Author: editor desk

वर्धा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढ होत आहे. यात अनेक परिवाराचे सुद्धा आयुष्य उधवस्त झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना वर्धा येथून समोर आली आहे. पतीने रागाच्याभरात आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलीये. पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असं मृत महिलेचं नाव आहे. तर राजेशसिंग राजदत्ता (५५) असं आरोपी पतीच नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. काल मजुरीच्या पैशांच्या कारणातून…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था देशभरात अनेक अपघात होत असतांना राज्यात देखील समृद्धी महामार्गावर गेल्या काही वर्षापासून अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा याच महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मिनी बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आला, अशी माहिती ड्रायव्हरने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घरामागे राहणाऱ्या कुटुंबियांनी काहीही कारण नसतांना दुसऱ्या घरावर दगडफेक करीत त्या कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील गजानन नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोड परिसरातील गजानन नगरात अशोक किसन ठोसर (वय – ५७) दोन मुलांसह वास्तव्यास असून ते फुटवेअरचे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता अशोक ठोसर हे जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणारे अजय इंगळे, विजय इंगळे, रूपाली इंगळे आणि सरूबाई इंगळे हे काहीही कारण नसतांना अशोक ठोसर यांच्या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावरील साकरी फाट्याजवळ इंडियन ऑइल कंपनी पेट्रोल पंपाच्या मागे एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी आढळून आला. मृतदेहाची माहिती मिळतात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २ ते ३ दिवसापासून हा मृतदेह तेथे पडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून अंगावर कोठेही जखमा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शनिवारी मृतदेहाचे विच्छेदन होणार आहे. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाविषयी कुणालाही माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मत्यची नोंद केली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील आर.एल.ज्वेलर्सचे शोरूम असलेल्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला दि.१४ रोजी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रथ चौकात आर. एल. ज्वेलर्सचे शोरुम आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शो-रुममधील चौथ्या मजल्यावर असलेल्या अकाऊंट विभागाजवळील एका रुममधील कॉम्प्युटर ठेवलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्कीट होवून अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण करीत त्याठिकाणी ठेवलेल्या महत्वाच्या फाईल्स व कॉम्युटर आगीच्या विळख्यात घेतले.यामध्ये ते जळून खाक झाले. या आगीची माहिती जळून मिळतच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा…

Read More

पहूर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पाळधी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील ४१ हजार ५०० रुपये अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १२ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावातील रहिवासी मयूर शिवाजी पाटील (वय २२) हे शेती व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पाळधी येथील बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने १२ रोजी तोडून घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले ४१ हजार ५०० रुपये चोरून नेले . याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ प्रदीप चौधरी करीत आहे.

Read More

एरंडोल : प्रतिनिधी शहरातील एका ठिकाणी ३० हजार रुपये मागितल्याचा राग आल्याने एकासह चार जणांनी मिळून एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल आणि ३० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील व्यवसायाने ड्रायव्हर असलेले सुरेश अशोक कुलकर्णी (वय ५५) यांना संशयित आरोपी किरण पंजू वाणी आणि इतर चौघांनी ११ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हायवेवरील हॉटेल केसरी गार्डन समोर ३० हजार रुपये मागितल्याचा रागातून लाकडी दांड्याने डोक्यात मापाठीवर डोळ्यावर मारहाण करून दोन मोबाईल आणि ३० हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली . याप्रकरणी ५…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी तांडा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने तामसवाडी येथील महिला ठार झाली. या अपघातप्रकरणी महिना भरानंतर शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता धरणगाव पोलिसात अज्ञात दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. झामाबाई काशीनाथ महाजन (तामसवाडी, ता.पारोळा) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी दिलीप भिकन माळी (वय ४३) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. 15 सप्टेंबर रोजी दिलीप माळी हे आपली आत्या झामाबाई काशीनाथ महाजन (तामसवाडी, ता.पारोळा) यांच्यासोबत दुचाकीने जळगाव शहरात येत असतांना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झालेली असताना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावावर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत केला आहे. तसेच आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर शहरातील परिसरात घडली आहे. पीडितेचा सख्खा भाऊ तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार अत्याचार करत होता. इतकेच नव्हे तर, सहा महिन्यांपूर्वी नातेवाईक असणाऱ्या पोलीस कर्मचारी सुभाष होनाजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात  चॉपर घेऊन परिसरात दहशत पसरविण्यासह गुन्ह्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या कल्पेश ऊर्फ बाळा देवीदास शिंपी (२३) याला शहर पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात कल्पेश शिंपी हा चॉपर घेऊन दहशत पसरविण्यासह गुन्ह्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवाजीनगरात पोहोचले असता ११ ऑक्टोबर रोजी रात्री कल्पेश हा चॉपरसह आढळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक किशोर निकुंभ यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कल्पेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.

Read More