नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली असून यात महिला अत्याचार, खंडणी तसेच लुटमारीच्या घटना सर्वाधिक घडत आहे. अशातच रिक्षातून कॉलेजला निघालेल्या एका तरुणीचा दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र, आरोपीने पोलिसांवर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये आरोपीचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझीयाबाद शहरात ही घटना घडली. कीर्ती सिंग असं मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. तर जितेंद्र उर्फ जीतू असं एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात रेल्वेच्या धडकेत नियमित अनेकांचा मृत्यू होत असतांना एक धक्कादायक अपघात समोर आला आहे. एक परिवार रेल्वेचे फाटक ओलांडत असतांना बापाच्या समोर आई व दोन मुली चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंकरखेडा विभागातील कासमपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. दिल्लीहून सहारनपूरकडे वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. कासमपूर फाटकावर नरेश हा आपल्या कुटुंबासह रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक लागली. यात महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मोना असं मृत महिलेचे नाव आहे. तर चारू आणि इशिका अशी मुलींची नावे आहेत.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच वाशीलगतच्या कोपरी गावात राहणाऱ्या एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रूपचाँद रहेमान शेख (वय २१) असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी गावातील गावदेवी मंदिराच्या जवळच्या सागर भोईर इमारतीमध्ये महिलेचे नाव सलमा ऊर्फ जहानारा खातून रहेमान शेख (वय ४३) असे असून ती मुलगा रूपचाँद शेख याच्यासोबत राहत होती. कोपरी गावातच दुसऱ्या इमारतीत सलमाची विवाहित मुलगी जास्मीन राहण्यास आहे. सलमा ही घरकाम करून कुटुंब चालवत होती. मात्र तिचा मुलगा रूपचाँद हा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणबाबत उपोषण सुरु असतांना आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील थोड्याच वेळात पत्रकार परिषद…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका ठिकाणी लोकवर्गणीतून लावण्यात आलेले सीसीटीव्ही मध्यरात्री अनोळखी इसमाने चोरून नेल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर लोकवर्गणीतून लोकहितासाठी तब्बल १६ हजारांचे सीसीटीव्ही बसविलेले होते. दि.२८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने हे चोरून नेत १६ हजारांचे नुकसान केल्या प्रकरणी पोकॉ.निलेश मोरे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ.घनश्याम पवार हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर रविवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेरील अतिक्रमणधारकांनी विनाकारण प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात डॉक्टरांच्या सहकाऱ्याला हाताला कोयता लागल्याने तो जखमी झाला असून उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन संशयितांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि महिला पोलीस असल्याची बतावणी करीत होती. दरम्यान, घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. डॉ. नीरज चौधरी (वय ३३, रा. प्रताप नगर, जळगाव) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे प्रताप नगरात रुग्णालय आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील निलकमल हॉस्पीटल…
पारोळा : प्रतिनिधी पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सांगवी फाट्यासमोर कार व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा कडून एरंडोलकडे मोटरसायकल क्रमांक एम.एच.१५ डी.टी. ३४३१ वर जाणारे व एरंडोल येथील हॉटेल नॅशनल पंजाब येथे मॅनेजर म्हणून कामास असलेले विशाल देविदास पाटील (वय ४०) राहणार एरंडोल यांना दिनांक २८ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास इंडिका कार क्रमांक एम.एच.१९ ए.एक्स. ४९७९ वरील अज्ञात चालकाने जबर धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना एका खाजगी वाहनातून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. कुटीर रुग्णालयातून त्यांना प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शहरातील…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताच्या वेळी गर्दी झाली. त्याचा फायदा घेत चोरांनी अनेक जणांचे मोबाइल आणि पैसे लंपास केले. यावेळी काही नागरिकांनी दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. धरणगावात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनसाठी त्यांचे रात्री ९ वाजेच्या सुमारास आगमन झाले. स्वागताच्या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत तीन चोरांनी अनेक जणांच्या खिशातील मोबाइल आणि पाकीट मारायला सुरुवात केली. त्यात मुक्तगिर गुलाम मोहम्मद देशमुख यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि १५ हजार…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात बाधकाम करणाऱ्या परीवारातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे करीत, तिचा विनयभंग करण्यासह याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खान्देश मिल कॉलनी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका बांधकामाच्या ठिकाणी कुटुंबासह राहते. याच परिसरात राहणारे दोन जण गेल्या काही महिन्यांपासून या अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करीत तिची छेड काढत होते. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही मुलगी रस्त्याने घरी जात…
मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक रेल्वेत एक डबा महिलासाठी राखीव असतो याठिकाणी महिला पोलीस देखील कार्यरत असतात. असाच एका लोकलमध्ये महिला डब्यात चढण्यास नकार देणाऱ्या महिला होमगार्डला एका तरुणाने मारहाण केल्याची घटना वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या लोकलमध्ये घडली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करून पसार झालेल्या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मारुती आत्रम असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला डब्यात तैनात होम गार्डला मारहाणीची घटना घडत असेल तर महिलांचा रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वासिंद रेल्वे…

