Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात चोरट्यांचा धिंगाणा : चक्क ४ रिक्षाची चाके चोरली !
    क्राईम

    जळगावात चोरट्यांचा धिंगाणा : चक्क ४ रिक्षाची चाके चोरली !

    editor deskBy editor deskOctober 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एका परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास केवळ १०० मिटर अंतरात ४ रिक्षांचे प्रत्येकी दोन चाके काढून अनोळखी चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर – दुध फेडरेशन रोडवरील खडके चाळ व इंद्रप्रस्थ नगरमधील नामदेव नगर परिसरात दि.१३ रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान काही अनोळखी चोरट्यांनी नामदेव नगर परिसरातील १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत अफसर शेख सत्तार(वय२४), प्रमोद मांडोळे,(वय ३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या रिक्षांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास रिक्षाचालक रिक्षा काढून जात असतांना हा प्रकार आढळून आला त्यावेळेस एकाच गल्लीत दोन रिक्षांची चाके काढली होती तर त्यापुढील गल्लीत अशीच घटना घडली होती.

    MH.19.CW.2194, MH.19.C.5558, MH.19.CW.2999, MH.19.V.5658 या घटनेत एका रिक्षा चालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारपर्यत नुकसान झाले आहे. असे एकूण २० हजारापर्यतची रिक्षाची चाके घेवून चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. सकाळी ७ वाजेच्या सुमारास काही रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती. यानंतर किशोर निकुभ हे घटनास्थळी येवून काही परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील करीत होते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा जळगाव शहर पोलिसात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.