्या कॅटवर रम्मी जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास केवळ १०० मिटर अंतरात ४ रिक्षांचे प्रत्येकी दोन चाके काढून अनोळखी चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर – दुध फेडरेशन रोडवरील खडके चाळ व इंद्रप्रस्थ नगरमधील नामदेव नगर परिसरात दि.१३ रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान काही अनोळखी चोरट्यांनी नामदेव नगर परिसरातील १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत अफसर शेख सत्तार(वय२४), प्रमोद मांडोळे,(वय ३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या रिक्षांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास…
अमळनेर : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील बुधगांव निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी बुधगाव येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे यांनी आज झाडावर चढून आंदोलन कले. पंचक्रोशीतील हजारावर नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून धरणाच्या कामाला गती देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून आंदोलनाचा इशारा उर्वेश साळुंखे यांनी दिला होता. मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे व सदर प्रश्नावर वेळ द्यावी याकरिता झाडावर बसून लाक्षणिक आंदोलन केले. उर्वेश साळुंखे यांनी सकाळी ग्राम दैवताचे दर्शन घेवून आंदोलन स्थळी मार्गक्रमण केले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरीसह दरोड्याचे प्रमाण मोठ्या संख्येने होत असतांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई करीत बँक लुटाण्याच्या तयारीतील 13 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाेलीसांनी त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह 6 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतून देण्यात आलेल्या माहितीनूसार अटकेतील संशयित हे उत्तर भारतासह नेपाळमधील आहेत. ते गॅस कटरच्या साहाय्याने बँक, सराफ दुकाने फोडण्यात सराईत आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयितांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयितामध्ये झारखंड आणि नेपाळमधील येथील युवकांचा या…
धुळे : वृत्तसंस्था धुळे जिल्ह्यातील एका गावात शेतात मेंढ्या सोडल्याचा जाब विचारणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी घडली असून याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष सुकदेव सोनवणे (वय ६०, रा. भामेर ता. साक्री) असे निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भामेर शिवारात सोनवणे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मेंढपाळांनी मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. मेंढ्या सोडू नका, बाजरीचे नुकसान होत आहे असे सोनवणे यांनी मेंढपाळांना सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाले त्यानंतर चौघा मेंढपाळांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सुभाष सोनवणे…
नरडाणा : वृत्तसंस्था पुण्याकडून गोरखपूरकडे (उत्तर प्रदेश) जाणारी खासगी बस नरडाणा गावाजवळील जुन्या टोलनाक्याजवळ शुक्रवारी सकाळी उलटली. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, युपी ५५ एटी १८३३ क्रमांकाची खासगी बस प्रवासी घेऊन पुण्याहून उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे जात होती. शुक्रवारी सकाळी ८:०० ते ८:३० वाजेच्या सुमारास नरडाणा गावाजवळील जुन्या टोलनाक्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने जात असलेली बस उलटली. त्यात १५ ते २० प्रवाशांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली. काहींना मुका मार लागला. यात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात चक्क बापाने मुलाला नशेसाठी पैसे न दिल्याने मुलाने बापावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली असून याप्रकरणी मुलाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात चालक म्हणून काम करणारे संतोष वामन लिंगायत (वय ५०) दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते घरी असताना त्यांच्याकडे मुलाग महेश संतोष लिंगायत (२३, रा. गेंदालाल मिल) याने नशा करण्यासाठी १०० रुपये मागितले. त्या वेळी नकार दिल्याचा राग आल्याने महेश लिंगायत याने वडील संतोष लिंगायत यांच्या छातीवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या संतोष लिंगायत यांना…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन वर्षापासून मुंबई शहरातील अनेक शाळेच्या परिसरात असलेल्या सात कुंटणखान्यावर कारवाई करत गुन्हे शाखेने ३३ महिलांची सुटका केली. याच कारवाईत पाठपुरावा करत, या कुंटणखान्याना दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहे. अशाप्रकारे सेक्स रॅकेट विरोधात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७ जुलै रोजी गिरगाव येथील व्हि. पी. रोड, नूर मोहमद बेग मोहमद कंपाउड या भागात एका शाळेपासून दोनशे मीटरच्या अंतरावर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अंमलबजावणीने कारवाई केली. या कारवाईत ७ वेगवेगळ्या रूमची झाडाझडती घेत,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक अल्पवयीन मुलीसह महिलांना टार्गेट केले जात असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी सीबीगंज पोलीस स्टेशन परिसरात छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला, एका तरुणाने चालत्या ट्रेनसमोर फेकले. या घटनेत तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या आदेशानुसार सीबीगंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कुमार कंबोज, प्रकाश प्रभारी उपनिरीक्षक नितीश कुमार शर्मा आणि एक हवालदार (राखीव) आकाशदीप यांना निष्काळजीपणासाठी निलंबित करण्यात आले आहे. एसएसपींनी राधेश्याम यांची सीबीगंजचे नवीन निरीक्षक…

