Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था एमपीएससीची उपनिरीक्षक पदासाठीची, नगरपरिषद भरती आणि ‘महाज्योती’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाणारी परीक्षा या तीनही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी संभ्रमात आहे. विद्यार्थ्यांच्या या संभ्रमाची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या अखत्यारितल्या परीक्षांची तारीख बदलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे. तसंच या प्रश्नी आपण विद्यार्थ्यांसोबत असल्याचा दिलासाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. २९ ऑक्टोबर रोजी राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा आहे. याच दिवशी नगर परिषद भरती परीक्षाही आयोजित करण्यात आली आहे. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षाही याच दिवशी होणार आहे. राज्यातील स्पर्धा…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी भाऊबंदकीचा वाद नेहमी उफाळत असतोच. काही थोडक्यात मिटत असतात तर काही वाद हे शेवटच्या टोकापर्यत जात असतात. अशीच एक धक्कादायक घटना जालना तालुक्यातील मौजपूरी गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजपुरी गावात चुलत भावांमध्ये विहिरीच्या पाण्यावरून वाद झाला होता. हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. मात्र रात्री उशीरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला. या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली .घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक अत्याचार व विनयभंगाच्या घटना घडत असतांना अश्लील कृत्य करून पळ काढल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. नंतर आरोपीवर कारवाईही होते. पण, एखाद्या महिलेनेच भररस्त्यात पुरुषाला अयोग्य स्पर्श करत अश्लील चाळे केले तर? होय विश्वास बसत नसला तरी सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल झाला असून दिल्लीमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. सायकल रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला भररस्त्यात एक महिला अयोग्यपणे नको तिथे स्पर्श करताना व्हिडिओत दिसते. रिक्षाचालक काहीही प्रतिसाद देत नाही, तरीही महिला तिचे चाळे सुरूच ठेवते. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेक नेटकरी खवळले आहेत. ‘महिलेच्या कृत्यामुळे घाबरलेला रिक्षाचालक सुन्न झाला आहे. हेच कृत्य…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय तरुण एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी मशनिरीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात राहूल दरबार राठोड (वय २२, रा. शेलगाव ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर ) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला तर जीवन गजानन चौधरी (रा. बेटावद ता. जामनेर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. राहुलचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शेलगाव येथील राहुल राठोड याचे कुटुंबिय गेल्या २० वर्षांपूर्वी कामानिमित्त जळगावात स्थायिक झाले आहेत. राहुल हा कुटुंबियांसह फातेमा नगरात वास्तव्यास होता. पुर्वी तो वेल्डींगचे काम करुन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका २४ वर्षीय तरुण देवीची स्थापना होत असतांना झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ईश्वर निवृत्ती लोहार या तरुणाला शिवीगाळ त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे रविवार रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात ईश्र्वर निवृत्ती लोहार हा तरुण वास्तव्यास आहे. गावातील बेलदारवाडी येथे देवी बसविण्यासाठी गेले असता तेथे दोन जणांमध्ये भांडण सुरु होते. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी ईश्र्वर लोहार गेले असता भांडणाऱ्या दोघांपैकी एकाने शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर वार केला. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी जखमीने…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून गावठी पिस्तुलांसह अनेक गुन्हेगार दहशत माजवीत असतांना पोलीस त्यांना बेड्या ठोकत आहे. तर नुकतेच गावठी पिस्तुलांसह बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाला चोपडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमर्टीकडून चोपडाकडे येणाऱ्या बसमधून एक संशयित युवक हा गावठी पिस्तुले घेऊन प्रवास करत असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली. त्यावरून शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी तत्काळ सहा. पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनश्याम तांबे, पोहेकॉ विलेश सोनवणे, संतोष पारधी, शेषराव तोरे पोना संदीप भोई, पोकों मिलिंद सपकाळे, रवींद्र पाटील, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, आत्माराम अहिरे यांच्या पथकाला रवाना…

Read More

रावेर : प्रतिनिधी  रावेर तालूक्यातील मोरगाव खुर्द येथील शेतकरी भगवान महू महाजन (वय ६२) हे घटस्थापनेच्या दिवशी बेपत्ता झाले होते. दरम्यान, मोरगाव शिवारातील अटवाडे रस्त्यावर त्यांची मोटारसायकल तर त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत विहीरीच्या कुंडाजवळ आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान महाजन यांना स्टार्टरच्या पेटीजवळील लोंबकळणाऱ्या वीज तारांचा विजेचा धक्का बसून ते खाली डोक्यावर आदळल्याने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पुर्वाश्रमीचे केळी गृपचालक भगवान महाजन यांना गत अडीच वर्षांपूर्वी मोटारवाहन अपघातात मेंदुला गंभीर दुखापत झाल्याने ते नेहमी अस्वस्थ राहत होते.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या नियमित वाढत असतांना आता राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. पुणे-बेंगळुरु महामार्गावर शनिवारी अपघात झाला. महामार्गावर भरधाव जाणाऱ्या चार चाकीने उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात बहिण, भाऊ अन् भाचा यांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोल्हापूर येथील पोलिसाचा समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर अपघात होण्याची साखळी सुरुच आहे. राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होण्याची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यात असलेल्या पाचवड फाटा येथे हा अपघात झाला. महामार्गावर असलेल्या भाग्यलक्ष्मी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण तरुणी लग्न करण्यासाठी सोशल मिडीयावरील अनेक वेबसाईटचा उपयोग करीत असतात. त्यातील एक नावाजलेली वेबसाईट म्हणजे ‘शादी डॉट कॉम’ याच वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. या प्रकरणी एका तरुणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लखन महादेव भिसे (रा. इंदापुर रोड, पिंपळी, ता. बारामती) याच्यावर आयपीसी 376/2, 377, 420, 406, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत टिळक रोड येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2022 ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भिवंडी तालुक्यातील धामणगाव एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या एका बालकाचा आणि मुलीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडल्याची माहिती पाेलीसांनी दिली. या घटनेत वसीम मलिक (वय 7 राहणार. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 राहणार. धामणगाव धापशी पाडा) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील फातिमा नगर येथील आठ वर्षांचा वसीम हा तालुक्यातील वडपा धामण गाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी वसीम आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम व इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे तलावात पोहोचण्यासाठी…

Read More