पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची कारवाई सुरु असतांना जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 19 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत केली आहे. बंगलोर-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना मिळाली. त्यानुसार, रावेत गावच्या हद्दीतील हॉटेल हेमराज समोर सापळा रचण्यात आला. पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेझ कंपनीचे 14 चाकी वाहन (एमएच 15 एफव्ही 7940) आडवले. वाहनामध्ये 50 किलो…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अपघाताची मालिका सुरु असतांना एक धक्कादायक अपघात दिल्लीत घडला आहे. फिल्ममेकर पीयूष पालसोबत घडला आहे. अपघातानंतर पीयूष पाल अर्धा तास रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडत राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत राहिले. अशामध्ये तडफडूनच पियूषचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीयूष पालचा दिल्लीमध्ये अपघात झाला. पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. आपल्या बाइकवरून पीयूष दक्षिण दिल्लीतील पंचशील एन्क्लेव्हजवळील ट्रॅफिक सिग्नलवर लेन बदलत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या बाइकने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर पीयूष आपल्या बाइकसह लांबपर्यंत खरचटत गेला. हा अपघात इतका भीषण होता की…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहितेवर एकाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता भाड्याच्या घरात राहत असून दि.३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २५ वर्षीय विवाहितेच्या घरी येवून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवले जर हि घटना कुणाला सांगितलीस तर तुझ्या दोन्ही मुलीना जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी संशयित आरोपीने विवाहित महिलेला दिली. त्यानंतर विवाहित महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातून समोर आली आहे. येथील जुनी भाजी मार्केट गजबजलेला परिसरात भर दिवसा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीच्या किराणा सामानाच्या पिशवीतून ५० हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस त्या चार चोरट्याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथी राहणार फिर्यादी दिगंबर ज्ञानदेव वाघ यांनी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. दिगंबर वाघ यांनी त्यांच्या आईच्या उपचारासाठी स्टेट बँक कृषी शाखा जळगाव जामोद येथुन ५० हजार…
जळगाव : प्रतिनिधी जळगावातील शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र तोच त्याच बातमीचे पडसाद असे काही उमटले कि, दुपारी त्या संबंधित गुन्ह्यातील आरोपीने आपली जीवन यात्राच संपवल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप असलेल्या आरोपीने शिरसोली ते दापोरा रेल्वेरुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडधाने (५३) यांच्या विरुद्ध २० वर्षीय विद्यार्थिनीने दि. २६ ऑक्टोबर रोजी विनयभंग केल्याची फिर्याद रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मंगळवारी ३१ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी मालकाच्या घरी साफसफाई करण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाच्या पायाला वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.१ नोव्हेबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बोहरा गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहीण यांच्यासोबत सुनील संजय चव्हाण (१६) हा वास्तव्यास असून तेथील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते. घराची साफसाफाई करत असताना विजेच्या तारेवर पाय पडल्याने याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी गणेश कॉलनीत घडली. दोघे जण घराची सफाई करता असताना सुनीलच्या पायाचा वीज…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील भाटखेडा शिवारातील मेंढपाळ वाड्यातील चिमाबाई देवा कोरडकर असे नाव असून या प्रकरणी अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या चिमाबाई देवा कोरडकर (वय २५, रा. मुंजलवाडी ) हिचा पाय घसरून विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. धुरखेडा येथील पट्टीचे पोहणाऱ्यांनी तिचा मृतदेह सुमारे पावणे दोनशे फूट खोल विहिरीतील ७५ फूट पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. दरम्यान, मयत चिमाबाईच्या जेठाच्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चिमाबाईचे आई-वडील दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी…
धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील वनजमिनीवर लावण्यात आलेल्या १०८ किलो वजनाचा ओला गांजासह ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मंगळवारी याबाबत खबर मिळाली होती. रायसिंग पावरा (रा. लाकड्या हनुमान) याने वनजमिनीवर गांजा सदृश अमली पदार्थाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक खलाणेसह नायब तहसीलदार महेश बोरसे व पोलिस पथकासह घटनास्थळी छापा टाकण्यासाठी गेले, मात्र त्याची चाहूल संबंधित शेतमालक रायसिंग पावरा यास लागल्याने तो तेथून फरार झाला. सदर क्षेत्रामध्ये ५ ते ६ फुट उंचीचे…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील आरोग्य विभागात महाराष्ट्र शासनाने यशस्वी ग्रुप या कंपनीला ठेकेदार पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर भरले असुन यशस्वी ग्रुपच्या मनमानी कारभारा विरोधात या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे तसे निवेदन प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले असुन आज डॉ. अभिषेक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने डाटा एन्ट्री ऑपरेटर चे कामे करण्यासाठी पुणे येथील यशस्वी ग्रुप या कंपनीला करार दिलेला असुन यशस्वी ग्रुप या कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थी म्हणुन भरती केले आहे. त्यांना महिन्याला फक्त ९ हजार प्रमाणे मानधन अदा करण्यात येत…
जळगाव : प्रतिनिधी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये पुस्तक जमा करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचर याने विनयभंग केल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून जळगावात आजीकडे शिक्षणासाठी आलेली एक २० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. तेथे ग्रंथालय परिचर कैलास कडभाने याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह करीत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर…

