Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही वर्षापासून अनेक तरूणासह तरुणीना लुटण्याचे प्रकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत असतात. अशाच प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. डेटिंग अ‍ॅपवर तरुणांशी ओळख केल्यानंतर त्यांना मुलींचे फोटो पाठवून हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगून त्यांना लुटणाऱ्या परप्रांतिय महिलेला व एका पुरुषाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून 50 लाख 69 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी डेटिंग अ‍ॅपद्वारे ग्राहकांना आकर्षित करून त्यांना हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून घेऊन त्यांच्याकडून ठरलेली रक्कम घेत होते. त्यानंतर ग्राहकाला दमदाटी व मारहाण करुन आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईन घेऊन ग्राहकाकडील…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉबी देओलसोबत त्रिधा चौधरीचा इंटिमेट सीन देऊन खळबळ माजवणारी बबिता जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याचा खुलासा स्वतः त्रिधाने केला आहे. त्रिधा चौधरीने सांगितले की, ती पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. कलकत्ता टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या लग्नाची सर्व माहिती शेअर केली. मात्र तिने अद्याप तिच्या भावी पतीचे नाव उघड केलेले नाही. त्याने नुकतेच सांगितले की तोही चित्रपटसृष्टीतील आहे. लग्नाबद्दलचा आनंद व्यक्त करताना त्रिधा म्हणाली की, आम्ही दोघेही सध्या खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आमचे नाते खाजगी ठेवायला आवडते. त्रिधा म्हणाली की तिला लग्न साधेपणाने करायचे आहे. सर्व काही ठीक झाले तर पुढच्या वर्षी लग्न करू,…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात पुणे शहर सध्या अशा घटनामध्ये अव्वल ठरत आहे. नुकतेच एका कंपनीत आज पहाटेच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथे घडली असून यात प्रवीण बाबासाहेब झुमकुडे (वय 35 मुळ रा. नांद्रे ता. मिरज जि. सांगली) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून हत्येची शक्यता लक्षात घेऊन हवेली पोलीसांनी तपास सुरू केला आहे. आज पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास वरदाडे येथील नामांकित कंपनीच्या कर्मचारी वसाहतीत राहण्यास असलेला प्रवीण झुमकुडे हा गळा चिरुन गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना आढळून…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गुन्हेगारी घटनेत सातत्याने पुणे शहराचे नाव येत असून आज पुन्हा एकदा पुणे शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातीव लोहगाव परिसरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत खुलासा होईल. पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार, लोहगाव परिसरात किरण बोबडे आणि आरती बोबडे पती-पत्नीची भाड्याच्या घरात राहत होते. घरमालक तळमजल्यावर आणि बोबडे दाम्पत्य वर राहत होते. सोमवारी सकाळी 11…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था तालुक्यातील धानोरा येथे सुरु असलेल्या पुलाच्या बांधकाम साईटवरुन सुपरवायझरसह चौघांनी साहित्य चोरी केले. ही बाब ठेकेदाराला सांगू नये, यासाठी ठेकेदाराच्याच नातेवाईकाला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. यामुळे संबंधिताने आत्महत्या केली. याप्रकरणी सुपरवायझरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील पुलाचे काम सुरु आहे. काम सुरु असलेल्या साईटवरुन सुपरवायझर असलेला प्रकाश धुडकू सदाशिव (रा. धुळे), भैय्या कोळी उर्फ भैय्या महाराज (रा. धानोरा), पिंटू (रा. भांगडा) व राजल्या ( रा. धानोरा ता. नंदुरबार) अशा चौघांनी सिमेंट व स्टिलची चोरी केली. ही बाब ठेकेदाराचे नातेवाईक किरण चुडामण वाडेकर (वय ४९, रा. धुळे)…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेणाऱ्या अविनाश सुरेश धनगर (२२ रा. भावेर ता. शिरपूर) यास १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश२पी. आर. चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस अविनाश धनगर याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे व पोहेकॉ प्रदीप राजपूत यांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी व पीडित मुलीला ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेतले. आरोपीने या अल्पवयीन मुलीस रोहिणी मानपूर,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव – छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील रेमंड चौफुली परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मकरंद कॉलनीत हर्षल शिरीष भंडारी (वय ३९) हे वास्तव्यास आहे. ते त्यांचा मित्र संजय नामदेव साठे यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गावरील रेमंड चौफुलीजवळून (एमएच १२, एफएच ४४४९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच २८, बीडब्ल्यू ०२७३ ) क्रमांकाच्या कारने भंडारी यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात दुचाकी खाली पडली व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका ५२ वर्षीय प्रौधास जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मारहाण करीत जिवंत सोडू नका, अशी दमदाटी केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्य माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फेसर्डी येथे नगीन भिमराव पाटील (वय ५२) हे वास्तव्यास आहे. त्यांचे गावातील चार जणांमध्ये जुने भांडण आहे. या जुन्या भांडणाची कुरापत काढत चौघांनी पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याला जिवंत सोडू नका, असे म्हणत दमदाटीही केली. या प्रकरणी पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप पाटील करीत आहेत.

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात  महिलेच्या शेतात जावून विळ्याने मारहाण करीत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.५ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महिला शेतात काम करीत असतांना एक संशयित आरोपी या ठिकाणी येत त्याने महिलेला शेताच्या बांधावर नेवून विनयभंग करीत तिला हातातील लोखंडी विड्याने डोक्यावर व हातावर मारून दुखापत करीत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील तोडून नुकसान केले याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात एका विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेकांना एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. विहीतगाव भागात तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. छतावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रत्नाकर मदन बोराडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोराडे गेल्या १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर शतपावली करीत असतांना ही दुर्घटना घडली. तंबाखूचे सेवन करून ते शतपावली करीत असतांना पिचकारी मारण्यासाठी ते वाकले असता अचानक इमारतीवरून पडले होते. या घटनेत त्यांच्या पाठीस व मानेस दुखापत झाली. त्यानंतर भाऊ विनोद बोराडे यांनी…

Read More