Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था कळवण शहरातील गणेश नगर भागातून चार घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर फटाक्याची ठिणगी पडल्याने चाऱ्याने पेट घेतल्याची घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास घडली. यात चारा पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यंदा पावसाने देवळा तालुक्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. खर्डासह देवळा तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी जनावरांना लागणारा चारा घेण्यासाठी कळवण तालुक्यात येत आहेत. शेतकरी भास्कर खंडेराव पवार (रा. खर्डा ता. देवळा) हे कळवण तालुक्यातील मानूर येथून गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आपल्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ४१ बीई ८८७०) मका पिकाचा चारा घेऊन जात होते. त्याचवेळी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळमधील काही जिल्ह्यात  शुक्रवारी रात्री 11.32 वाजता 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळमधील काठमांडूच्या वायव्येस 331 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर भूमिगत होते. नेपाळमधील दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. जाजरकोटमधील स्थानिक अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, जिल्ह्यात किमान ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेजारच्या रुकुम पश्चिम जिल्ह्यात किमान ३६ लोक मृत पावल्याची माहिती समजत आहे. या दुर्घटनेनंतर देशातील तिन्ही सुरक्षा यंत्रणा जखमींना तत्काळ मदत करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, याबाबतची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने सांगितलं की, दैलेख, सल्याण आणि रोल्पा जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांतून लोक जखमी झाल्याची आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची रू. १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा आपल्या सर्वसामान्यांच्या सरकारचा निर्धार आहे. परंतु विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान भरपाई जमा होण्यास थोडा विलंब होताच पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तीव्र शब्दात ठणकावले तसेच राज्याच्या कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सदर नुकसान भरपाई रक्कम ही ४…

Read More

धुळे : प्रतिनिधी  जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील एका मंडळ अधिकाऱ्याने २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार याला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. शिरपूर तालुक्यातील वरुळ शिवारात असलेल्या शेतजमिनीची वाटणी करण्यावरून तक्रारदार आणि त्याची बहीण यांच्यात वाद होता. त्यांच्यात वाटणी करण्याबाबत शिरपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशाची प्रत जोडून तक्रारदाराने तहसीलदारांकडे मागणी अर्ज सादर केला. संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अर्जावर कार्यवाही करून सातबाऱ्यावर नावनोंदणी करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आईने किराणा दुकानावरून साहित्य मागविले असता ते घेण्यासाठी १९ वर्षीय तरुणी गेली असता यावेळी एका दुकानाजवळ ३० वर्षीय इसमाने तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद या गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.२ नोव्हेबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तरुणीच्या आईने दुकानातून सामान घेण्यासाठी पाठविले असता. तरुणी दुकानात जात असतांना याच परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ असतांना तरुणीसोबत चुकीचे वर्तन करीत तिला म्हणाला कि तु मला खूप आवडते यावर तुझे म्हणणे काय ? तर तरुणीने त्याला धक्का देत मी तुझे नाव माझ्या…

Read More

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सांगली जिल्ह्यातील हरिपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काळया जादूचा वापर झाल्याची चर्चा आहे. अज्ञाताकडून काळया बाहुल्यांची पूजा केली गेली तर मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्या बाहुल्या जाळून टाकल्या. दरम्यान या घटनेबाबत पाेलीसांत नाेंद झालेली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी सध्या टोकाचे प्रयत्न केले जात आहेत. सांगली नजीकच्या हरिपुरात निवडणुकीत चक्क काळया जादूचा वापर केला जात आहे. अज्ञाताकडून हरिपूरमध्ये बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली. यानंतर संतप्त मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणा केलेल्या बाहुल्या जाळून निषेध केला. हरिपूर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरू आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तांबवेकर प्रणित बोंद्रे पॅनेलची सत्ता…

Read More

नेहमीच आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली व वादाच्या भोवऱ्यात अडकणारी उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या असून उर्फी जावेद न घाबरता पुन्हा नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यापुढे येत. आता सध्या उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिला पोलिस तिला सोबत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल भियानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फी जावेदला खरंच अटक झाली आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही. पण हा…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक अल्पवयीन मुलीना प्रेम प्रकरणात अडकवून त्यांच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेम संबध निर्माण करीत एका तरुणाने तिच्यासोबत शारिरीक संबध निर्माण करून तिला गर्भवती केल्याची घटना उघड झाली असून अल्पवयीन मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१ ते ३१ मार्च २०२३ या महिन्याभरात तरुणाने चोपडा व जळगाव येथील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर जबर धडकून झालेल्या अपघातात वरणगाव व फुलगावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील महामार्गावरील शिवाजी नगर येथे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीतील विजय रामकृष्ण महाजन (वय ४७) आणि वरणगाव येथील गणपती नगरमधील आदर्श शाळेजवळ राहणारे ललित धांडे (वय ३५)…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून ड्रग्ज प्रकरण मोठ्या चर्चेत आले असून आता ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. हा देशातील तरुणाई नासवण्याचा प्रकार आहे. या गुन्ह्यांच्या मुळाशी जायचे आहे, असे सांगून तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी ललितसह दोन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी चौदा दिवसांची कोठडी न देता ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ड्रगतस्कर ललित पाटील याने साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असताना अंधेरी न्यायालयात आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा केला आहे. यावेळीही ललितचे वकील संदीप बाली यांनी आरोग्य आणि…

Read More