Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात इस्त्राइल-हमास युद्धादरम्यान निदर्शने केली जात असतांना अमेरिकेत देखील काही जण इस्त्राइल तर काही जण विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहयाला मिळाले. यादरम्यान एएपीने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकेत एक मुस्लिम महिला आणि सहा वर्षीय मुलावर चाकूने अनेक वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील एका घरमालकाने त्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू महिली आणि मुलावर हा हल्ला केला आहे. दरम्यान त्या व्यक्तीवर हत्या आणि हेट क्राइमचा आरोप असून पोलिसांनी हे प्रकरण इस्त्राइल आणि हमास यांच्याशी संबंधीत असल्याचे म्हटले आहे. या घटनेत सहा वर्षांच्या मुलावर चाकूने 26 वार करण्यात आले आहेत. विल काउंटी शेरीफ ऑफीसने दिलेल्या निवेदनात दिलेल्या…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था राज्यात अनेक अपघाताची मालिका सुरु असतांना एक धक्कादायक अपघात वर्ध्यात झाला आहे. भरधाव कार रस्त्यावर धावत असताना अचानक त्याचे चाक निघाले. वेग जास्त असल्याने हे चाक थेट समोर असलेल्या एटीएम मशिनमध्ये जाऊन अडकले. या थरारक घटनेमुळे एटीएमचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील तळेगाव शहरातील उड्डाणपूल परिसरात ही थरारक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात जात असलेल्या कारचे चाक निखळूले आणि थेट एटीएममध्ये जाऊन धडकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. थेट उड्डाणपुलावरून टायर खाली एटीएममध्ये शिरल्याच कळताच नागरिकांनी पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. ‘युएसएम’ध्ये नोकरीला असलेला अमरावती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती घेवून येत असताना वाहनाचा अपघात होऊन मूर्ती अंगावर पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मुक्ताईनगरजवळील पूरनाड फाट्यानजीक शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. देवीच्या स्थापनेची संपूर्ण तयारी झालेली असताना या तरुणावर काळाने झडप घातल्याने जळगावातील जोशी वाडा परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण परिसरातील काही कार्यकर्ते देवीची मूर्ती घेण्यासाठी शनिवारी बऱ्हाणपूर येथे गेले होते. मूर्ती घेवून परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती नेमकी संजय कोळी यांच्या…

Read More

यावल : प्रतिनिधी  यावल येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी यावल पोलिसांनी गोपनियरित्या तपासाची चक्रे फिरवुन १८ आरोपींना अटक करण्यात आली असुन या सर्व आरोपींना न्यायालयाने दि. १६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असुन पोलीसांनी मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश केला आहे. यात आंतरराज्य टोळीशी लागेबांधे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावलच्या पोलीस ठाण्यात मागील सप्टेंबर महीन्यात शहरातील कुंभारटेकडी परिसरातुन चोरीस गेलेल्या ट्रेक्टर चोरीच्या गुन्ह्याचा पोलीसांकडून शोध घेतले जात असतांना पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळीच हाती लागल्याने पोलीसांनी केलेल्या चोरट्यांवर कारवाईमुळे तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलीस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रिक्षातून प्रवास करणाऱ्या वृद्धाकडील रोकड लांबविणाऱ्या ईस्माईल शेख शब्बीर (वय ४८, रा. मास्टर कॉलनी) सैय्यद आरीफ सैय्यद सईद (वय ३९, रा. पिंप्राळा हुडको) या दोघ चोरट्यांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील लाहसर येथे राहणारे राजाराम तुळशीराम पाटील (वय ८८ ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी ते कामाच्या निमित्ताने जामनेर शहरात आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशन जामनेर बसस्थानक दरम्यान रिक्षातून प्रवास करत असतांना रिक्षातील काही चोरटयांनी त्यांच्याजवळील ५४ हजारांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  वरणगाव फॅक्टरी परिसरातील सुशील नगर सर्कलनजीक मित्रांमध्ये किरकोळ वादातील कुरापतीचा वाद वाढल्याने डोक्यात काठी मारताच मित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय ५८) हे मुक्ताईनगरातील ८१ गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी आहे. हे एका मित्रासोबत वरणगाव फॅक्टरीतील सुशील नगर सर्कलवर आल्यानंतर त्यांची संशयित आरोपी तथा मित्र असलेल्या दीपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्ये जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला मात्र पुन्हा कुरापत निघाल्यानंतर संशयित दीपक सिंगने काठीचा फटका प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक लोकांना मोबाईलवर फोन येवून अभिनंदन करून मोठ मोठे गिफ्ट तुम्हाला मिळाले आहे. असे सांगत असतात अन याच घटनेला अनेक लोक बळी पडून मोठी फसवणूक होत असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथे सायबर घोटाळेबाजांनी एका पोलिसाची 82 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हताश झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर कलम 420/406 अन्वये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्या लोकांनी मला फोन केला आणि माझ्या मुलाने एका स्पर्धेत सफारी कार जिंकली आहे असं सांगितलं. पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी आधार कार्ड आणि काही बँक तपशील पाठवण्यास सांगितले जेणेकरुन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ मोठ्या शहरात भरधाव चारचाकीत अत्याचारसह विनयभंगाच्या घटनेत वाढ होत आहे. नुकतेच नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. तरुणीने आरडाओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ही नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करते. शनिवारी १४, ऑक्टोंबर रात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. कॅब चालकाच्या कृत्यानंतर पीडित तरुणीने आरडा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा. बांभोरी ता.धरणगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील कैलास निंबा पाटील (वय-३९) हा बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरात दुचाकीने जात असतांना धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एक चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत कैलास पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर चारचाकी वरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर हा वाहन घेवून पसार झाला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील अनेक राजकीय नेते व उद्योजकांवर गेल्या काही वर्षापासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची कारवाई सुरु असतांना आज माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या सुमारे ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्‍या ७० मालमत्ता जप्त केल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैन कुटुंबाने एसबीआयकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात अलीकडेच आर.एल. समूहावर ईडीने छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर मनीषदादा जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली असून या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल…

Read More