बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३ राज्यातील राष्ट्रवादीचे नेते व आ.एकनाथराव खडसे पुन्हा अडचणीत आले असून अवैध गौण खनिज उत्खनात त्यांना 137 कोटीची दंडाची रक्कम नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२ १५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची नोटीस मुक्ताईनगर बजावली आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला नुकतीच अटक झाली असल्याची घटना ताजी असतांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी मंगळवारीरात्री कारवाई करत ६ कोटींचे ड्रग्ज (अंमलीपदार्थ) विक्रीसाठी नेताना पकडले. दोनच दिवसानंतर ही मोठी कारवाई करून ड्रग पकडल्यामुळे सोलापूर, पुणे, मुंबई असे ड्रग कनेक्शन आहे काय या दृष्टीने पोलिसांनीतपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी आजच पुण्यातील ड्रग तस्कराला जेरबंद करून मुंबईत आणले आहे. देवडी येथीलकारवाईत अटक केलेल्या दत्तात्रय लक्ष्मणघोडके, गणेश उत्तम घोडके (अौंढी, ता.मोहोळ) या दोघांना माेहाेळ न्यायालयानेपोलिस काेठडी सुनावली. मुंबई, पुणे, सोलापूर शहरात सध्या ड्रग्जच्या(अंमली पदार्थ) मोठया कारवाया सुरु आहेत.दोन दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनीचिंचोली एमआयडीसी परिसरातील बंदकारखान्यातून ड्रगचा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. संतोष भागवत प्रजापती (वय-३२) रा. आदर्शन नगर, कक्ष, जळगाव असे अटक केलेल्या वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी…
जळगाव : प्रतिनिधी आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात पाय घसरून एका १२ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभव नरेंद्र पाटील असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. वैभव हा सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाइकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा नातेवाइकांनी तालुका पोलिस स्टेशनला मिसिंगची नोंद केली होती.
चाळीसगाव : प्रतिनिधी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर डेहराडून येथे रुजू होणाऱ्या तरुणाचे बॉक्सिंग खेळात डोक्यात मार लागल्याने निधन झाले. प्रथमेश गोरख महाले असे या तरुणाचे नाव आहे. प्रथमेशचे वडील गोरख महाले आणि आई शीतल महाले हे पिंपळनेर, ता. साकरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रथमेश हा स्क्वेंड्रॉन कॅडेट कॅप्टन (एससीसी) या पदावर कार्यरत होता. प्रथमेशने एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर येत्या ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर रुजू होणार होता. पण, खडकवासला येथे प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळात डोक्याला मार लागला व त्याला पुणे कमांड हॉस्पिटलला नेण्यात आले होते. पण,…
जामनेर : वृत्तसंस्था जळगाव जिह्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच जामनेर-फत्तेपूर मार्गावर लोणी मदणी या गावादरम्यान दुचाकी व इको गाडी यांची समोरासमोर धडक झाली. त्यात सौरव कोळी दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील दुचाकी चालक सौरव कैलास कोळी (२५, कोदोली, ता. जामनेर) हा जागेवरच तर मागे बसलेला शुभम जाधव (२७, शिंगाईत, जामनेर) याचे जळगाव येथे उपचारदरम्यान निधन झाले. या अपघातात इको गाडीचालक संतोष कोळी, चंद्रकांत जैन व त्यांच्या पत्नी प्रमिला जैन हे गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता मोटारसायकल इको गाडीत जवळपास दोन फूट घुसली आहे. जखमींना…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणीचा जळगाव शहरातील एका परिसरात सकाळी ८ वाजेच्या सुमारास विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगावातील एकावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,जळगाव शहरातील एका भागात पाचोरा तालुक्यातील रहिवाशी २४ वर्षीय तरूणी वास्तव्यास असून दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पुंडलीक पाटील याने तरूणीला अंगावर ओढून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता संशयित आरोपी पुंडलीक काशीराम पाटील रा. जळगाव याच्या विरोधात…
नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक घटना या दारू पिवून झालेल्या असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ दारू पिऊन आरडाओरड करीत असल्याच्या रागातून सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील वलवाल गाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील वलवालचा रिचबारीपाडा येथील अमरसिंग डेका पावरा (वय २८) हा शनिवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मद्य प्राशन करुन संशयित नटवर ओजाऱ्या पावरा (वय ४३) याच्या घराजवळ आरडाओरड करीत होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव कारागृहात नेहमीच कैदी कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद घालत असतात. नुकतेच आपली जळगाव कारागृहातून नाशिक जेल येथे रवानगी होणार असल्याच्या रागातून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील एका कैद्याने कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून खिडकीच्या काचा फोडल्याचा धक्कदायक प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी लखन उर्फ गोलू दिलीप मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार ३ ऑगस्टपासून जळगाव कारागृहात आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी १३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जळगाव मुख्यालयातील पथक आज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पोलीसांचे १५ पथक ज्या आरोपीला पकडण्यासाठी गेल्या १५ दिवसापासून दिवस रात्र मेहनत करत होते. अखेर त्या आरोपीला पोलिसांनी कर्नाटकाच्या बंगळुरूमधून अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातील आरोपी ललित पाटील हा चक्क दोन राज्यात १५ दिवसापासून फिरत असल्याची देखील बाहेर आली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणून कोर्टासमोर उभं केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. या 15 दिवसात ललित पाटील दोन राज्यात लपून बसला होता. पाच शहरात तो गेला होता. पोलीस त्याचं लोकेशन ट्रेसही करत होते. पण प्रत्येकवेळी तो गुंगारा देऊन पळून जात होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याचा वेगळाच डाव…

