Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दुरुस्त केलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याने गॅरेजवर आलेल्या एकाने माझी दुचाकी लागलीच दुरुस्त करुन दे असा म्हणून तगादा लावला यावेळी वादातून गॅरेज चालकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या खूनाच्या घटने प्रकरणी गॅरेज मालकाचा खून करणा-या दुचाकी चालकाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत बळाळ कसबे या गावी महेश संतोष बोरसे याचे मोटार सायकल दुरुस्तीचे शिवशक्ती मोटार नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे याने मोटार सायकल दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्याच्या मोटार सायकलमधे पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे तो गॅरेजवर पुन्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सिंधी कॉलनी परिसरात वर्सी महोत्सवात मोठ्या उत्साहात सुरु आहे. याठिकाणी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोड्यातील संशयित प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (वय २४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांना बघताच पळून जात असतांना सिनेस्टाईल पोलिसांनी पाठलाग करुन संशयिताला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील प्रथमेश उर्फ डॉन याने ठाणे व पालघर येथे मोठे दरोडे टाकले आहे. दरोडा टाकल्यानंतर मुद्देमाल घेवून संशयित प्रथमे हा फरार होवून जायचा. त्याच्याविरुद्ध राज्यासह इतर राज्यात देखील दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताचे सत्र सुरु असतांना नुकतेच नवीन नाशिक परिसरातील रगवारे चौफुलीसमोर असलेला उड्डाणपुलाचा रस्ता ओलांडत असताना चारचाकी कारने दिलेल्या धडकेत ३३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. गोरख कडूबा जाधव (वय ३३ रा. कौतेकरवाडी, पाथर्डी शिवार) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख जाधव हे पाथर्डी सर्व्हिसरोडवरील एका खासगी वॉशिंग सेंटरमध्ये काम करीत होते. ते शुक्रवारी कामावरून घरी जात असताना गरवारे चौफुली येथे उड्डाण पुलावरून पांडवलेण्याच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी कार ( डी एन ०९…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास रिक्षाचालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रोजगाराचा ताण आणि कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. सूत्रानुसार, शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील नागोरी डेअरीच्या गल्लीत बिलाल शेख वलियोद्दीन हा तरुण चार वर्षाची मुलगी आणि पत्नीसह रहिवासास असून कोरोना काळा नंतर कर्जबाजारी झाल्या पासुन हा तरुण प्रचंड तणावात होता. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच पत्नीने हंबरडा फोडित आक्रोश केला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या आंदोलनाची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगता झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री.बावीस्कर यांना उसाचा रस पाजत उपोषण सोडविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयास समोर सुरू असलेल्या उपोषणाच्या सांगते वेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार रमेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोळी समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन बैठका आयोजित करण्यात आल्या. कोळी समाजाच्या जातीच्या तसेच इतर विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अधिसंख्यपदांचा सर्वात मोठा विषय मुख्यमंत्र्यांनी सोडविला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचा चौथा वर्धापन दिन जळगाव शहरातील देव हाईटस याठिकाणी मोठ्या उत्साहात दि.४ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थिती वर्धापन दिन अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी जी.प.सदस्य प्रताप पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रमेश माणिकराव पाटील, एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोनि.जयपाल हिरे,निरीक्षक पवन देसले, शिवराज पाटील, प्रा.प्रवीण पाटीलसर, वासुदेव पाटील सर, नितीन विसपुते, डी.ओ.पाटील, राम पवार, धवल पाटील, डॉ.अरुण पाटील, संजय चव्हाण, खुशाल पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने काहीतरी आमिष दाखवत पळवून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळील एका कृषी केंद्रासह शहरातील विरारनगर व मदिनानगर परिसर अशा तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी केंद्रातील चोरीत सहभाग अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात विरारनगर परिसरात मध्यप्रदेशातील संशयितास अटक केली आहे. शहरातील हरिओमनगर शेजारी मदिनानगर परिसरातील रहिवासी रफीक खान नामदार खान (वय ५५) हे खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी शहरातील विस्तारित भागात आपल्या सून व मुलासाठी भाडे तत्वावर घर घेतले. १ ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घरातील मंडळी ही बाबूजीपुरा येथील घरात झोपण्यासाठी गेले असता चोरटयांनी…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यभरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातून समोर आली आहे. भावाला व्याजाने एक लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी दिले खरे; पण याच पैशांसाठी बहिणीने सख्ख्या भावाचा गुंडांच्या मदतीने खून केला. ही घटना १ नोव्हेंबररोजी बेगमपुरा भागात समोर आली होती. विशेष म्हणजे, आत्महत्या केल्याचा बनावही केला. मात्र, घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मृत भावाला झालेल्या जखमा आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बेगमपुरा पोलिसांना ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर या प्रकरणात बहिणीसह तिचा दूरचा नातेवाईक, त्याचे मित्र अशा पाचहून अधिक जणांविरोधात २ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, ही घटना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते तर अनेक जिल्ह्यात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई इथं देखील हलवण्यात येऊ शकते. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकार सोमवारपर्यंत मनोज जरांगे यांनी नवीन जीआर देणार आहे. मनोज जरांगे म्हणाले, सध्या साखळी उपोषण सुरु आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मात्र आता समिती देखील कामाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ तारीख देली आहे. कुणीही…

Read More