Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तरुणांना नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशन’ मध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रीज & AC) च्या 134 रिक्त अप्रेंटीसशिप जागांची भरती केली जाणार आहे. 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण आयटीआय उमेदवारांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी त्यानिमित्त चालून आली आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर, पुणे & नवी मुंबई असेल. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशनच्या माध्यमातून नागपूर युनिटसाठी 71, पुणे युनिटसाठी 53 आणि नवी मुंबई युनिटसाठी 10 अप्रेंटिस उमेदवार भरले जाणार आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 17 आणि कमाल 24 वर्षे वय असलेले उमेदवार महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशनच्या अप्रेंटीसशिप…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना मुंबईतील मानखुर्द परिसरातून समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची समजत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील राहत्या घरीत महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेतला. वर्षा शिंदे असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी पती आणि सासरच्यांवर गंभीर आरोपी लावले आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वर्षा शिंदे मंगळवारी सकाळी त्यांनी अचानक टोकाचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सिद्धिविनायक कॉलनी परिसरात पती नोकरीवर तर मुले क्लासला गेलेली असताना सीमा शशिकांत कासोट (वय ३३) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले क्लासमधून घरी आली, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शशिकांत कासोट हे कामावर गेले होते. तर त्यांची मुले क्लासला गेलेली होती. त्यामुळे सीमा घरी एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतला. सायंकाळी मुले क्लासमधून घरी आली तर घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील मंडळींना सांगितले. त्यावेळी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीमधील रहिवासी अशोक बखटमल बजाज (५२) हे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बजाज हे नेहमीप्रमाणे सकाळी पायी फिरायला निघाले असताना ट्रकने (एमएच १८ बीजी धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पघात प्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. ट्रक चालक युनूस शहा, सजन शहा फकीर (रा. धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेनकोळी करत आहे. दरम्यान, भुसावळ येथील या पुलवार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती तरी देखील अनेक नेत्यांचा गावात प्रवेश होत असल्याने आंदोलकांनी त्यांच्या चारचाकी गाड्या पेटविण्यास सुरुवात केली असल्याने आता राज्यातील आमदार देखील आरक्षणासाठी राजीनामा देवू लागले आहे. यात पहिला धक्का शिंदे गटाला देखील बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. राज्यात सध्या मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असताना रमेश बोरणारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मतदार संघातूनच बोरणारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर बोरणारे यांनी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था नेहमीच प्रेमीयुगुलांचा वावर अनेक हॉटेलसह लॉज परिसरात मोठ्या संख्यने असतो. असेच एक प्रेमीयुगुल देखील पुणे शहरातील वाघोली परिसरातील लॉजवर गेले असता त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील चंदननगरातील रहिवासी २० वर्षीय तरुणी कोमल सुनील बर्के व सचिन गोकुळ शिंदे (वय-२१) हे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाघोली परिसरातील एका लॉजवर गेले होते. तिथे गेल्यानंतर दोघांनी एक रुम बुक केली. आम्ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉजमध्ये थांबणार त्यानंतर चेक आऊट करणार…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील शेरी लोंद्री रस्त्यावरील वळण रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भजनी मंडळाच्या कारला भीषण अपघात झाला यात एक जागीच ठार झाले तर अन्य दोन जण जखमी असून, एक गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपळगाव गिरणा थडी येथील भजनी मंडळ कारने (एमएच १९, सीवाय ४५०८) भजनासाठी कासली (ता. जामनेर) येथे लोंद्री मार्गाने जात असताना शेरी-लोंद्री रस्त्यावरील योगेश पाटील यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार झाडावर आदळली. कारमध्ये एकूण पाच जण बसलेले होते. यातील दिलीप रमेश पाटील जागीच ठार झाले तर हेमंत सुभाष पाटील (३२) हे गंभीर जखमी असून, सतीश साहेबराव पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील ३४ वर्षीय तरुण रस्त्याने जात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला अन् रस्त्यावर कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अयोध्या नगरातील विशाल विठ्ठल वाणी (वय ३४) हा तरुण सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान दुपारी रस्त्याने जात असताना अचानक अजिंठा चौफुलीनजीक आयोध्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला व तो खाली कोसळला. त्या वेळी एका जणाने तरुणाच्या खिशातील पाकीटामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्या वेळी तरुणाचे नातेवाईक व एमआयडीसी पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाण्याच्या मार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना तीन जणांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीन जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाण्याच्या मार्गावर पोहेकॉ उमेश पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्तव्यावर होते. त्या वेळी तेथे तीन जणांनी त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन केले. या प्रकरणी पोहेकॉ उमेश पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतीनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील एकाला मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असतांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन यशवंत नामदेव पाटील (४७) फिरत असल्याची माहिती २९ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ उमेश भांडारकर पोकों तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर हे तेथे पोहचले असता. त्या ठिकाणी यशवंत पाटील हा मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत काडतूस देखील सापडले. कट्टा व…

Read More