सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला नुकतीच अटक झाली असल्याची घटना ताजी असतांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी मंगळवारीरात्री कारवाई करत ६ कोटींचे ड्रग्ज (अंमलीपदार्थ) विक्रीसाठी नेताना पकडले. दोनच दिवसानंतर ही मोठी कारवाई करून ड्रग पकडल्यामुळे सोलापूर, पुणे, मुंबई असे ड्रग कनेक्शन आहे काय या दृष्टीने पोलिसांनीतपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी आजच पुण्यातील ड्रग तस्कराला जेरबंद करून मुंबईत आणले आहे. देवडी येथीलकारवाईत अटक केलेल्या दत्तात्रय लक्ष्मणघोडके, गणेश उत्तम घोडके (अौंढी, ता.मोहोळ) या दोघांना माेहाेळ न्यायालयानेपोलिस काेठडी सुनावली.
मुंबई, पुणे, सोलापूर शहरात सध्या ड्रग्जच्या(अंमली पदार्थ) मोठया कारवाया सुरु आहेत.दोन दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनीचिंचोली एमआयडीसी परिसरातील बंदकारखान्यातून ड्रगचा (ड्रगसाठी लागणाराकच्चा माल) साठी पकडला होता. मंगळवारीपुन्हा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ देवडीफाट्याजवळ कारवाई केली आहे. चारचाकीवाहनातून दोघेजण सहा कोटीचे ड्रग ( अंदाजेतीन ते चार किलो) विक्रीसाठी घेऊन जाणारअसल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांना मिळाली होती.
त्यानुसार काही पथकेकारवाईसाठी मंगळवारपासून तयार केले होते.रात्रीच देवडी फाट्याजवळ सापळा रचूनदोघांना वाहनातून जाताना पकडले आहे. बुधवारी सकाळी दोघा संशयित आरोपींनामोहोळ न्यायालयात हजर केल्यानंतर २३आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळालीआहे. दत्तात्रय लक्ष्मण घोडके, गणेश उत्तमघोडके (अौंढी, मोहोळ) या दोघांना अटकझाल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीषसरदेशपांडे यांनी दिली. दरम्यान, राज्यातअसलेल्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी सध्यापोलिस करत असल्याचे पोलिस दलातीलसूत्रांनी सांगितले.