Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दोन दिवसाआधी नेपाळमध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर आज दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.8 इतकी त्याची तीव्रता नोंदवण्यात आली. सोमवारी संध्याकाळी 4.16 वाजता हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा नेपाळ होता. यापूर्वी, 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11:32 वाजता नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये 157 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातीली २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत भगवान पाटील (वय-२४) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला असून आपले लग्न होत नाही. शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपायोग नाही. असे आपल्या मेहुणे योगेश यांना बोलून दाखविले होते. या विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने चाळीसगाव ग्रामीण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते पण अनेकांचे हे स्वप्न सहजा सहजी पूर्ण होत नसते, पण सध्या राज्यातील अनेक महानगरपालिकेत नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यातील एक म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – मीरा भाईंदर महानगरपालिका भरली जाणारी पदे – 1. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 15 पदे 2. परिचारिका…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांची रविवारी दुपारी अचानक तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खडसेंसाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्यामुळे खडसेंना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जात एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा आयुष प्रसाद यांनी कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या. या सूचनांनुसार उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडाडीने काम करत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यात १३१८ गुन्हे नोंदवत २ कोटी २५ लाख ८० हजार २३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षाच्या सात महिन्याच्या तुलनेत गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात २२ टक्के वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाने ही कामगिरी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षी एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्याच्या कालावधीत १०८३ गुन्हे नोंदवत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील ६० विद्यार्थिनींसोबत विनयभंग आणि अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक केल्याचा प्रकार हरियाणा येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक करतार सिंग याला जिंद जिल्ह्यातील उचाणा येथून ताब्यात घेतले. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात, पीडित विद्यार्थिनींशी बोलल्यानंतर, हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी डीजीपी शत्रूजित कपूर यांना पत्र लिहून आरोपी मुख्याध्यापकाला २४ तासांत अटक करण्याचे निर्देश दिले होते. याआधी विद्यार्थिनींनी राष्ट्रपती हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि शिक्षणमंत्री कंवरपाल यांच्याकडे तक्रार केली होती. शिक्षण…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यात पहिल्यांदाच डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. याचा देखील आज सकाळी प्रभाग क्र.१ चा निकाल हाती लागला आहे. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सविता धनराज सोनवणे बिनविरोध यांची बिनविरोध झाली आहे. तर सदस्यांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. यात तांत्रिक अडचणीमुळे माघार घेऊ न शकलेल्याही उमेदवारांचा समावेश होता. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभाग होते. सर्व साधारण श्याम भिमराव पाटील : ३०३ (विजयी) हेमंत रामदास महाजन : २७ नोटा : ०३ एससी महिला प्रियंका वैभव बोरसे : १११ शिला अनिल देशमाने : १६० (विजयी) जिजाबाई युवराज कढरे : ६१ नोटा : १ सर्व साधारण स्त्री रेखाबाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले आ.एकनाथराव खडसे यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृती आज दि.५ रोजी दुपारी अचानक प्रकुती खालावली होती. त्यामुळे त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागलीच जळगाव विमानतळावरून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जळगावातील गजानन हार्टकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक उच्चशिक्षित तरुणीना सध्या नोकरी नसल्याने अनेक तरुणी बेरोजगार आहे. त्यासाठी अनेकवेळा तरुणीना मोबाईलवर नोकरी विषयक फोन येत असतात. अशाच एका फोनमुळे तरुणीला मोठा फटका बसला आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षाच्या तरुणीला पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून रिल्स लाईक करण्याचे काम देण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तरुणीला 11 लाखांचा गंडा घातला. याबाबत मिनल माणिकराव निखाडे (वय-25 रा. कोथरुड) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी टेलीग्राम युजर आयडी धारकावर आयपीसी 420,34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात तरूणासह तरुणी आपल्या जीवनयात्रा संपवीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतान एक धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर येथून समोर आली आहे. कळमकर चौकामधील विहिरीत एका तरुणाने उडी मारून आपलं जीवन संपलंय. स्वप्निल राऊत असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार आणि घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे.स्वप्नील मूळचा बुलढाणा जिल्ह्याचा आहे. रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपल्यावर या तरुणाने घरातून थेट विहीर गाठली आणि उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळींना तरुण दिसला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी…

Read More